डार्लिंग डॉट कॉम : भाग ७.
संजना सांगळे यांनी या प्रकरणाची व्याप्ती बाहेर पसरू न देण्याचा राघवला आदेश दिला होता, कारण त्यांचे राजकीय भविष्य धोक्यात येऊ शकले असते.
संजना: "राघव, ह्या प्रकरणाचं गांभीर्य तुला कळतंय ना? माझ्या जाऊबाईच्या बदनामीमुळे माझं गृहमंत्रीपद धोक्यात येईल. गुरुजींना समजाव, हे प्रकरण बाहेर गेलं तर आम्ही सगळेच फसणार आहोत."
राघवने गंभीरपणे मान हलवली आणि त्याने संजनाला दिलेला शब्द पाळण्याचा निर्धार केला.
राघव: "हो मॅडम, मी हे प्रकरण बाहेर जाऊ देणार नाही. मी पार्वती आणि गुरुजींना समजावतो, पण तुम्ही निश्चिंत रहा."
राघव गुरुजींच्या घरी गेला. पार्वतीच्या मनात वेदनांचे वादळ होतं. तीच्या डोळ्यांमध्ये अश्रू दाटले होते, आणि ती गुरूजींना जाब विचारत होती.
पार्वती: (रडत) "का? का खेळलात माझ्या आयुष्याशी? पैसे कमवण्यासाठी ह्या थराला का गेलात? माझं सगळा विश्वास, माझं प्रेम... सगळं काही धुळीस मिळवलंत तुम्ही! मला आता घटकस्फोट हवाय, मला आता तुमच्यासोबत राहता येणार नाही."
सुदर्शन: "पार्वती, मी... मी तुझ्या मनाचा आदर करतो. पण माझ्या बहिणीच्या उपचारांसाठी पैसे मिळवण्याचा हा एकच मार्ग मला दिसला. मी कधीच तुझ्यावरील प्रेमाचा त्याग केला नाही, पण जीवनाच्या ह्या मार्गावर मला हा अवलंब करावा लागला."
पार्वती आणि सुदर्शन यांच्यात वाद सुरू असताना अचानक काही महिला त्यांच्या घरात आल्या. त्या स्त्रियांच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेचं प्रतिबिंब होतं.
महिला १: "पार्वती, सुदर्शन गुरुजींच्या प्रेमामुळे आम्हाला जीवनात पुन्हा नव्याने उभं राहायला मिळालं. त्यांनी आमच्यासोबत केवळ शरीरसंबंध नाही, आमच्या भावनांना त्यांनी जिंकलं."
महिला २:"मी विधवा होते, मला कुणाचंही प्रेम नव्हतं. सुदर्शन गुरुजींनी मला प्रेमाचा अर्थ शिकवला, माझ्या वेदनांना ओळखून त्यांच्यावर हळुवार फुंकर घातली"
पार्वती चकित झाली. ती त्या महिलांकडे पाहत होती, आणि तिच्या हृदयातला संताप आणि दु:ख कमी होत चाललं होतं.
पार्वती: "पण, तुम्ही सगळ्या तरी माझं दुःख कसं समजणार? त्यांचं कृत्य माझ्यासाठी तरी क्षमायोग्य आहे का?"
महिला ३: "पार्वती, आम्हाला सुदर्शन गुरुजींमुळे जे सुख मिळालं, ते केवळ एक शारीरिक संबंध नव्हतं. ते एक आत्म्याचं एकरूपण होतं, ज्याने आम्हाला मानसिक बळ दिलं. तू त्यांच्यावर प्रेम करतेस ना? मग, त्यांच्या संघर्षाला समजून घे. केवळ बहिणीसाठी त्यांनी हा व्यवसाय केला"
स्त्रियांकडून ऐकलेल्या ह्या कथांनी पार्वतीच्या मनात मोठा संघर्ष निर्माण केला. तिचं हृदय एका बाजूला तिच्या आत्मसन्मानासाठी आक्रोश करत होतं, आणि दुसरीकडे त्या सगळ्या स्त्रियांच्या सुखाचं चित्र तिच्या डोळ्यांसमोर येत होतं. ती आतल्या आत गोंधळली होती.
पार्वती:(गहिवरून) "मी काय करावं? मी कसं यांना माफ करू? माझं प्रेम तुटलंय, पण हे सत्यसुद्धा नाकारता येत नाही की ह्यांनी इतक्या महिलांना समजून घेऊन त्यांना आनंद दिलाय."
सुदर्शन:"पार्वती, मी जे केलं ते तुझ्या मते कदाचित योग्य नव्हतं, पण मला फक्त माझ्या बहिणीसाठी पैसा मिळवायचा होता. माझं तुझ्यावरचं प्रेम कधीच कमी झालं नाही, फक्त एका संकटाने माझ्या हातून चूक झाली."
पार्वतीने डोळ्यांतील पाणी पुसले आणि तिने स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला.
पार्वती: "कदाचित, मी तुम्हाला माफ करायला हवं, पण हे असं सोप्प नाही. मला वेळ लागेल."
पुढे काही महिन्यांनी सुदर्शन गुरुजींनी साठवलेल्या पैशातून त्यांच्या बहिणीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे झाली होती, आणि त्यांनी पार्वतीच्या भावनांचा आदर करत आपल्या जीवनात बदल करण्याचा निर्धार केला होता.
सुदर्शन रोज आपला दिवस पार्वतीच्या मनातील कुठलीही नाराजी दूर करण्यासाठी घालवत होता. तो तिच्या प्रत्येक इच्छेचा आदर करत होता, तिच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेत होता. पार्वतीला हवं ते सगळं सुदर्शन पुरवत होता.
पार्वती आपल्या मनातील संघर्षांशी एकटीच झुंजत होती. सुदर्शनच्या त्या वागण्याने तिला काही प्रमाणात समाधान मिळालं होतं, पण तिच्या हृदयातली वेदना अजूनही ताजी होती,तिने त्याला माफ केलं नव्हतं.
एके दिवशी, त्यांनी घरातल्या सत्यनारायण पूजा समारंभासाठी तयारी केली होती. पार्वतीने सर्व तयारी केली होती, आणि सुदर्शन तिच्या बाजूला होता, पण तिच्या नजरेत एक प्रकारची शांतता होती, जिच्यात प्रेमाचा ओलावा नव्हता.
पार्वती: "मी फक्त हे करत आहे कारण आपलं घर आहे, आपला संसार आहे. पण माझ्या मनातलं दुःख अजूनही तसंच आहे, सुदर्शन."
सुदर्शनला तीचं बोलणं ऐकून असहाय्य वाटलं, त्याच्या डोळ्यांत पाणी आलं.
सुदर्शन:"पार्वती, मी काय करू? मी कसा तुझ्या मनातील हा अविश्वास दूर करू? मी तुझ्यावर प्रेम करतो, आणि मला माझ्या चुकांची शिक्षा मिळाली आहे. "
पार्वतीने फक्त एक क्षण त्याच्याकडे पाहिलं, आणि नंतर तिने नजर टाळली. तीला असं वाटत होतं की तिचं जीवन एक प्रकारच्या जाळ्यात अडकलेलं आहे.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा