Login

तीच नशीब - भाग - 8

tich nashib


  – भाग - 8
लेखिका – सौ. सोनल गुरुनाथ शिंदे

विद्या ने रविवारी सुट्टी च्या दिवशी हे घरी सांगायचे ठरवले, खरतर तिची पण हिम्मत होत नव्हती हे सर्व सांगायला पण तिने तो दिवसभर पण खुप विचार केला आणि ठरवले कि संध्याकाळी चहा घेताना हे बोलूया, कारण रात्री आठ नंतर जगदीश जर बाहेर पडला तर बरेचदा दारू पिवून च घरी येत असे. त्यामुळे संध्याकाळ ची च वेळ योग्य आहे बोलायला असं तिने मनोमन ठरवलं.
तिने संध्याकाळी सहा वाजता जगदीश आणि सासूबाई ना सांगितल कि मला काहीतरी बोलायचं आहे तुमच्या दोघांशी ......जगदीश बोलला काय ते बोल लवकर मला सात वाजता बाहेर जायच आहे. खूप हिम्मत करून विद्या बोलली मला घटस्पोट हवा आहे .. काय बोललीस तू पुन्हा बोल..असं ओरडून जगदीश बोलला.. सासू पण बोलली विद्या काय बोलते आहेस ते कळतंय तरी का तुला.... जगदीश तर तिच्यावर हात उचलू लागला.. तुला जास्तच अक्कल आली का ग असं बोलू लागला.
जगदीश बोलू लागला ......कुठे जाणार आहेस फारकत घेवून..... माहेरी जावून पडणार आहेस का.. .. जा भावाच्या संसारात तुला कोण विचारतंय ते बघ जा आधी .. मोठी शहाणी झालीय ....माझ्या मुलांना माझ्या पासून वेगळ करतेय ......माझी मुल तुझ्याबरोबर येणार नाहीत समजल ......पगाराचा माज आलाय ना तुला ....कोण विचारणार नाही तुला बाहेर घर सोडून गेल्यावर......जा कुठे जायचं आहे तिथे जा .. पण एकटीने च जा... मी माझ्या ओमकार ला तर तुझ्याबरोबर जावूच देणार नाही काही झाले तरी.......सासू पण बोलली माय – लेकी जा कुठे जाताय त्या ...ओमकार ला देणार नाही मी......
जगदीश खूप चिडला होता, तिच्यावर सारखा मारायला धावून जावू लागला......थांब तुझ्या आई- बाबांना सांगतो त्यांची मुलगी कशी वागतेय ते थांब तुझ्या बाबांना फोन करतो असं विद्या वर तो ओरडू लागला.....थांब तुझ्या घरी सांगतो कशी हि चांगला पगार आहे म्हणून शहाणी बनून दाखवतेय आम्हाला ...सासू पण बोलू लागली कर त्यांना फोन त्यांना पण कळूदेत कशी वागतेय त्यांची मुलगी ते.
विद्या बोलली बाबांना माहिती आहे माझा निर्णय...वीस वर्ष होत आली लग्नाला तुम्ही मला कुठे मान दिलात ..कायम च माझी गळचेपी केलीत. मला ह्या घरात अजूनही घरासाठी लागणारी एकही वस्तू आणायची परवानगी नाही आहे .. माझ्या मुलांना मी त्यांच्या आवडीचा खाऊ हि आणू शकत नाही कधी....सासूबाईनी ह्या घरतला त्यांचा अधिकार आजतागायत सोडला नाही आहे .
मी वीस वर्षात साधी माझ्या आवडीची भाजी सुद्धा ह्या घरात करू शकले नाही आहे....त्यात तुमच हे दारू पिवून मला मारणं, त्रास देण चालूच असत सारखं.....मी अजून किती वर्ष सहन करायचं हे सगळं.. तुम्ही दारू पिवून मला नको नको ते बोलता. घरात तमाशा करता. माझ्या मुलांना मला अशा वातावरणात ठेवायचं नाही आहे मला त्यांना चांगलं शिक्षण द्यायचं आहे....माझा फायनल निर्णय झाला आहे मला इथे राहायचं नाही आहे ....
जगदीश आई ला बोलू लागला बघितलस आई मी तुला मागे बोलत होतो ना ह्या जास्त शिकलेल्या मुलीना खूप माज असतो बघ आता कशी अरेरावी करतेय बघ हि.... जगदीश बोलला पण मुल देणार नाही मी तुला जा एकटी च राहा कुठे ती......धनश्री आतून बाहेर येवून बोलली बाबा मला आईबरोबर राहायचं आहे .. मी इथे राहणार नाही... जिथे माझी आई जाईल तिथेच मी जाणार...सासू बोलली ये तुला काय कळतंय ग.. तरी धनश्री ओरडून बोलली आई मी येणार तुझ्याबरोबर....
जगदीश चिडून बोलला जा आताच जा माय- लेकी कुठे ते...माझा ओमकार नाही येणार तुमच्याबरोबर.. विद्या पण चिडून बोलली हो जाऊ आम्ही दोघी पण ओमकार ला द्या ...जगदीश ने विद्या ला ओढत दरवाजात नेले आणि तिला घराच्या बाहेर काढले , तिच्या पाठून धनश्री पण गेली...जगदीश ने आतून दरवाजा लावून घेतला .. विद्या बाहेरून ओरडत होती अहो मला आत घ्या पण जगदीश आत जावून सोफ्यावर बसला.... रात्री चे आठ वाजत आले होते .. विद्या आणि धनश्री दरवाजा मध्ये बसून होत्या .. पण जगदीश ने दरवाजा उघडला नाही. बाजूची लोक विद्या ला बोलू लागली काय झाल विद्या .....विद्या काही बोलायच्या मनस्थितीत नव्हती....
विद्या ला एका बाजूच्या काकीनी रात्री चपाती – भाजी आणून दिली आणि बोलली खा रात्री चे दहा वाजता आलेत ...धनश्री रडून हैराण झाली होती पण जगदीश दरवाजा उघडेना ...सारखं एकच बोले आतून ......राहा रात्रभर दरवाजात बसून म्हणजे शहाणपणा जाईल तुझा...... विद्या आणि धनश्री रात्रभर बाहेरच होत्या...सकाळी सात वाजता सासू ने दरवाजा उघडला.. विद्या धनश्री ला घेवून आत गेली आणि बोलली धनश्री तुझे आणि माझे कपडे भर आपण आताच्या आता मामा कडे जातोय. ...
विद्या ओमकार ला विचारू लागली तू येतोयस ना आमच्याबरोबर मामाकडे .....तर तो विचार करत राहिला.... त्याला कायमच मामाकडे जायला आवडायचं, मामाच मोठ घर त्याला आवडायचं..... तो हो म्हणाला.. तशा जगदीश चिडून त्याला मारायला गेला. पण विद्या ने त्याचा हात धरला आणि बोलली तो आता मोठा झालाय त्याला त्याच कळतंय तो माझ्याबरोबर च राहणार... जगदीश ने खूप गोंधळ घातला आणि ओमकार ला मारू लागला ते बघून ओमकार विद्या कडे धावू लागला... विद्या ने सरळ तिच सामान उचललं आणि ती निघू लागली....
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत विद्या मुलांना घेवून माहेरी तर गेली पण जगदीश ने तिथे जावूनहि काय काय गोंधळ घातला ते.....)
लेखिका – सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
( राहणार- देवरुख – रत्नागीरी
0

🎭 Series Post

View all