देशभक्ती...

देशभक्ती त्या वीरांची...
देशभक्ती त्या वीरांची
सांगून गेली जगाला
वेळ आली तर प्राणही द्या
भारतमातेच्या देशाला

सांडून रक्ताचा सडा
देशभक्ती खरी ठरली
भारताच्या स्वातंत्र्याची
आस वीराने धरली

दिली आहुती त्यांनी
अनमोल अशा प्राणांची
थकत नाही मन
ऐकण्या स्तुती बलिदानाची

मिळाले स्वातंत्र्य देशा
श्वास सुखाने सोडला
मोडून पडला संसार
पण कणा नाही मोडला.......

~ सौ.प्रणाली चंदनशिवे.


🎭 Series Post

View all