चालता वाटा
रुतला काटा
भळभळ वाहे रक्त
रक्तात गाथा
नव्हे अन्यथा
सळसळ येते वेदना
वेदनेची गाणी
थोडी नवी , थोडी जुनी
काही शहाणी , काही बापूडवाणी
पळ पळ निसटे हातातूनी
हात रिकामा
हात भरलेला
घेणारा आणि देणाराही
तळतळ प्राक्तन शोधी
प्राक्तनाचे भोग
योगायोग, कर्मयोग
अन् शेवटचा मृत्यूयोग
....योगिता मिलिंद नाखरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा