Login

डॅशिंग दांडेकर - भाग ४

कथा एका दबंग मुलीची

यश आणि ईशाच्या लग्नाचा मुहूर्त तसा लांब होता. म्हणून लग्नाला जरा अवकाश होता. तोपर्यंत यश आणि ईशाच्या भेटीगाठी सुरू होत्या. साखरपुडा आनंदात पार पडला. यश तर ईशाला घरीसुद्धा आणत असे. त्यामुळे ओवी आणि ईशा चांगल्या मैत्रिणी बनल्या होत्या.

ईशाची फक्त एक गोष्ट ओवीला खूप खटकत होती. ते म्हणजे आजच्या काळातील मुली डोक्यावर सतत साडीचा पदर घेत नाहीत पण ईशा मात्र कधीही भेटली की साडीत असायची नी डोक्यावर पदर असायचा. जसे काही ती हे मुद्दाम वागत आहे असे ओवीला वाटायचे. तसेच ईशा ही यशला सतत आपण लवकर लग्नं करूया, असा हट्ट धरत होती. पण घरच्यांनी जेव्हा तिला समजावले की, मुहूर्तावरच लग्नं केलेले चांगले असते तेव्हा ती जरा गप्प झाली.

एकदा यशला एक फोन आला. नेमका यश जेवण्यासाठी डायनिंग रूममध्ये गेला होता आणि ओवी तिथे होती. ती यशला फोन नेऊन देणारच होती, पण बघूया कोण आहे ते, म्हणून तिने फोन रिसीव केला.

तिकडून आवाज आला,
"हॅलो मी संजय काळे."

"एक मिनिट मी यश दादाजवळ देते हं फोन."

"तुम्ही कोण बोलताय?"

"मी त्याची बहीण बोलतीये."

" ठीक आहे मग मी तुमच्याजवळ एक महत्त्वाची गोष्ट बोलू शकतो. तुम्हाला हे माहित हवं. तुम्हालाच आधी हे सांगतो. कारण तुमच्या भावाने ऐकलं तर त्याला मानसिक धक्का बसेल म्हणून तुम्ही ही गोष्ट सांगण्या आधी त्याला भावनिक दृष्ट्या तयार कराल ही अपेक्षा आहे."

"म्हणजे नेमकी कोणती गोष्ट सांगायची आहे तुम्हाला? काही सिरीयस आहे का?"

"हो यशच्या लग्नाबद्दल, म्हणजे त्याचे जिच्याशी लग्न ठरले आहे त्या ईशाविषयी जरा बोलायचे आहे."

"तिचा आणि तुमचा काय संबंध?"

"अहो ती वाया गेलेली मुलगी आहे."

"अहो, तोंड सांभाळून बोला. माझी होणारी वहिनी आहे ती."

"ऐकून घ्या माझे प्लीज. हे लग्नं होण्याआधी तिचे आणि माझे काही फोटो मी तुम्हाला पाठवतो."

"कसले फोटो?"

"ते कळेलच तुम्हाला. फक्त मी पाठवल्यावर दहा सेकंदानंतर मी सर्व फोटोज् डिलीट करेल. मग ते तुम्हालाही दिसणार नाहीत. ठेवतो मी फोन."


त्या मुलाने ईशा आणि त्याचे स्वतःचे फोटो पाठवले. ज्यात ईशा नको त्या अवस्थेत होती. ओवीने शिताफीने अन् हजर जवाबीपणा दाखवत कॉल रेकॉर्ड बटन केव्हाच चालू केले होत अन् हे सारे फोटो पटापट सेव्ह करून घेतले.

पुन्हा फोन वाजला. त्या मुलाचाच कॉल होता.

"मी तिचा एक्स बॉयफ्रेंड आहे. तिने मला लग्नाचे वचन दिले होते पण नंतर तिने मला असे सांगितले की, माझे वडील आपले नाते स्वीकारायला तयार नाहीत,म्हणून यश सोबत मी लग्नं करणार आहे. त्यानंतर तिचे वडील देखील मला धमकी देऊन गेले,हे सर्व अनुभवून मी पुर्णतः कोलमडून गेलो. मी तिच्यासाठी काय काय केले. ती सर्व शॉपिंग माझ्या पैशांवर करत असे. तसेच तिला पैशांची अडचण असली की मी कुठलीही अपेक्षा न ठेवता तिला ते पाहिजे तेव्हा दिले अन् शेवटी तिनेच मला धोका दिला. आता तुम्हाला समजले असेलच की ईशा आणि तिचे घरचे कसे आहेत ते! तुमचा भाऊ जर मला भेटला तर आणखी काही फोटोज् त्याला दाखवू शकतो मी आमचे. आता मी फोन ठेवतो."

आता मात्र ओवीला खात्री पटली की ईशा ही खरच वाया गेलेली मुलगी आहे, म्हणूनच ती इतके दिवस असे विचित्र वागत होती. स्वतःला बसलेला धक्का वेळीच सावरत तिने, आजी सोडून घरातील सर्वांना विश्वासात घेतले आणि सत्य सांगितले. आई, बाबा आणि यश यांनी तिच्या घरच्यांना नकार कळवला आणि ओवीच्या मदतीने सत्य उघडकीस आणले. काही दिवसांनी आजीला सुद्धा हे प्रकरण माहित झाले. ओवीने स्वतःच्या भावाला मोठ्या संकटातून वाचवले. सारेच ओवीचे गुणगान करू लागले पण बाबा मात्र अजूनही ओवीशी बोलत नव्हते.

एकदा ओवी ट्रेनमध्ये चालली होती. साधारण १२-१३ वर्षांच्या काही मुली भयभीत अवस्थेत काही माणसां सोबत त्याच बोगीत प्रवास करत होत्या. तिला वेगळेच वाटले.

तेवढ्यात त्यांच्यातील एक जण मुलींना म्हणाला,
"ए पोरींनो मान खाली करून बसायचं. अजिबात बोलायचं नाही.समजलं?"
क्रमशः

आता पुढे काय होईल? या मुलींना अशी दमदाटी करत ही माणसे कुठे घेवून चालली होती?ओवी त्यांची मदत करू शकेल? ओवी आपला डॅशिंगपणा इथे कसा दाखवेल? पाहूया पुढील भागात..

0

🎭 Series Post

View all