Login

तीच नशीब - भाग - 9

tich nashib
– भाग - 9
लेखिका – सौ. सोनल गुरुनाथ शिंदे.

विद्या माहेरी गेली. ती जावून अर्धा तास नाही होत तोपर्यंत जगदीश तिथे जातो. विद्या ला घरी चल म्हणून विनवणी करतो. ती अगदीच ऐकत नाही बघून तिला धमकवायला सुरवात करतो. विद्या चे बाबा आणि दादा बोलतात जगदीशराव तुम्ही जरा शांत व्हा आधी. आपण ह्या विषयावर उद्या निवांत बोलू. जगदीश तावातावाने निथून जातो.
विद्या जगदीश निघून गेल्यावर बाबांना बोलते बाबा आपण लवकरात लवकर माझ्या रूम च बघूया. माझा निर्णय पक्का झाला आहे, मला आता जगदीश बरोबर राहून माझ्या मुलाचं भवितव्य खराब करायचं नाही आहे, मला त्यांना चांगल शिक्षण द्यायचं आहे आणि ते त्या घरातल्या वातावरणामुळे अज्जिबात शक्य नाही आहे. धनश्री तर आधीच पार कोमजून गेलीय त्या वातावरणात.
बाबा बोलतात...मी दादा बरोबर बोललो आहे कि आपण विद्या ला तिच्या हिशश्याचे पैसे देवून एक छोटीशी रूम घेवूया तिच्यासाठी. दादा हो बोलला आहे.. तुझ्या हिस्श्याला जे पंचवीस –लाख येतील त्यातून तुला एक रूम आपण घेवूया लवकरच. विद्या बोलू लागली.......आई – बाबा जगदीश ला सोडण्याचा निर्णय माझा होता मी खूप विचार करून मुलांच्या चांगल्यासाठी हा निर्णय घेतला आहे, मी लवकर च वकिलांशी बोलून घटस्पोटाचे पेपर्स तयार करायला सांगणार आहे.
मला हे चांगलच माहिती आहे ह्या सर्व प्रोसेस मध्ये जगदीश खूप त्रागा करतील, चिडतील, सारखे इथे येवून तमाशा करतील, माझी माफी मागतील पुन्हा दारू पिणार नाही असं बोलतील. मुलांना माझ्या विरोधात भडकवतील. विशेष करून ओमकार ला फितवतील ते. धनश्री वर त्यांचा तसा काही विशेष जीव नाही आहे. पण ओमकार त्यांचा लाडका आहे त्याला ते तिथे घेवून जाण्यासाठी खूप प्रयत्न करतील.. पण देवाच्या कृपेने ओमकार माझ्या बाजूने राहूदेत एवढीच त्या गणपती बाप्पाकडे माझी प्रार्थना आहे.
जगदीश मुलांना शाळेत भेटून मी कशी वाईट आहे हे सांगत राहतील.. सासू बाई माझ्या नावाने कांगावा करतील, मला बोल लावतील मला जास्त पगार आहे म्हणून अतीशाहणी आहे त्यामुळे मी हा निर्णय घेते आहे असं सगळयांना सांगतील...पण बाबा मी जगदीश च हे व्यसन सुटण्यासाठी दोन वर्ष वाट पहिली आहे ..पण निराशाच पदरी आली आहे त्यामुळे मी आता काहीही झाले तरी माझ्या निर्णयावर ठाम आहे ..मला वेगळं व्हायचं आहे.....
आणि मला उगाचच दादा च्या संसारात अडचण बनून राहायचं नाही आहे, त्यामुळे लवकरच इथून शिफ्ट होण्यासाठी प्रयत्न करा. बाब बोलले मी उदयापासून रूम शोधण्याच्या मोहिमेवर लागतो. विद्या एक दिवस सुट्टी घेवून पुन्हा दुसर्या दिवशी शाळेत जायला निघते. मुलांना सकाळीच त्यांच्या शाळेत सोडते. आणि मग तिच्या शाळेत जाते. शाळेत गेल्यावर दोन तासाने जगदीश तिथे येवून पोचतो. पण ह्यावेळी ओरडण्याऐवजी विद्या बरोबर व्यवस्थित बोलतो. विद्या ची माफी मागतो. घरी चल अशी विनवणी करतो.
विद्या बरोबर कधी नव्हे ते अगदी लाडी – गोडी लावल्यासारखं बोलतो. विद्या मनातल्या मनात बोलते हे मला अपेक्षित च होत. विद्या जगदीश ला बोलते तुम्ही जा ईथून माझा निर्णय झाला आहे. मी आता त्या घरी पुन्हा केव्हाच येणार नाही आहे. जगदीश खूप समजावतो विद्या अजून विचार कर मला एक संधी दे असं बोलतो विद्या बोलते अहो दोन वर्ष संधी देतेय सुधारण्याची पण तुम्ही पण पुन्हा तसेच वागू लागता. त्यामुळे आता मी माघार घेणार नाही..
असेच आठ दिवस जातात. जगदीश त्या आठ दिवसात तीन – चार वेळा येवून विद्या ला विनवणी करून गेला. पण विद्या बधली नाही. दहा दिवसांनी बाबांनी विद्या ला सांगितल मला एक रूम आवडला आहे उद्या तू शाळेत जाताना माझ्याबरोबर चल आणि रूम बघून घे. विद्या ठरल्याप्रमाणे सकाळी बाबांनबरोबर जावून रूम बघून येते तिला रूम आवडतो. ती बोलते बाबा दोन दिवसांनी रविवार् आहे त्या दिवशी शिफ्टिंग करू आपण.
ओमकार गप्प गप्प असतो, विद्या ला मनातून वाटत कि ह्याला जगदीश भेटला तर नाही ना शाळेजवळ आणि त्याला काही सांगितल तर नाही ना...... तो इथे मामाकडे राहायचं म्हणून आला होता माझ्याबरोबर पण दोन दिवसांनी नवीन घरी येईल ना....ती ओमकार ला विचारते का रे शांत शांत आहेस तो काही नाही आई बोलून बाहेर झोपाळयावर बसायला जातो. विद्या ला टेन्शन येत. तिची आई आणि वाहिनी बोलतात विद्या आम्ही बोलतो त्याच्याबरोबर तू काळजी करू नकोस.
विद्या दोन दिवसांनी नवीन घरी साधसं गणेशपूजन करून शिफ्ट होते. घर तिच्या शाळेजवळ च असत. त्यामुळे तिला ते अजून सोयीस्कर वाटत. मुलांना स्कूल बस लावली जाते..... विद्या नवीन घर तिच्या पद्धतीने सजवते. मुल हि नवीन जागेत चांगली रुळत असत्तात. विद्या एकटी च सर्व म्यानेज करत असते. असाच एक महिना निघून जातो आणि ओमकार नेहमी संध्याकाळी पाच वाजता शाळेतून घरी येत असे, तो त्या दिवशी पावणे सहा वाजून गेले तरी स्कूल बस ने येत च नाही.. धनश्री ची शाळा सकाळची असल्यामुळे ती दुपारीच घरी येत असे. विद्या बसवाल्यांना फोन करते तर ते बोलतात आज त्याचे पप्पा शाळेत त्याला न्यायला आले होते तो त्यांच्याबरोबर गेला .....
विद्या खूप घाबरते, ओमकार ला जगदीश तिथे का घेवून गेला त्याच्या मनात काय असेल असे विचार करू लागते. विद्या जगदीश ला फोन करते तर जगदीश ओरडून बोलतो ये माझा मुलगा आता माझ्या बरोबर च राहील समजल तुला...आणि फोन ठेवून देतो ....विद्या रडायलाच लागते... काय करू तिला समजतच नसते. विद्या धनश्रीला म्हणते बऱ तो गेलाय तर आजचा दिवस राहूदेत त्याला तिथे उद्या सकाळी ह्या विषयावर काय तो निर्णय घेवूया...
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत .... ओमकार ला मिळवण्यासाठी विद्या ला अजून कोणत्या दिव्यातून जावे लागते....
लेखिका – सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
( राहणार- देवरुख – रत्नागीरी )
0

🎭 Series Post

View all