ओवी दिवसागणिक आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक सर्वांना दाखवत होती. सर्वांची आपुलकीने विचारपूस करण्याची तिला भारी आवड. पण कोणाचे काही चुकत असेल, मग तो मोठा असो वा लहान, सडेतोड बोलून ती मोकळी होत असे. म्हणजे दोन देणार दोन घेणार असा काहीसा तिचा स्वभाव होता. तारतम्य बाळगून शिताफीने दात पाडण्याची कला तिने लवकरच पारंगत केली.
स्त्रियांना नेहमी माणसे दुय्यम घटक म्हणून हिणवतात हे तिने बऱ्याच ठिकाणी पाहिले होते. पण आपल्या घरात मात्र असे नाही. त्यामुळे ती आनंदी होती. घरात मोठा भाऊ यश, मोठी बहीण सानू, आजी, आई सर्वांची ती लाडकी बनली होती. ती होतीच तशी, सर्वांना आपलेसे करणारी, हळूच खोड्या काढणारी, जराशी अल्लड पण चलाख, हजरजबाबी, कुठे काही वाईट घडत असेल तर, तिथे स्वतः जाऊन नीट करून येणारी. एकदम बिनधास्त आणि बेधडक. तिचे व्यक्तिमत्व डॅशिंग बनले होते. फक्त एका व्यक्तीच्या प्रेमापासून ती पोरकी होती. ते म्हणजे तिचे वडील. त्याचे तिला सुरुवातीला खूप वाईट वाटायचे. पण नंतर तिने याची स्वतःला सवय लावून घेतली होती. पण तरीही मनात हा विचार आला की ती अस्वस्थ व्हायची.
असेच एकदा ओवी आईसोबत एका निवांत क्षणी बोलत होती,
"आई, बाबा लहानपणी म्हणजे मी बाळ असताना. एकदा तरी माझ्याशी प्रेमाने बोलले का गं?"
"आई, बाबा लहानपणी म्हणजे मी बाळ असताना. एकदा तरी माझ्याशी प्रेमाने बोलले का गं?"
क्षणभर आईला, तिला काय उत्तर द्यावे हे कळतच नव्हते.
"हो गं ओवी. तुझ्याशी बाबा खूप बोलायचे. आता त्यांना किती काम असतं. तीन मुलांची, आईची, बायकोची साऱ्यांचीच त्यांच्यावर जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांचा स्वभाव जरा रागीट झालाय.दुसरं काही नाही."
"हो का? मग दादा आणि ताईला जवळ घेतात आणि मला नाही. हे मी खूपदा पाहिले आहे."
हुशार ओवीने बरोबर दुखरी नस पकडत आईला पेचात पाडले.
"ओवी, जा आजी बोलावते आहे तुला. बाजारातून आली आहे नां आजी. जा, सामान घेण्यासाठी मदत कर आजीला जराशी. उगाच डोक्यात काहीही घेऊन बसतेस."
एव्हाना ओवीला देखील आईला असे असहाय्य झालेले, गोंधळलेले बघवत नव्हते, म्हणून तीही मुकाट्याने आजीकडे गेली पण बाबा आपल्याशी बोलत नाहीत,कधीही प्रेमाने जवळ घेत नाहीत, ही खदखद तिचे मन अशांत करायची.
हाच प्रश्नं तिने मग आजीला विचारला, तेव्हा आजी म्हणाली,
"अगं, तू मुलगी म्हणून जन्माला आलीस अन् शंकर नाराज झाला पण मी पण शंकरला सांगितलं की, ही माझी लाडाची मैना, दांडेकरांचं नाव उज्वल करणार. डॅशिंग दांडेकर होणार. हे बघ पोरी परिस्थिती कशीही असो हार कधीच मानायची नाही. रडायचं नाही. नेहमी स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी झगडत राहायचं. कुठे काही वाईट घडत असेल तिथे एक घाव दोन तुकडे असे करायचे. समजले?"
"अगं, तू मुलगी म्हणून जन्माला आलीस अन् शंकर नाराज झाला पण मी पण शंकरला सांगितलं की, ही माझी लाडाची मैना, दांडेकरांचं नाव उज्वल करणार. डॅशिंग दांडेकर होणार. हे बघ पोरी परिस्थिती कशीही असो हार कधीच मानायची नाही. रडायचं नाही. नेहमी स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी झगडत राहायचं. कुठे काही वाईट घडत असेल तिथे एक घाव दोन तुकडे असे करायचे. समजले?"
"अच्छा म्हणजे डॅशिंग दांडेकर होण्यासाठी मला एवढे सगळे करावे लागेल?"
छोट्या ओवीच्या प्रश्नावर आजी खुदकन हसली आणि म्हणाली,
"बाळा, जसजशी तू मोठी होणार नां, तसतसे तुला या गोष्टी आपोआप समजतील. कारण तू कोण आहेस?"
"बाळा, जसजशी तू मोठी होणार नां, तसतसे तुला या गोष्टी आपोआप समजतील. कारण तू कोण आहेस?"
" डॅशिंग दांडेकर!"
लवकरच ओवीचा प्राथमिक शिक्षणाचा प्रवास संपला. आणि माध्यमिक शिक्षण सुरू झाले. वक्तृत्व हा ओवीचा आवडता प्रांत होता. त्यातल्या त्यात स्त्रीविषयक विषय तिला खूप आवडायचे. वाचनामुळे ती लवकरच सुज्ञ बनली होती.
आपल्या स्त्री विषयक तत्वज्ञानावर ती निडरपणे, परखडपणे बोलत असे. त्यामुळे ती जिथे जायची तिथे तिचे फॅन्स बनत असत. असेच एकदा शाळेमध्ये 'अभिर' नावाच्या एका मुलाला तिने प्रपोज केले.
"ए दीडशहाणे, मी शहरातला सर्वात श्रीमंत बापाचा मुलगा अन् तू? हॅ, तुझी हिंमत कशी झाली मला प्रपोज करायची?"
"ए मूर्खा, श्रीमंतीचा एवढा गर्व चांगला नाही. पण माझाही एक शब्द चांगलाच लक्षात ठेव. एक दिवस तूच मला मागणी घालशील या डॅशिंग दांडेकरला गुडघ्यावर बसून सर्वांसमोर प्रपोज करशील!"
अभिर मात्र आता पुरता खजील झाला. खरंतर तो तिच्या या धमकीला खूप घाबरला.
सर्व मित्रांना म्हणाला,"चला रे पोरांनो, हिच्या काय नादी लागायचं. आपल्याला खूप अभ्यास आहे."
त्याचा पळपुटेपणा ओवीला लक्षात आला. त्यामुळे तिनेही हा विषय तिथेच सोडून दिला आणि आपले लक्ष अभ्यासावर केंद्रित केले.
तिच्या मनात एकच ध्यास होता. आजीचे बोल खरे करायचे आणि बाबांना आपले कर्तृत्व सिद्ध करून दाखवायचे. कधीतरी बाबा आपल्याला प्रेमाने गोंजारत डोक्यावरून हात फिरवतील. असा विश्वास मनात भाबडी आशा ठेवून होता.
क्रमशः
क्रमशः
खरंच ओवी तिचा हा विश्वास खरा ठरवू शकेल? बाबांचे प्रेम तिला कधी मिळेल? तिने अभिरला दिलेली धमकी खरी होईल?काय असेल तिचे कर्तुत्व जे सगळे जग नावाजेल?पाहूया पुढील भागात..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा