Login

तीच नशीब - भाग - 13

tich nashib


 फासे - भाग - 13
लेखिका - सौ. सोनल गुरुनाथ शिंदे.

विद्या आणि धनश्री ह्या धक्क्यातुन जवळ जवळ दोन महिन्यांनी सावरतात. रक्षाबंधन जवळ येत असत त्यामुळे धनश्री चे डोळे ओंकार च्या आठवणीने सारखे भरून येत असतात...दोन दिवसांनी रक्षाबंधन च्या दिवशी दोघी ही तो पुरा दिवस रडून घालवतात...

विद्या ओंकार च्या फोटो जवळ जाऊन बोलते...बघ आज तू नाहीस म्हणून तुझ्या फोटो जवळ ही राखी ठेवावी लागतेय....कां रे असा वागलास....कां तुला आमच्या दोघींची काळजी वाटली नाही...तू मी आणि धनश्री सुखाने एकत्र राहिलो असतो ना रे...तू असं केल्यावर पप्पा तुझ्या आईलाच दोषी ठरवतील हे तुला समजत नव्हतं कां रे...विद्या जोरजोरात रडायला लागल्यावर धनश्री तिला धीर देते...आणि बोलते आई मी आहे ना तू काळजी करू नकोस..

विद्या सहा महिन्यांनी घटस्फोटा चे पेपर्स तयार करते..तिला मनातून भीती वाटत असते कि जगदीश काय रिऍक्ट करेल ह्याची...पण जगदीश च्या घरी पेपर्स गेल्यावर तो सही करून शांतपणे ते पेपर्स पाठवून देतो....विद्या मनातून सुटकेचा निःश्वास सोडते...लग्नाच्या वीस वर्षानंतर तिला सुटल्यासारख वाटत...

कालांतराने धनश्री पंधरावी होते..ह्या तीन वर्षात विद्या ने जगदीश बरोबर काहीच कॉन्टॅक्ट ठेवलेला नसतो..आणि एके दिवशी जगदीश चं फोन करतो आणि सांगतो..आई वारली...हार्ट अटॅक आला रात्री झोपेत...विद्या आणि धनश्री तिकडे पोचतात...विद्या ला पण मनातून खूप वाईट वाटत असतं...विद्या चा दादा, ती आणि धनश्री प्रेत निघाल्यावर तिथून निघतात...जगदीश अगदी एकटा पडलेला असतो...

विद्या आणि धनश्री घरी येतात..धनश्री आल्यावर बोलते आई आज पप्पा खूप हतबल वाटत होते..आज कधी नव्हे ते माझ्याशी पण दोन वाक्य नीट बोलले..कशी आहेस,अभ्यास कसा चालू आहे..अशी चौकशी करत होते...मला पण खूप बरं वाटल..विद्या ने हो बोलून विषय तिथे चं बंद केला..तू अभ्यास कर जा असं बोलून ती पण गप्प बसून विचार करत राहिली कि जगदीश आई गेल्यावर अगदी एकटे पडले असतील..

पण ह्या सर्वाला त्यांचं वागणं चं जबाबदार आहे ते जर माझ्याशी नीट वागले असते तर आज माझा ही चार - चौघीनं सारखा सुखाचा संसार असता.... त्यांनी मला कायम कमी चं लेखलं....जास्त पगार घेते म्हणजे मला खूप माज असणार हे पहिल्या पासून चं त्यांच्या सारखं डोक्यात असायचं...

माझ्याही काही आशा - अपेक्षा असतील ह्याचा त्यांनी कधीच विचार केला नाही..ते घरं कायम चं त्या माय - लेकाच आहे मी त्यांच्या घरात आश्रित आहे असचं त्यांनी भासवलं नेहमी...मी म्हणजे त्या घरातली - गुलाम होते.. सासू आणि नवरा जे सांगतील तेच कायम ऐकणारी नोकर चं होते मी...माझा पगार जास्त होता म्हणून मला माज आहे हे तर सासूबाईनचं नेहमीचं चं असे...

विदया विचार करता करता खुर्चीत बसून राहिली धनश्री अग आई आठ वाजत आले जेवण करतेस ना असं दोन तासांनी विचारायला आली तेव्हा ती गप्प झाली...हो चलं जेवण करायला घेते बोलून विद्या किचन मध्ये गेली...

अशीच मध्ये पाच वर्ष निघून जातात..धनश्री फार्मसी करून चांगली नोकरीला लागते...विद्या स्वतः साठी स्कुटी घेते..पहिलं घरं विकून थोडं अजून मोठं घरं घेते...धनश्री चं लग्नाचं वय होत आलेलं असतं..म्हणून विद्या तिच्या दादा ला एखादा चांगला मुलगा बघायला सांगते...

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - धनश्री च्या लग्नाबद्दल....)
( लेखिका - सौ. सोनल गुरुनाथ शिंदे )
( राहणार - देवरुख - रत्नागिरी )
0

🎭 Series Post

View all