Login

तीच नशीब - भाग - 7

tich nashib
– भाग - 7
लेखिका – सौ. सोनल गुरुनाथ शिंदे

विद्या ला आता काय करू ते कळत नव्ह्ते., तरी पण तिने पुन्हा एकदा जगदीश ला एक चान्स द्यावा ह्या विचाराने तिने आई, बाबा, दादा – वहिनी , सासू बाई ह्या सर्वाना एकत्र बसवून जगदीश ला एकदा शेवटच समजावून सांगाव असं ठरवलं. विद्या घरी हे कोणालाच काही बोलली नाही. तिने माहेरी फोन करून कळवलं कि अचानक तिच्या सुट्टी च्या दिवशीं रविवारी सर्वांनी घरी या आणि जगदीश बरोबर ह्या संदर्भात बोला असं सांगितलं. ठरल्याप्रमाणे माहेरचे सगळे घरी आले. जगदीश घरी च होता.
दादा आणि बाबा बोलले, विद्या ने आम्हाला बोलावलं आहे जगदीश राव काय चालवलं आहे तुम्ही, कसलं हे नको ते व्यसन लागल आहे तुम्हाला, का आमच्या विद्या ला त्रास देताय एवढा...जगदीश गप्प बसून होता...त्याची आई पण बोलली कि आता तुम्हीच समजावा त्याला तो माझ हल्ली ऐकेनासा झाला आहे.........बाबा पण बोलले जगदीश राव हि शेवटची वार्निंग देतोय तुम्हाला आमच्या विद्या ला त्रास देण बंद करा... जगदीश हो हो करत होता.
मध्ये एक महिना बरा गेला...जगदीश अध्ये मह्ये दारू पिवून येत असे, पण विद्या ला काही बोलत नसे... एक महिन्यानंतर जगदीश पुन्हा तसच करू लागला, दारू पिवून घरात तमाशे करू लागला. त्याची रात्र रात्र ती दारू पिवून बडबड पुन्हा चालू झाली होती, विद्या वर उगाच ओरडू लागला. विद्या ने त्याच्या आईला सांगून बघितलं कि आई ह्या सगळ्याचा मुलांच्या मनावर वाईट परिणाम होतोय, धनश्री यंदा दहावीला आहे तिच्या अभ्यासावर परिणाम होतोय ह्या सगळ्याचा... सासू बोलली मी काय बोलू त्याला आत्ता ...
विद्या विचार करू लागली, कि घर सोडून जाव का...पण कुठे राहावं मुलांना घेवून भाड्याने राहणे म्हणजे अकरा महिन्याची अग्रीमेंट संपली कि पुन्हा घर बदलणे आलेच, विद्या ने विचार केला कि बाबा आणि दादा बरोबर बोलून बघावे. विद्या विचार करू लागली कि देवाच्या कृपेने मला पगार चांगला आहे त्यामुळे मी नक्कीच माझ आणि मुलांचं सगळं व्यवस्थित करू शकेन.
विद्या ने अजून सहा महिने वाट बघावी असे ठरवले कारण यंदा धनश्री ची दहावी होती, त्यात ती वेगळ राहणार असं नुसत जरी तिने म्हंटल असत तरी जगदीश ने घरात गोंधळ घातला असता. लग्नाच्या एकोणीस वर्षानंतर नवर्यापासून वेगळ राहण हे नक्कीच एवढं सोप्प नव्हत. ती ह्या सगळ्याचा खूप विचार करू लागली. आणि मग खूप विचार केल्यांनत , आणि मुलांच्या भविष्याचा विचार करून ती एका अंतिम निर्णयापर्यंत पोचली होती. त्याचे काय परिणाम होतील ते आता ती भोगायला तयार होती...
विद्या ने बाबांना फोन करून सांगितलं कि बाबा माझ्यासाठी एखादी रूम भाड्याने बघा मी धनश्री ची दहावी ची परीक्षा झाली कि मुलांना घेवून शिफ्ट व्हायचं असं म्हणतेय......विद्या ला वाटल होत बाबा खूप ओरडतील , चिडतील तिच्या निर्णयावर ..पण बाबांनी ऐकून घेतलं आणि शांतपणे म्हणाले .....विद्या तू एवढा मोठा निर्णय घेतला आहेस म्हणजे नक्कीच तुला तिथे खूप त्रास होतो आहे...बाबा म्हणाले आणखी थोडे दिवस थांब आणि तू भाड्याने वैगेर काही राहायचं नाही आहेस आमच्या ह्या घरात तुझा पण मुलगी म्हणून हिस्सा आहे त्यामुळे मी दादा बरोबर बोलून तुला तुझ्या हिस्सयाचे पैसे देतो त्यात तू छोटीशी रूम घे आणि मुलांबरोबर सुखाने राहा. मला दोन महिने दे मी तुला पैसे देतो.
विद्या नको बाबा बोलत होती पण बाबा बोलले तू तुझा निर्णय घेतला आहेस ना मग आता तुला माझ ऐकावचं लागेल. मी देतो तुला दोन महिन्यात पैसे आपण कुठेतरी छोटासा रूम घेवू......विद्या बऱ बाबा बोलली. विद्या ला आता हे सगळं घरी कसं सांगू असं झाल होत, तिला माहिती होत कि जगदीश तांडव करणार हे ऐकून..... पण तिने ठरवलं कि आता मागे हटायचं नाही......खूप सहन केल चूक नसताना.....
विद्या ने अजून दोन महिने विचार करायला घेतले त्त्या दोन महिन्यात जगदीश ने तिच्यावर दोनदा हात उचलला होता......एकदा तर त्याने दारूच्या नशेत तीच जबरदस्तीने शारीरिक शोषण पण केल.. शेवटी तिने खूप विचार करून घटस्पोट घेण्याचा निर्णय घेतला...

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत तिचा हा निर्णय ऐकून जगदीश काय बोलतो ते............)

लेखिका – सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
( राहणार- देवरुख – रत्नागीरी
0

🎭 Series Post

View all