Login

तीच नशीब - भाग - 10

tich nashib


  – भाग - 10
लेखिका – सौ. सोनल गुरुनाथ शिंदे

विद्या ती पूर्ण रात्र रडून घालवते, ती काळजीत असते. तिला सारखी काळजी वाटत असते कि जगदीश ओमकार ला ठेवून तर घेणार नाही ना आणि ओमकार पण त्यांचा लाडका आहे त्याला खाऊ देतो, लाड करतो सांगितल तर तो हि तिथेच राहायला तयार होईल. विद्या सकाळ होण्याची वाट बघत बसते. सकाळी सात वाजताच ती जगदीश ला फोन करते तर तो फोन उचलत नाही. जवळजवळ दहा वेळा ती फोन करते पण जगदीश फोन उचलत नाही.
विद्या ला आता काय करावे काळात नाही ती शाळेत जावू कि नको आज ह्या विचारात असते पण ती म्हणते मी जाते आणि जाताना ओमकार ची शाळा पण लागेल तिथे जावून त्याला भेटून पण येते .ती ओमकार च्या शाळेत जाते तिथे त्याला भेटण्यासाठी निरोप देते, पण ओमकार बोलतो टीचर मला आई ला नाही भेटायचं आहे ..विद्या त्याच उत्तर ऐकून अचंबित होते ती बोलते टीचर एकदा बोलवा वर्गाबाहेर मी त्याच्याशी बोलते मग शिक्षिकेच्या भीतीने ओमकार बाहेर येतो आणि विद्या ला बोलतो आई तू जा ईथून मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे. आणि मी नवीन घरी पण येणार नाही आहे. मला आजीकडे च राह्यच आहे...
विद्या रडायला लागते. ओमकारला बोलते अरे बाळा असं काय करतो आहेस चल आपल्या घरी दीदी पण तुझी वाट बघते आहे. ओमकार शेवट पर्यंत नाहीच बोलत राहतो. शेवटी विद्या तिथून निघते. असेच चार दिवस निघून जातात. विद्या हतबल होते. विद्या ला सारख वाटत असत आजी ओमकार ला टीफिन तरी देत असेल का त्याचे ह्या सर्वात हाल होत असतील.
जगदीश ने त्याला नक्कीच काय तरी धमकावल असणार, काय बोलला असेल जगदीश तू तिथे गेलास तर आई आणि दीदी ला त्रास देईन, त्यांना मारेन विद्या ला आता चिंता वाटू लागते...... सासूबाई तशा कामाच्या बाबतीत आळशी होत्या हे तिला माहिती होते आणि ओमकार ला जेवण व्यवस्तीत लागत असे हे ती जाणून होती. त्यामुळे तीला त्याची काळजी वाटत होती.. विद्या वाट बघून ओमकार च्या क्लास टीचर ला सांगते प्लीज मी विनती करते तुम्हाला तुम्ही ओमकार ला जरा विचारा तू आई शाळेत आली का बोलत नाहीस तुला पप्पांनी आई ला का भेटू नको सांगितल आहे. टीचर बऱ मी विचारते बोलतात.
ठरल्याप्रमाणे टीचर ओमकार ला विश्वासात घेवून चौकशी करतात. ओमकार पहिला तर काहीच बोलत नसतो नुसता गप्प असतो पण नंतर सांगू लागतो. बाबा मला सारखी धमकी देतायत कि आईकडे गेलास तर तुझ्या आई ला कुठेतरी भेटून मारून टाकेन अशी. मी खूप घाबरलो आहे... आई ला काही व्हायला नको टीचर, माझी आई चांगली आहे तिला काही व्हायला नको टीचर.. असं बोलून ओमकार जोरात रडायला लागतो. टीचर बोलतात अरे मग तू हे आई ला काही सांगत नाही आहेस खर कारण तर तो बोलतो पप्पा बोललेत आई ला जर हे बोललास तर तुला तुला काठीने मारेन...
टीचर बोलतात अरे आई ला काही होणार नाही तुझी आई समर्थ आहे सगळ्या गोष्टी झेलायला.... तू काळजी करू नकोस. तू आज आई दुपारी लंच टाईम मध्ये तुला आई घ्यायला आली तर तू जाशील आई बरोबऱ ओमकार हो चालेल बोलतो.....कारण शाळा सुटण्याच्या वेळो जगदीश च येत असे .....टीचर लगेचच विद्या ला फोन करतात आणि सांगतात ओमकार हो बोलला आहे त्याला आज घरी घेवून तरी जा आणि तुमच्या परीने समजावा कसं ते. विद्या शाळेत जावून त्याला घरी घेवून येते.
ओमकार ला खूप समजावते , विचारते पप्पानी मारल का तुला तर तो सांगतो मी एक दिवसाने आई कडे जायचं आहे असा हट्ट करू लागलो तेव्हा पप्पांनी मला पट्टीने तीन – चार फटके मारले. विद्या बोलली बघ ओमकार तू ठाम राहा.... आज संध्याकाळी पण पप्पा इथे येवून तुला चल माझ्याबरोबर असं सांगतील तू सरळ बोल मला नाही यायचं आहे तुमच्याबरोबर .. ओमकार बोलतो आई मला भीती वाटते ग पप्पांची ते ओरडतील विद्या बोलते मी आहे ना...मी तुला ते यापुढे त्रास देणार नाहीत यासाठी लवकर च काहीतरी पुढच ठरवते.
जगदीश शाळेत जातो तर त्याला तिथे त्याला समजत कि ओमकार आई बरोबर गेला आहे जगदीश तसाच रागारागात विद्या च्या घरी जातो तिथे जावून खूप आरडओरड करु लागतो, ओमकार ला ओरडून बोलतो चल माझ्याबरोबर नाहीतर तुझ्या आईच काय करेन बघ.. विद्या बोलते जगदीश बस झाल आता तुमचे हे रोजचे तमाशे आता जर ऐकलात नाही तर मला नाईलाजाने पोलिसांना बोलवावं लागेल. जगदीश चिडून निघून जातो..
जगदीश त्याला रोज शाळेत जावून त्रास देत असतो पण विद्या ने शाळेत सांगितलेलं असत काहीही झाल तरी त्याला त्याच्या पप्पानबरोबर घरी पाठवायचं नाही त्यामुळे आता शिक्षक पण लक्ष ठेवून असतात. दहा – बरा दिवस प्रयत्न करून ओमकार ऐकत नाही बघून जगदीश तिथे जाणे बंद करतो. विद्या ला पण बऱ वाटत. विद्या आता ठरवते कि दोन दिवसात वकिलांशी बोलून घटस्पोटाचे पेपर्स तयार करायला सांगते.
पण ह्या सगळ्याचा ओमकार च्या मनावर खूप परिणाम होतो तो अस्वस्थ राहू लागतो., जेवत नाही , तो डीप्रेशन मध्ये जातो. तो एकटाच कोपर्यात बसून विचार करत राहत असे. शाळेत पण कशात लक्ष देत नसे. असेच सहा महिने निघुन जातात, धनश्री चांगल्या मार्काने दहावी पास होते कॉलेज ला प्रवेश घेते. ओमकार आठवी ला जातो...विद्या ओमकार कडे तिच्या परीने नित लक्ष देत होती..पण तिला तो खूप बुजल्यासारखा वाटे, पहिल्यासारखा हसत, खेळत राहत नसे. ती मध्यंतरी त्याला एका डॉक्टर पण कडे पण नेवून आणते, पण पाहिजे तसा फरक पडत नाही...
आणि एके दिवशी संध्याकाळी विद्या ला शाळेतून यायला उशीर होणार असतो म्हणून ती धनश्री ला कळवते तू घरी आहेस ना आज मला सहा वाजणार आहेत शाळेत .... धनश्री सांगते अग आई कॉलेज मध्ये मला पण एक - दोन तास उशीर होणार आहे एका प्रोजेक्ट च काम आहे आज मला उद्या पूर्ण करून द्यायचं आहे ते. विद्या आता चिंतेत पडते आणि शाळेत लगबगीने जावून हेड टीचर ना बोलते, मी अर्जंट घरी निघते माझ राहिलेलं काम उद्या सकाळी लवकर येवून करते. त्या हो चालेल बोलतात.
विद्या घाईघाईने घरी निघते विद्या दारात पोचते तर ओमकार दरवाजा च खोलत नसतो आणि आवाज पण देत नसतो ती खूप घाबरते ...ओमकार, ओमकार असे सगळे शेजारी वैगेर ओरडू लागतात. आणि शेवटी वाट बघून दरवाजा तोडतात.. तर समोरच दुश्य पाहून विद्या चक्कर च येवून पडते. ओमकार ने गळफास लावून घेतलेला असतो...
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत ओमकार च पुढे काय होत ते.....)
लेखिका – सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
( राहणार- देवरुख – रत्नागीरी )
0

🎭 Series Post

View all