Login

देहमुक्ती (भाग १)

देहापासून मुक्ती

देहमुक्ती ( भाग १)



शिल्पा हसतमुखाने घरी आली. आज काॅलेजमध्ये दातारमॅडमनी सगळ्या वर्गात तिचा पेपर वाचून दाखवला. तिने कादंबरीवरील प्रश्नाचे इतके सुंदर लिहीले होते, की मॅडमनी सगळ्या वर्गात तिचे कौतुक केले. तिला त्या प्रश्नाचे पैकीच्या पैकी मार्क मिळाले. मॅडम म्हणाल्या, " एखाद्या सिच्युएशन वर इतक प्रभावी आणि मुद्देसूद लिहीणे खरच अवघड असते. पण कादंबरीतील त्या विशिष्ट घटनेवर शिल्पाने अतिशय विस्तृत आणि समर्पक उत्तर लिहीले आहे. " तिला खूप आनंद झाला. ती पेपर दाखवायला घरी घेऊन आली. आई आजी आणि तिच्या मावशीचे मुलगा विनय सगळ्यांनी वाचला. पण फक्त विनयने तिचे अभिनंदन केले. आई फक्त छान म्हणाली आणि आजीने तोंड फिरवले. नानांनी तर बघितला सुद्धा नाही. नाना म्हणजे शिल्पाचे वडील. त्यांना पहिल्या पासूनच शिल्पा विषयी प्रेम नव्हते. तिसरी मुलगी म्हणून ते जन्मल्यानंतर बघायला ही गेले नव्हते. त्यांना तिच्या कुठल्याच गोष्टीचे कौतुक नव्हते. ती दिसायला ही साधारण होती. पहिली मुलगी सुधा त्यांची सगळ्यात लाडकी, कारण पहिली बेटी धनाची पेटी आणि दिसायला छान, गोरी पान. त्यामानाने सिमा म्हणजे शिल्पाच्या आधीची बहिण आणि शिल्पा कमी गोर्या. आणि शेंडे फळ उमेश सगळ्यात जास्त लाडका, घराण्याचा दिवा.
नानांनी पेपर बघितला नाही म्हणून शिल्पा हिरमुसली. पण नंतर नेहमीप्रमाणे स्वतःची समजूत घालून आपल्या कामाला लागली.
संध्याकाळी पाणी भरणे, पाट पाणी घेणे, जेवणे झाल्यावर मागचे आवरणे ही काम शिल्पाची होती. सिमा आणि शिल्पा आईला सगळी मदत करायच्या पण सुधा मोठी असूनही आळशी होती. त्यात ती नोकरी करत होती. मग दिवसभर काम करून आल्यावर तिला कस काम सांगायचे म्हणून आजी तिची बाजू घ्यायची. मागचे आवरून झाल्यावर शिल्पा अभ्यासाला बसली तरी उमेश तिची चेष्टा करू लागला. " आर्ट्स ला कसला आलाय अभ्यास? कुठले तरी पुस्तक वाचायचे आणि त्यावर चार ओळी खरडायच्या. झाला अभ्यास. " शिल्पा चिडली पण तिने दुर्लक्ष केले. खरतर घरातल्या या वातावरणाचा तिला आताशा उबग यायला लागला होता. त्याची लहानपणापासूनच सवय असली अती झाले की नकोसे होते. ह्या सगळ्यातून तिला बाहेर पडायचे होते. पण कसे.

शिल्पा आणि विनय (तिचा मावस भाऊ) साधारण एकाच वयाचे. फारतर एखाद्या वर्षाचे अंतर. तो इंजिनिअरिंग करत होता. शिल्पा मराठी घेऊन बी. ए. कारण तिला साहित्यात रूची होती. कविता तिचा आवडता विषय. विनय शिल्पाच्या बाबतीतले सगळ्यांचे वागणे बघत होता. त्याला पण वाईट वाटे पण तो काही करू शकत नव्हता.

शिल्पा हुशार होती. तर सिमा आणि सुधा ठीक. उमेश मात्र अगदी ढ. तरी सुधा दहावीला दोन वेळा नापास झाली होती, पण ती नोकरी करत होती आणि सुंदर होती. सिमाला शिक्षणात काहीच रस नव्हता. ती बारावी नंतर एखादा कोर्स करून नोकरी करणार होती. उमेशच काहीच धड नव्हते. विनय हे सगळे बघत होता. त्यानी शिल्पाला पण पार्टटाईम नोकरी करण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे शिल्पा त्याच्याच मित्राकडे नोकरीला लागली. त्याचे छोटेसे वर्कशॉप होते. तिथे ती मदतनीस म्हणून कामाला लागली. विनयचेही तिथे रोजचेच जाणे येणे होते. मनासारखे काम मिळाल्यामुळे आणि घरच्या वातावरणातून बाहेर पडल्यामुळें तिला बरे वाटत होते. विनयही तिला शक्य तेवढी मदत करत होता.

तिथे एकत्र जाऊन जाऊन त्यांच्यात एकमेकांविषयी ओढ वाटू लागली. त्यांचे भावनिक बंध जुळून आले.
विनयचा मित्र नेहमीच गावाबाहेर जायचा कामासाठी, मग तिथे या दोघांचेच राज्य. मानसिक बरोबर शाररीक जवळीक ही वाढली. मिळालेल्या आपुलकीने आणि प्रेमाने शिल्पा आता खूष दिसत होती. आनंद आणि समाधान तिच्या चेहर्यावर दिसत होते. ती घरात पैसे देत होती त्यामुळे घरातले ही खुशीत होते. जरा बरे दिवस आले होते शिल्पाच्या वाटेला. पण कसा कोण जाणे सुधाला तिच्यावर आणि विनयवर संशय आला. ती येता जाता शिल्पाला टोमणे मारू लागली. शिल्पा तिला उडवून लावी. हे बघून विनयने हाॅस्टेलवर रहायला जायचा निर्णय घेतला. आता काय सुधाला शिल्पाला त्रास द्यायला आणखीनच मोकळीक मिळाली. ती मुद्दा नानांसमोर तिच्या काळातल्या चुका काढून तिला बोलू लागली. " मी पण नोकरी करते पण इतका माज नाही केला पैशाचा, तुझे काय तर लायकी भडगुंजाची आणि मिजास बादशहाची. " असे वाट्टेल ते बोलून सतत तिचा अपमान करी. शिल्पा बिचारी विनय जवळ रडून स्वतःचे दुःख हलके करी.

एक दिवस अचानक नानांचा निरोप आला. " येऊन भेटून जा. " विनय गेला. त्याला वाटलं काहितरी काम असेल. " सांगा नाना, काय काम आहे? " विनय.

" स्पष्टच बोलतो. सिंधू म्हणतीय तिला तुझ्याशी लग्न करायचे. तुला काय वाटतं? " नाना

" सिंधूताईकडे मी त्या दृष्टीने बघितले नाही नाना. ती वयाने मोठी आहे माझ्यापेक्षा. मला ती आवडत नाही. तिला गर्व आहे तिच्या सौंदर्याचा. आणि माझे प्रेम आहे दुसऱ्या मुलीवर. " विनय.
"ठीक आहे. " नाना म्हणाले, पण सिंधू चवताळून बाहेर आली. " सिंधूताई काय? आणि मी आवडत नाही म्हणे. सरळ सांग की तुला ती काळी नकटी शिल्पा आवडते ते. " सिंधू.

" हो आवडतेच. कारण ती स्वभावाने चांगली आहे. पण तुझ्या का ग पोटात दुखते. आवडतेच ती मला, आणि मी लग्न करणारे तिच्याशी. " सिंधूला ठणकावून विनय निघून गेला.

ह्या प्रसंगानंतर नानांनी शिल्पाशी बोलणे सोडले आणि आई करवी शिल्पाला सांगितले की ते ह्या लग्नाला कधीच परवानगी देणार नाहीत. त्या दिवसापासून सिनधूनेही तिच्याशी उभा दावा मांडला. रोजच त्यांचे भांडण होई. पण आता शिल्पा तयार झाली होती. शिल्पा आणि विनय ला अजून वर्षभर तरी थांबणे आवश्यक होते. विनयचे इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण व्हायला अजून सहा महिने बाकी होते. त्याला नोकरी मिळेपर्यंत तरी थांबायला हवे होते.

क्रमशः


सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे

मिरज


0

🎭 Series Post

View all