Login

तीच नशीब - भाग - 11

tich nashib


  – भाग - 11
लेखिका – सौ. सोनल गुरुनाथ शिंदे

विद्याला थोड्या वेळाने शुद्ध येते, ती पुन्हा जोरात ओरडू लागते. अरे त्याला कोणीतरी खाली उतरवा रे....त्याच्याशी बोलुदेत मला, , काय करतोयस हे असं विचारुदेत .. तेवढ्यात धनश्री कॉलेज वरून येते. ती समोर च दृश्य पाहून हादरते. ओमकार ओमकार करून जोरजोरात रडायला लागते. आई काय केल हे ओमकार ने असं बोलून विद्या ला बिलगते. धनश्री बोलते आई का केल ग असं ओमकार ने ...एवढा त्याला कसला त्रास होत होता कि त्याने स्वतलाच संपवलं.


विद्या बोलते बघ ना ग काय केल हे ओमकार ने आपण दोघी घरी नाही बघून नको ते करून बसला बघ ना हा ..स्वतःचा जीव घालवला .... ओमकार ला खाली उतरवण्यात येत , त्याचा जीव गेलेला असतो.... विद्या खूप जोरजोरात रडायला लागते. काय करून बसलास तू ओमकार हे , अरे तुला एवढा कसला त्रास होत होता ते मला बोलायचस ना रे. आपण तिघांनी मिळून तुला पडणार्या प्रश्नाची उत्तर शोधली असती ना रे...एकदा बोलून बघायचं होतस ना रे. तुला होणारा मानसिक ताण आपण कमी केला असता ना रे...का हे नको ते पाऊल उचललेस तू....
विद्या च्या माहेरी कळवण्यात येत. विद्या चे माहेर चे सर्व येतात. विद्या आई – बाबांना बिलगून रडायला लागते , आई- बाबा बघा ना काय केल ह्याने हे ...एवढा कसला ह्याला सहन न होण्यासारखा त्रास होत होता कि त्याने हे एवढं टोकच पाऊल उचलाव......धनश्री पण बोलतो आजी सकाळी तर ओमकार एकदम व्यवस्तीत होता शाळेत जाताना .. काहीच असं करेल आल्यावर असं वाटत नव्हत....संध्याकाळी आल्यावर असं हे का केल त्याने असं अचानक काय झाल......
विद्या चा भाऊ जगदीश ला कसं सांगायचं असं विद्या ला विचारतो. विद्या बोलते ओमकार ची त्यबेत बरी नाही असं सांग आणि बोलाव इथे. ... विद्या ला माहित असत जगदीश चा ओमकार वर खूप जीव असतो. त्याला हा धक्का सहन च होणार नाही.....विद्या बोलते सासूबाई ना पण बोलाव त्यांना पण जगदीश बरोबर यायला सांग.
जगदीश ला विद्या चा भाऊ फोन करतो आणि सांगतो, भाओजी ओमकार ला जरा बऱ बाही आहे तुम्ही ताबडतोब विद्या च्या घरी या..... जगदीश फोन वर च विचारतो काय झाल ओमकार ला बऱ नाही सांगताय म्हणजे सिरिअस आहे का काही, कसा आहे तो हॉस्पिटल ला आहे का . तुमची बहिण काय करत होती मग एवढा माझा मुलगा आजारी पडेपर्यंत... विद्या चा भाऊ बोलतो भाओजी तुम्ही आधी या बघू इथे ... आणि आईना पण घेवून या ..हे बोलल्यावर मात्र जगदीश घाबरतो.. अहो आई ला पण घेवून येवू म्हणजे जास्त आहे का त्याची त्यबेत.. दादा हो बोलून फोन कट करतो.
इकडे जगदीश खूप घाबरतो. आई ला सांगतो चल पटकन आपल्याला ओमकार ला बघायला जायचं आहे त्याची त्यबेत बरी नाही आहे. जगदीश आणि त्याची आई लगेचच रिक्षा करून निघतात, विद्या च्या घरी पोचल्यावर तिथे बाहेर जमलेली गर्दी बघून जगदीश घाबरतो.. .. घाई- घाईने रिक्षातून उतरतो आणि विचारतो काय झाल आहे इथे एवढी गर्दी का आहे गर्दीतला एक माणूस बोलतो अहो मुलाने गळफास लावून घेतला हो ....काय कोणी..... असं ओरडतच जगदीश घरात घुसतो....
जगदीश ओमकार ला बघून बोलायला लागतो ओमकार चल उठ तू घरी चल, नको राहू आईबरोबर .. माझ बाळ असं का खाली झोपून आहे आई हा उठत का नाही आहे बघ असं त्याच्या आई ला बोलतो..... काय झाल माझ्या ओमकार ला का झोपून आहेस तू, उठ मी तुला ह्यापुढे अज्जिबात ओरडणार नाही मी तुझे खूप लाड करेन हा पण तू उठ बघू आधी असा पडून राहू नकोस हा...असं बोलून जोरजोरात रडायला लागतो.
विद्या ला बोलतो का केल त्याने हे, एवढं कसला त्रास होत होता त्याला कि त्याने स्वतःलाच संपवावे.. विद्या काहीच बोलत नाही. .. जगदीश विद्यालाच दोष देत असतो.....दोन तासाने ओमकार ला नेण्याची तयारी केली जाते. ओमकार च प्रेत उचललं जात. विद्या , धनश्री , जगदीश त्याला सोडतच नसतात. त्याला बिलगून रडत असतात.
थोड्या वेळाने ओमकार ला नेण्यात येत. जगदीश विद्या च्या घरी येत नाही .. बाहेर च्या बाहेर प्रेताच सर्व करून त्याच्या घरी जातो. विद्या च्या घरी तिची आई बारा दिवस राहायचं ठरवते...ओमकार च सर्व करेपर्यंत रात्रीचे बारा वाजून जातात. सर्व गेल्यावर विद्या धनश्री ला बोलते त्याच शाळेत तर कोणाबरोबर काही झाल नसेल ना ग... असं अचानक त्याने एवढं मोठ पाऊल का उचलाव तेच अजून मला कळत नाही आहे .. धनश्री बोलते आई मी चार दिवसांनी त्याच्या शाळेत जावून विचारते टीचर ला असं काही झाल होत का ते....
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत ओमकार ची टीचर काय सांगते ते.......)

लेखिका – सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
( राहणार- देवरुख – रत्नागीरी )
0

🎭 Series Post

View all