Login

देणाऱ्याने देत जावे... भाग २

देणाऱ्याने देत जावे भाग२
जलद लेखन

शीर्षक - देणाऱ्याने देत जावे...
भाग २


दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर स्नेहलला सासुबाई दिसल्या नाही. आई तर रोज सकाळीच उठतात. मी उठेपर्यंत त्यांचा चहाही होऊन जातो. झोपल्या असतील निवांत. कधी कधी सकाळी सकाळी चांगली झोप लागते. तरी पण मी एकदा जाऊन बघते म्हणत स्नेहलने शीलाताईंच्या खोलीत जाऊन बघितले.पाहते तो काय शीलाताई बेड वरून खाली पडल्या होत्या. स्नेहल घाबरून गेली. तिने जवळ जाऊन पाहिले तर शीलाताई बेशुद्ध झाल्या होत्या. तिने स्नेहदत्तला आवाज दिला. तोही धावत आला. काय झालं? अहो, आई बघा नां. बेडवरून पडल्या वाटतं. अरे असं कसं अकस्मात घडलं हे सर्व. काल रात्री तर आई चांगली होती. स्नेहदत्तने लगेच आईला उचलले व दवाखान्यात नेले.

डॉक्टरांनी निदान केले. शीलाताईंना पॅरॅलिसिसचा अटॅक आला होता. डॉक्टरांनी औषधोपचार सुरू केले. हळूहळू शीलाताई शुद्धीवर आल्या. पण त्यांच्या शरीराचा काही भाग लुळा पडला होता. बोलताना तोतरेपणा जाणवत होता. काही दिवस दवाखान्यात राहून त्यांना घरी आणण्यात आले. शीलाताई मनातल्या मनात खूप दुःखी झाल्या होत्या. आपण किती उत्साहाने दिवाळीची तयारी करत होतो. आपण आता काहीच करू शकणार नाही. त्यांना रडू आवरेनासे झाले. तेवढ्यात स्नेहल आली. त्यांना तिने समजावलं. आई रडू नका. स्नेहदत्तनेही आईला समजावले.

"आई रडू नकोस. तू स्ट्रॉंग आहेस. तू लवकर बरी होशील. तू फक्त आराम कर. कसलाही विचार करू नको. आता स्नेहल करेल सर्व." शीलाताईंनी मान हलवून होकार दिला.

दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशी. पहिले अभ्यंगस्नान .सकाळीच घरातील सर्व कामं आटोपून स्नेहलने शीलाताईंना छान आंघोळ घालून दिली.

"आई, बरं वाटतं ना आता?"

" हो गं. बरं वाटतं." उद्या दिवाळी. शीलाताई आपल्या अस्पष्ट आवाजात हळूच बोलल्या. शीलाताईंना काय म्हणायचे आहे हे स्नेहलने जाणले. आई, तुम्ही फक्त आराम करा. तुम्हाला लवकर ठीक व्हायचं आहे नां? नाश्ता करा व छान पैकी झोप घ्या. मी स्वयंपाकाचं बघते. स्नेहल म्हणाली.

दुपारी स्नेहलने करंज्या करायला घेतल्या. रात्री तिने अनारसेही काढले. त्यासोबतच चकल्या, शंकरपाळी, चिवडा सुद्धा तिने केला. त्या कामात स्नेहदत्त ने सुद्धा बरीच मदत केली. दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन.

पुढील भाग अवश्य वाचा.