( लेखिका – सौ. सोनल गुरुनाथ शिंदे )
चार दिवसांनी धनश्री ओमकार च्या शाळेत जाते, आणि टीचर ला विचारते कि काही झाल होत का त्या दिवशी शाळेत तर त्या बोलतात त्याने असं केल्यावर मी वर्गातल्या प्रत्येक मुलाला बाजूला घेवून त्याच्या बरोबर मी नसताना काही भांडण झाल होत का असं विचारल कोणच काहीच सांगत नाही आहे सगळे बोलतात काही झालेले नव्हत. तो दिवसभर व्यवस्तीत होता अगदी.
टीचर बोलतात पण हल्ली तो खूप गप्प गप्प असायचा, मुलांमध्ये जास्त मिसळायचा नाही. सतत स्वतःच्याच विचारात असायचा. आता दोन दिवसापूर्वी रेगुलर प्रक्टिस टेस्ट घेतल्या होत्या मुलांच्या गणित विषयाच्या त्यात त्याने फक्त एकच गणित सोडवल आहे आणि बाकीचा एक तास तो नुसता इकडे तिकडे पहात बसला होता. मी त्याला दोन- तीनदा विचारल होत काही होतंय का तुला तू शांत का आहेस. तर तो काही नाही बोलून गप्प बसला...
त्याच्या डोक्यात सतत कसले तरी विचार चालू असायचे. त्याच हल्ली वर्गात अजिबात लक्ष नसायचं.. तो त्याच्याच तंद्रीत असायचा..धनश्री बऱ चालेल मी सांगते आई ला असं बोलून शाळेतून निघते. धनश्री विद्या ला येवून सांगते असं असं टीचर बोलल्या ते. विदया बोलते म्हणजे शाळेत सुद्धा तसं काही झालेलं नव्हत. मग का ह्या मुलाने एवढं मोठा निर्णय घेतला ते आता त्या देवाला च माहित. मग विद्या त्याच शाळेच दफ्तर तपासते ती म्हणते त्यात काही भेटत का बघू... तर त्यात पहिल्याच कप्प्यात एक चिठी सापडते. ..त्यात लिहिलेलं असत.
आई..... मी बाप्पा कडे चाललोय, दीदी आणि तू रडत राहू नका. ....हे एवढंच लिहिलेलं असत..विद्या आणि धनश्री चिट्ठी वाचून खूप रडतात..... विद्या म्हणते म्हणजे त्याने सगळ ठरवून केल होत. धनश्री ची ओढणी घेवून त्याने स्वतः चा गळा आवळून त्या खालचा टेबल त्याने च ढकलून दिला असणार. ...हि एवढी हिम्मत ह्या चौदा वर्षाच्या मुलात आली कुठून...... काय प्रोब्लेम होता त्याला ह्याचा विचार करून करून मी हैराण झाली आहे.
ओमकार च दहावं, बारावं होत .. जगदीश विद्याला च पूर्णपणे दोषी ठरवून मोकळा होतो. विद्या पंधरा दिवसांनी शाळेत जायचं असं ठरवते. विद्या ची आई पण बोलते आता मी घरी जाते... ती पण निघून जाते.. मग धनश्री आणि विद्या च घरी उरतात....धनश्री कॉलेज ला जायला सुरवात करते. विद्या धनश्री ला बोलते मी पुन्हा एकदा शाळेत जावून शिपायांना , टीचर ला विचारू का जगदीश तिथे गुपचूप ओमकार ला भेटायला यायचा का असं ..... त्याला काही त्रास देत तर नसेल ना ....त्याला घरी चल अशी जबरदस्ती तर करत नसेल ना तो.....
विद्या शाळेत जाते आणि विचारते. टीचर बोलतात, नाही त्याचे पप्पा आले नव्ह्ते इथे हल्ली दोन महिने... विद्या मनातून बोलते म्हणजे हि शंका होती मला.... हा विषय पण नाही आहे म्हणजे, मग हा मुलगा का असा वागला. विद्या जवळजवळ एक महिन्याने ह्या धक्क्यातून जराशी सावरते. ती म्हणते आता धनश्रीला चांगल शिकवून मोठी करूया.
( पुढच्या भागांत आपण बघणार आहोत – धनश्री शिकून आयुष्यात कशी पुढे जाते....)
लेखिका – सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
( राहणार- देवरुख – रत्नागीरी )

-
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा