Login

डेथ व्हॅली

प्रत्येकाने त्याच्या वैशिष्यानुसार डेथ व्हॅली हे नाव संबोधले आहे.
डेथ व्हॅली हे ठिकाण :
मृत्यूचा सापळा
अचानक सरकणारे दगड
जगातली सर्वात गरमीचे ठिकाण
अंतराळातून दिसणारा रस्ता
बॅड वाॅटर बेसिन मुळे रहस्यमयी ठिकाण बनले आहे.

आज विज्ञानामुळे जग कितीही प्रगत झाले असले तरी, देखील जगभरात अनेक रहस्यमयी गोष्टी आहेत. ज्या कोणाच्याही कल्पनेशक्तीच्या पलिकडच्या आहेत. त्याचा आजवर कोणालाच छडा लावता आलेला नाही.
आज आपण अश्याच एका रहस्या बद्दल माहिती पाहणार आहोत. हे रहस्य पूर्व कॅलिफोर्नियाच्या वाळवंटामध्ये आहे. या जागेला
"डेथ व्हॅली" म्हणजेच मृत्यूची दरी असेही म्हणतात.

अमेरीकेतील कॅलिफोर्निया नेवाडा राज्यांच्या सीमेवरचा तब्बल ३४ लाख एकरांवरचा अवाढव्य आणि विलक्षण विरोधाभासांनी नटलेला पसारा म्हणजे च " डेथ व्हॅली नॅशनल पार्क" ह्याला 'मरणाचं सुंदर' ठिकाण असेही संबोधतात.

कॅलिफोर्नियाच्या सोन्याच्या शेतात शाॅर्टकट शोधत असताना १८४९ मध्ये खो-यात अडकलेल्या युरोपियन अमेरिकावाल्यांनी घाटीला डेथ व्हॅली हे नाव दिले. त्यांच्या गटातील एकाचाच मृत्यू झाला. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि २० व्या शतकाच्या सुरवातीच्या काळात सोन्या-चांदीच्या खाणीसाठी अनेक अल्पायुषी बूम शहरे सुध्दा उदयास आली.

माणसे चालतात हे आपल्या सगळ्यांना माहितच आहे.
पण ह्या व्हॅली मधील दगडे देखील आपोआप सरकतात. हे मोठे गूढ आज तागायत कोणालाच सापडलेलं नाही. या मागे प्रत्येकाने आपले मत नोंदवले आहे. १९०० दशकात या जागेवरुन वैज्ञानिकांनी वेगवेगळे अंदाज वर्तवले आहे.
काही लोकांनी सांगितले जोरात हवेच्या दाबामुळे दगड सरकत असतील.
काही जण दगडात लोखंड जास्त असल्याने तसेच जमिनीमध्ये चुंबकीय शक्ती असल्या कारणास्तव दगड सरकत असतील.
तर काही लोक खात्रीशीर असे सांगतात की, इथे एलियन येत असल्याचा दावा करतात. तेच दगड सरकवत असतात आणि म्हणूनच त्याचे निशाण देखील बघायला मिळतात.

२०१४ मधे ह्या दगडांना काही वैज्ञानिकांनी नाव देवून एका ठिकाणी सोडले होते. काही वर्षांनी त्याच ठिकाणी येवून पाहिले असता, पाहतात तर काय? २०० किलो पेक्षा जास्त असणारा दगड आपल्या जागेवरुन १ किलोमीटर दूर सरकला होता. २०१४ मध्ये रिचर्ड डी नाॅरिस आणि त्याच्या भावाने जेम्स नाॅरिस ने सुचित केले की, त्यांना दगड सरकण्याचा शोध लागला आहे.

टाईम लैप्स पद्धतिचा वापर करुन त्यांनी असे सांगितले की, हे दगड प्रामुख्याने थंडीच्या दिवसात हवेच्या वातावरणात केले जाते. जेव्हा कोरड्या सरोवरात थोड पाणी असते. आणि थंडीच्या दिवसात रात्रीच्या वेळी पाणी जमा होते. तेव्हा बर्फाची पातळ चादर बनली जाते. जेव्हा किरणे निघतात तेव्हा हा बर्फ छोट्या छोट्या तुकड्यांमधे विभागले जातात. आणि दवबिंदू रुपांतरीत करतात. या दिवसात जोरदार वा-यांमुळे बर्फाचे तुकडे दगडांना घेवून बरोबरीने सरकले जातात. यामुळेच त्याचे निशाण देखील मागे बघायला मिळतात.
वाळवंटाच्या जमिनीवर कोणतेही गुरुत्वाकर्षण कारण नसलेले दगड म्हणून 'सेलिंग स्टोन्स' म्हणून ओळखले जाणारे दगड औन्स ते शेकडो पाउंड पर्यंत आकारात बदलत असतात.

हे दगड सर्वात जुने आहेत किमान १.७ अब्ज वर्षांपूर्वी तयार झाले होते. ५०० दशलक्ष वर्षापूर्वीचे खडक मात्र अधिक स्पष्ट चित्र रंगवतात.

डेथ व्हॅली हे शहर आहे का? असा अनेकांना प्रश्न पडतो. मूळत: १९३३ मध्ये राष्ट्रीय स्मारक म्हणून नियुक्त केले गेले. आणि १९९४ मध्ये राष्ट्रीय उद्यान बनवले. हे सिव्हिलियन काॅन्झव्हैशन काॅप्स किंवा ccc कडे आहे.

डेथ व्हॅली मधे अजूनही तिंबाशा शोशोनचे ऐतिहासिक जन्मभूमी आहे. जमिनीत अजूनही सदस्य राहतात. त्यांचे गाव फर्नेस क्रिकमधे आहे. ते उद्यानाच्या मध्यभागी आहे. या डेथ व्हॅली मधे आदिम ते पूर्ण हुक- अप पर्यंत विविध कॅम्पग्राउंड आहेत. इथे लक्झरी हाॅटेल किंवा साध्या टेंट केबिनमध्ये राहण्याचा विचार करत असाल तर व्हॅलीमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
इथे प्रवेश : प्रति व्यक्ति $15 किंवा प्रति वाहन $ 30 खर्च येतो. आणि ते सात दिवसांसाठी वैध आहे. आजीवन पास (वार्षिक, वरिष्ठ, लष्करी, प्रवेश इ.)सादर करणे आवश्यक आहे.
इथले वातावरण अत्यंत कठोर आणि क्षमाशील असले तरी या वाळवंटातील ओएसिसला आपले घर बनवले आहे. हंगामी अभ्यागत किंवा निवृत्त लोक असतात जे केवळ अशा वेगळ्या ठिकाणी एकांत शोधायला येतात.

सर्वाधिक उष्णतेचे ठिकाण तसेच उष्णतेचे वारे वाहत असतात. काही लोकांना आपले प्राण गममावे लागले आहे. एका संशोधनानुसार काही वैज्ञानिक शोध घ्यायला लागले तेव्हा हजारोंच्या संख्येत लोक आणि जनावरांचे अवशेष मिळाले होते.

डेथ व्हॅली नॅशनल पार्क हे सर्व टोकाचे आहे. सगळ्यात खालचा , गरम आणि सगळ्यात सुक्का भाग आहे.जगात कुठेही नोंदवलेल्या सर्वोच्च तापमानासाठी प्रसिद्ध (जुलै १९३६ मध्ये १३४ अंश तापमान) उन्हाळ्याचे तापमान अनेकदा सावलीत १२० अंश एफ(४९ अंश सेल्सियस) वर होते. आणि रात्रभर तापमान ९० अंश एफ मध्ये जाते. (मध्य -३० अंश सेल्सियस) आणि उत्तर अमेरिकेतील सर्वात कोरडे ठिकाण म्हणून, शरद ऋतु पासून ते वसंत ऋतुपर्यंत डेथ व्हॅली एक्सप्लोर करण्यासाठी आमंत्रित करते.
उद्यानात बहुतेक हायकिंग मार्ग क्राॅसकंट्री, वर कॅन्यन किंवा कड्यांच्या बाजूने पर्यटक फिरु शकतात. सर्वोत्तम काळ नोव्हेंबर ते मार्च आहे. उद्यानाच्या खालच्या उंचीवर उन्हाळ्याचे तापमान धोकादायक ठरु शकते.

व्हॅलीमध्ये प्रामुख्याने १००० हून अधिक वर्णित वनस्पति प्रजाती आहेत. त्यात शेडस्केल, ब्लॅकब्रश, जोशुआ ट्री, पिनयाॅन-ज्युनिपर, सब- अल्पाइन लिंबर पाइन आणि ब्रिस्टलकोन पाइन वुडलॅंड पासून खालच्या उंचीवर क्रिओसोट बुश, डेझर्ट हाॅली आणि मेक्स्वाइटचा समावेश वनस्पति क्षेत्रांमध्ये होतो.

प्राण्यांचे वर्गीकरण :-
मूळ सस्तन प्राण्यांच्या ५१ प्रजाती, पक्ष्यांच्या ३०७ प्रजाती, सरपटणा-या प्राण्यांच्या ३६ प्रजाती, उभयचरांच्या ३ प्रजाती आणि ५ प्रजाती आणि मूळ माशांच्या १ उपप्रजातीचे हे १३.३ दशलक्ष एकर क्षेत्र आहे.

फुले प्रामुख्याने :
नेत्रदीपक, स्प्रिंग वाइल्डफ्लाॅवर प्रसिद्ध आहे. परंतु ते अपवाद आहे. केवळ परिपूर्ण परिस्थितीतच वाळवंट सोन्याचा, जांभळ्या, गुलाबी किंवा पांढ-या फुलांनी भरतो. फॅसेलियाच्या विविध प्रजाती, वाळवंटातील पेंटब्रश, ग्लोबमॅलो, ल्युपिन, मेरीपोसा लिली, आणि ब्रिटलब्रश.

इंद्रधनुच्या छटा निर्माण होतात त्यामागील रहस्य?
टेकड्यांवर पसरलेल्या रंगांच्या ( लाल, केशरी, पिवळ्या,निळ्या,गुलाबी आणि हिरव्या) श्रेणीमध्ये आश्चर्यचकीत व्हायला होते अनेक जणांना. हे रंग खरतर, लोह आॅक्साइड आणि क्लोराईट सारख्या संयुगांनी समृद्ध असलेल्या ज्वालामुखीच्या ठेवींमधून बनलेलं असतात. आणि याच कारणामुळे इंद्रधनुष्याचा प्रभाव निर्माण होतो.

बॅडवाॅटर बेसिन नक्की काय आहे?
सर्वात उष्ण, कोरडे ठिकाण असून अब्जावधी गॅलन पाणी त्यात आहे. तळाशी असलेले बॅडवाॅटर बेसिन हजारो वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या विशाल प्राचीन तलावाचे अवशेष आहे.
सोडियम क्लोराईड जे‌ टेबल साॅल्ट म्हणून ओळखले जाते. ते बॅडवाॅटर बेसिनवरील बहुतेक क्षार बनवते. इतर बाष्पीभवन खनिजांमध्ये कॅल्साइट, जिप्सम आणि बोरॅक्स यांचा समावेश होतो. क्षारांचा स्त्रोत ९००० चौरस मैलांची ड्रेनेज सिस्टम हे न्यू हॅम्पशायरपेक्षा मोठे क्षेत्र आहे.
वादळांच्या मालिकेपेक्षा जेव्हा पाऊसाचे प्रमाण वाढते , तेव्हा बाष्पीभवनाला गती देण्यासाठी पुरेसे पाणी आले, जे सहसा बेसिन कोरडे ठेवतात. त्यामुळे तलाव तयार होवू दिला जातो. सुमारे सहा मैल लांब, तीन मैल रुंद आणि एक फूट खोल आहे.

व्हॅली मधील रस्ता आणि तिथले वैशिष्ट्य :
२२५ किलोमीटर लांबीचा सरळ रस्ता या व्हॅलीमधून गेला आहे. तिथे कोणत्याच प्रकारचे वळण दिसत नाही. त्यामुळे अंतराळातूनही हा रस्ता सहज दिसतो.
इथली उष्णता आपल्या शरीरातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी करते.परिणामी फारच कमी लोक येथे येण्याचे धाडस करतात. या ठिकाणी जाण सोप आहे. परंतु नियोजित ठिकाणी पोहचू की नाही याची शाश्वती देता नाही.
या व्हॅलीमध्ये सर्वात गडद-स्काय असोसियेशनने प्रमाणित केलेले युएस नॅशनल पार्क सिस्टममधील तिसरे आंतरराष्ट्रीय गडद आकाश उद्यान आहे.

©®प्रज्ञा पवन बो-हाडे