" हॅलो आई , गेली होती का हॉस्पिटल ला? काय बोले डॉक्टर?"
" सलाईन लावली होती . गोळ्या दिल्यात . 2 महिने बेडरेस्ट सांगितलीय . कष्टा चे काम करायचं नाही . उन्हात जायचं नाही "
ठीक आहे आम्ही परवा येतो न्याला तुला इकडे पुणे ला. इकडे राहा थोडे दिवस मग बरे वाटेल."
" नको पुणे ला तु तुझी बायको दोघे घरून काम करता माझ्याकडे कधी लक्ष देणार. मी प्राजक्ता ला केलाय कॉल .ती घेऊन जाईल मला. असे ही ती घरीच असते ती करेल सेवा माझी."
" ठीक आज ताई ला कॉल कर बघ काय म्हणते आणी मला सांग."
मुलाचा कॉल ठेवल्या नंतर संगीता ने मुलीला कॉल केला.
" हॅलो प्राजु, बोलीस का जावईबापू सोबत कधी येताय न्यायला मला."
" हे बघ आई मला काम असतात इकडे . त्यांचा ऑफिस च टिफिन मुलांचा टिफिन त्यांना स्कूल ला सोडायचं . त्यात तु आलीस तर अजून धावपळ होईल माझी .एकटी कोठे कोठे लक्ष देणार मी ."
" अग पण तुझ्या सासूबाई आहेत न तुझ्या मदतीला. नाहीतर एक काम कर इकडे गावी ये राहायला महिनाभर.जावई करतील मुलांचं सगळे. आता मुले काय लहान नाहीत.एकटे जाऊ शकतात न स्कूल ला स्वत च आवरून."
" काही काय बोलतेस आाई? तुझ्या साठी मी माझ्या मुलानं सोडून येऊ का ? फार तर 2 दिवस येईन मी राहायला नंतर जमणार नाही तु दादा ला सांग ."
असे बोलून प्राजक्ता ने फोन ठेवून दिला. संगीता ला विश्वास बसत नव्हता ही आपलीच मुलगी आहे का जिच्या साठी आपण स्वतः च्या सुने चा छळ केला. आता कोणत्या तोंडानं सुने कडे जायचं. बेड वर आराम करता करता तिला 6 महिन्या पूर्वी चे दिवस आठवले. त्यांची सुन गरोदर होती. गावी यात्रे ला आलेली . त्यात मायलेकी नी तिला कपडे धुवायला बाहेर पाठवले होते. येताना दगडात पाय अडकून ती खाली पडली. पोटावर जबरदस्त मार लागला. हॉस्पिटल मध्ये घेऊन गेलेवर डॉक्टर बोले . गर्भशायला इजा झाले मुळे बाळ दगावले. 4 दिवस हॉस्पिटल ला ठेवून तिला घरी आणली. तिला उठता बसता पोटात दुखत होते त्रास होत होता. पण प्राजक्ता ने आई ला सांगितले.
" आई तुला काय गरज नाही वाहिनी ची सेवा करायची. काही दुखत नसेल तिला .उगीच नाटक करत असेल नको जाऊ ."
" असे कसे बोलते ताई तु. पाहिलास न डॉक्टर काय बोले ते. अशा अवस्थेत आई तिची काळजी घेणार नाही तर मग कोण घेणार? " तुषार बोला.
" ते काय मला माहित नाही .मी तिची काळजी घेणार नाही . किती केल तर सुन लोकाच माणूस आपले थोडीच आहे. एव्हडी जर सेवा करून घ्यायची असेल तर आई कडे जा म्हणा ."
संगीता जोरात बोले मुळे बाहेर पूजा सर्व ऐकत होती. तुषार ने लगेच तिला माहेरी सोडली. इकडे मायलेकी दोघी खुश होत्या. पण तुषार दुखावला गेला.काही न बोलता पुणे ला निघून गेला.
विचाराच्या तंद्रित त्यांना झोप लागली . रात्री 7 वाजता गाडी च्या हॉर्न मुळे जाग आली. संगीता ला वाटले मुलगी जावई च आलेपण समोर बघते तर तुषार आणी पूजा उभे होते. तुषार जवळ येऊन बोला
" ताई आणी दाजींचा कॉल आलेला . बोले आम्हाला जमणार नाही न्यायला. तु घेऊन जा. म्हणून न्यायाला आलोय. बाबा कोठे आहेत . सकाळी निघायचं आहे आपल्याला."
पूजा सर्व बघत् होती पण एका शब्दाने बोली नाही . तशीच किचन मध्ये जाऊन जेवण बनवायला लागली. रात्री उशिरा अशोकराव घरी आले. तुषार ने सर्व सांगितले. तसे त्यांनी पण परवानगी दिली जायला. सकाळी 7 वाजता आवरून सगळे जन पुणे ला निघून आले. पूजा जास्त बोलत नव्हती. फक्त कामा पुरते च बोलायची. संगीता ला माहिती होते त अशी ला वागते म्हणून पण माफी मागायची धाडस नव्हती तिच्यात. पुणे ला येऊन 7 दिवस झाले . प्राजक्ता चा कॉल आला नव्हता. त्यांनी स्वतः हून कॉल केला तर उचलला नाही. म्हणून् संगीता ने आपल्या विहीन बाई ना कॉल केला
" हॅलो मी संगीता बोलते प्राजु ला द्या की फोन."
" घरी कोणी नाही मी एकटीच आहे. प्राजु रोहित मुले सगळी फिरायला राजस्थान ला .अशोक रावांना केला होता की कॉल बोले नाही का तुम्हाला..?"
" ठीक आहे विसरले असतील बोलायचं. मी कॉल.केला होता म्हणून बोलू नका तिला."
संगीता ने लगेच अशोकरावा ना कॉल केला आणी प्राजु बदल विचारले
" हो आला होता कॉल जावई बापूंचा काहीतर पैसे लागणार होते . मुलांना स्कूल फी भरायची आहे म्हणून . मी दिलेत 20,000. "
संगीता ने ओळखले. मुलगी खोटे बोलून पैसे घेऊन गेली. त्यानंतर फिरून आलेवर दोघे त्यांना बघायला पुणे ला आले. पण एकदा ही चल म्हंटले नाही. 2 महिने पूजा ने ऑफिस घर आणी मुलीच स्कूल च सगळे नीट संभाळले. संगीता सगळे पाहत होती. त्यांना आता पश्चाताप झाला. एवढे होऊन सुने न आपली सेवा केली. एक दिवस त्यांनी तुषार ला रूम.मध्ये बोलावले.
" तुषार पूजा कधीच मनमोकळे पण बोलणार नाही कारे माझ्या सोबत?"
" हे बघ आई तु जे काही केल ते चुकीचं होते. तु ताई च्या बोलण्यात येऊन हिला जे बोलीस की सुन लोकाच माणूस असते. त्यानं ती खूप दुखावलीय. तु काळजी घेतली नाहीस तिची.तुझ्या मनात तिच्या बदल काहीच किंमत नाही त्यामुळे ती शांत आहे. एवढे दिवस माझी लेक माझा जावई केलंस काय केल त्यांनी तुझ्या साठी? एक रात्र तर घेऊन गेले का?त्यांना फिरायला जायला वेळ आहे तुझी सेवा करायला नाही.तुमच्या सारख्या बायकांचं हेच चुकते . हाथ पाय चालतात तोपर्यंत सगळे लेकी साठी करायचं सुने ला परक्याची वागणूक द्यायची आणी अंथरुणावर पडले की म्हणायचं सुन काळजी घेत नाही बघत नाही. आता पण पूजा सगळे करते ते निव्वळ तिच कर्तव्य म्हणून . बाहेर पै पाहुणे हेच बोलणार न सुने न सासू ला संभाळले नाही. सर्व चुक पूजा ची च वाटणार सर्वांना. पण कोण असे विचारणार नाही ती अशी का वागते म्हणून करण अजून पण समाज किती केल तर सुने ला च नाव ठेवतो .सासू ला नाही."
स्वतः च्या मुलाच्या तोंडून सर्व ऐकलेवर त्यांना मेल्याहून मेल्या सारखं झाले. 2 महिने नंतर संगीता गावी आली. दिवाळी च्या आधी जुना कोल्हापुरी साज मोडून पूजा साठी नवीन साज तयार केला. ही गोष्ट त्यांच्या जाऊबाई नी प्राजक्ता ला सांगितले . रोहित आणी प्राजक्ता दिवाळी निमित्त गावी आले. पूजा समोर असायची त्यामुळे तिला बोलता येत नव्हते. लक्ष्मीपुजन् दिवशी त्यांनी साज बाहेर काढला . पूजा ने सगळी तयारी केली होती. संगीता ने साज काढून पूजा च्या हाती दिला तसे प्राजु ने मध्ये साज हिसकावून घेतला आणी बोली.
" काहि कळत का नाही आई तुला हिला काय देते दागिने तुझी मुलगी असताना. मला दे तो साज."
संगीता ने एक जोरात कानाखली लावली मुलीच्या. 2 मिनिटे सगळे शांत च झाले . रोहित तुषार पूजा अशोकराव सगळे आश्चर्य चकित होऊन पाहू लागले.
" काय बोली तु ? तुला द्यावा का मी ? काय केलास तु माझ्या साठी? ज्या वेळी मला तुझी खरी गरज होती तेव्हा स्वतः च्या बापाला खोटे बोलून पैसे घेतलेस आणी फिरायला राजस्थान ला गेलीस तुला काय वाटले मला माहित नाही का?त्यावेळी पूजा ने आई सारखी सेवा केली माझी. जेवन कपडे माझे आवरणे मुलीच आवरले ऑफिस च काम एकटीने केल सर्व त्याच मोबदला म्हणून हे केलाय मी त्यासाठी मला कोणच्या परवानगी ची गरज आहे असे वाटले नाही मला." संगीता अशोकरावा कडे पाहून बोली.
" काय बोलते तु संगीता ? प्राजु आणी जावई खोटे बोले मला? "
" हो विचारा की तुमच्या लाडक्या लेकीला आणी जावई ला. तुम्ही पण दिले लेकी साठी एकदा पण बोलावसे वाटले नाही का तुम्हाला की माझ्या सोबत पैसे देताना. म्हणून मी मुद्दाम हा साज बनवलंय पूजा साठी. ज्यांना आवडलं त्यांनी थांबा नसेल आवडले तर बॅग भरा आणी जा तुमच्या घरी."
प्राजु आणी रोहित खाली मन घालून बसले. आपली आई एव्हडी बदलेल असे तिला वाटले नव्हते. पूजा ने साज गळ्यात घालून लक्ष्मी पूजन ला गेली. प्राजु रोहित अशोकराव नुसते पाहत बसले............

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा