Login

देणाऱ्याने देत जावे... भाग १

देणाऱ्याने देत जावे...
जलद लेखन

शीर्षक - देणाऱ्याने देत जावे...
भाग १

आई, उठा नां!

बरं वाटतं कां आता?

स्नेहल आपल्या सासूबाईंना विचारत होती.

"हो गं. बरं वाटतं.

"तुझी आंघोळ झाली का?"

"आज अभ्यंगस्नान असणार नां?

हो आई. पहाटेच उठले मी. कामं आटोपून आंघोळही झाली माझी.

उठता का तुम्ही? मी मदत करते तुम्हाला उठायला. छान गरम पाण्याने अभ्यंगस्नानही घालून देते. स्नेहलचे शब्द ऐकून शीलाताई मनोमन सुखावल्या.

स्नेहदत्त शीलाताईंचा मुलगा. स्नेहदत्त च्या वडिलांचे तो लहान असतानाच निधन झाले होते. शीलाताईंनी वडिलांच्या पश्चात त्याला कशाचीही उणीव भासू दिली नाही. अगदी तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपत त्याला उच्च शिक्षण दिले. आज स्नेहदत्त एका मोठ्या कंपनीत मॅनेजरच्या पोस्टवर होता. एक वर्षांपूर्वी त्याचा स्नेहल नावाच्या सुस्वरूप, शालीन मुलीशी विवाह झाला. स्नेहल सुद्धा जॉब करत होती. विवाहानंतरही शीलाताई स्नेहदत्तच्या आवडीनिवडी जपत. त्यामुळे स्वयंपाक घराचा ताबा त्यांनी अजूनही सोडला नव्हता. शीलाताई स्नेहदत्त साठी, स्नेहल साठी ते आॅफिसमधे जायच्यावेळी डबा सुद्धा भरून द्यायच्या. सुरुवातीला स्नेहलला थोडं अवघडल्यासारखं वाटायचं. पण शीलाताई म्हणायच्या,

"स्नेहल तू अजिबात मनात काहीच आणू नको. मी आहे नां. मला स्वयंपाक करायला खूप आवडतं. वेगवेगळे पदार्थ करायला आवडतात. तू अगदी निश्चिंत रहा.

एक दिवस शीलाताई स्नेहलला म्हणाल्या,अगं स्नेहल, आता दिवाळी अगदी जवळ आली आहे. मला करंज्या खूप आवडतात. तुला माहित आहे नां, नागपंचमीच्या सणाला आपल्याकडे फुलोरा असतो. तेव्हा तू बघितले असतील.

"हो आई, किती सुंदर करंज्या बनवता तुम्ही. अनारसे तर अगदी जाळीदार आणि आई तुमच्या हाताला चवही खूप छान आहे."

अगं स्नेहल, स्नेहदत्तला अनारसे, करंजी खूप आवडते. तुझ्या सासऱ्यांना माझ्या हातचे बेसन लाडू खूप आवडायचे. नेहमीच त्यांची फर्माईश असायची. पण जाऊ दे. डोळ्यातील अश्रू लपवत शीलाताई म्हणाल्या.

अगं स्नेहल, आपणही दिवाळीची तयारी सुरू करायला हवी. करंजीसाठी ओलवलेले गहू हवे. ते गिरणीतून रवाळ दळून आणायचे. मग त्या गव्हाची पीठी व त्याचाच रवा करंजीसाठी वापरायचा असतो. ओलवल्या गव्हाच्या करंज्या खूपच चविष्ट लागतात. स्नेहल मन लावून ऐकत होती.

आणि हो अनारश्यासाठी तांदूळ टाकून देशील. दोन तीन दिवस चांगले भिजतील. मग त्यातलं पाणी काढून निथळत ठेवायचे व थोडं ओलसर असतानाच मिक्सरमधून पीठ दळायचं. त्या पिठात साखर घालून गोळे बनवून ठेवायचे आणि त्याचे अनारसे करायचे असतात.मग मी पटापट अनारसे आणि करंज्या करायला सुरुवात करेल. हो आई, मी आताच तांदूळ टाकून देते भिजायला आणि गहू ही ओलवून घेते. तुम्ही आता आराम करा.

पुढील भाग अवश्य वाचा.