Login

तीच नशीब - भाग - 14

tich nashib
फासे - भाग - 14
लेखिका - सौ. सोनल गुरुनाथ शिंदे.

विद्या तिच्या भावाला फोन करून सांगते कि धनश्री साठी एखादा चांगला मुलगा असेल तर सांग..तिला पंचवीसावं वर्ष चालू आहे, आता तिच्या लग्नाचं बघायला सुरवात करूया.. दादा हो चालेल बोलतो...तीन महिन्यांनी दादा च्या बायको च्या ओळखीतून एक चांगल स्थळ येत...मुलगा इंजिनिअर असतो.

फोटो बघून धनश्री ला तो मुलगा पसंत पडतो, त्याच स्वतःच मोठं घरं असतं. त्याच्या घरी आई - वडील तो आणि एक लहान बहीण असते..वडील डॉक्टर असतात. त्यांचं स्वतः चं क्लिनिक असतं.. छोटी बहीण अजून शिकत असतें.. त्याच्या आई चं पण छोटंसं ड्रेस मटेरियल चं शॉप असतं.. एकंदर सर्व चं छान असतं..

धनश्री बोलते आई मला त्या मुलाला आधी एकदा बाहेर भेटायचं आहे..त्याच्याशी बोलून बघायचं आहे...त्याचे विचार जाणून घ्यायचे आहेत... विद्या पण बोलते, हो तू बोलून नीट मग चं तुझा निर्णय घे. ठरल्याप्रमाणे विद्या आणि तो मुलगा एका कॉफी शॉप मध्ये भेटतात.

मुलगा एकदम सु - स्वभावी असतो. धनश्री सांगते कि माझी आई एकटीच असते. तीला कधी काही मदत लागली तर मला माहेरी येण्याला बंदी नसावी. मी आशा करते कि मी आई ला माझी गरज असल्यास मी आई कडे येण्याचं म्हंटल तर तुम्ही नाही म्हणणार नाही..तुमच्या घरचे पण या बाबतीत मला समजून घेतील ह्याची मी आशा करते...

मुलगा ( आदित्य ) खूप चांगला असतो. तो धनश्री चं सगळं ऐकून घेतो आणि मग बोलू लागतो..आदित्य बोलतो अग मी तुला माहेरी यायला नाही कां म्हणू..तुझी आई तुझी पहिली जबाबदारी आहे. मला कळतंय कि तुला तुझ्या आई ची खूप काळजी वाटते आहे...पण तू काळजी करू नकोस आता आपण दोघे आहोत तिच्यासाठी...

माझ्या घरातले तर खूप चांगले आहेत..जुनाट विचारांचे अज्जीबात नाही आहेत..उलट माझी आई चं तुला म्हणेल...कि तुझी आई एकटी असते तीला जाऊन अधून मधून जाऊन भेटून येत जा असं...धनश्री ठीक आहे बोलते...आदित्य बोलतो मला तू पसंत आहेस..तू तुझा निर्णय लवकर चं कळवं...धनश्री हो चालेल बोलून निघते...

धनश्री विद्या ला घरी येऊन सांगते मला मुलगा पसंत आहे..आपण पुढची बोलणी करूया..विद्या पण खुश होते...मग विद्या च्या माहेरचे आणि आदित्य च्या घरचे मिळून रविवारी बोलणी करायचं ठरवतात..बोलणी आदित्य च्या चं घरी ठेवली जाते..

त्या निमित्ताने आदित्य चं घर पण बघून होत...घरं खूप मोठं असतं, खुप छान पद्धतीने इंटीरीयर केलेलं असतं...बोलणी होते..पुढच्या महिन्यात गुढी - पाडवा असतो तर त्या दिवशी साखरपुडा आणि आणि त्या नंतर मे महिन्याच्या सुरवातीला लग्न असा प्रोग्राम ठरतो..

विद्या ला पण मनातून खूप बरं वाटत असतं...धनश्रीला सुशिक्षित आणि चांगल सासर मिळत....पण धनश्री ला विद्या आता एकटी पडणार म्हणून वाईट वाटत असतं...पण विद्या तीला सांगत असते तू माझी काळजी करू नकोस आणि तुझं सासर इथून दोन तासाच्या तर अंतरावर आहे..तू येत जा माझी आठवण आली कि......

एक महिना पटकन निघून जातो....आणि धनश्रीच्या साखरपुड्याचा दिवस चार दिवसांवर येऊन ठेपतो..तेव्हा विद्या ची वाहिनी तिच्याघरी तयारीला येते..वाहिनी आणि विद्या मिळून सगळी तयारी करतात..साखरपुडा जवळ च्या चं एका हॉलवर असतो...साखरपुडयाच्या दिवशी विद्या चे डोळे भरून येत असतात...पण ती धनश्री ला जाणवू देत नाही...

विद्या ची वाहिनी हळूच विद्या ला बोलते..ताई जगदीश रावांना कळवूया कां साखरपुड्याच...ते धनश्री चे वडील आहेत..आणि त्यांच्या मुलीच्या साखरपूड्याच त्यांना आमंत्रण द्यायला नको कां..विद्या बोलते आता राहुदेत बरं..आपण लग्नाचं आमंत्रण देऊ त्यांना....

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - धनश्री च्या लग्नाला जगदीश येतो कां ते....)

लेखिका - सौ. सोनल गुरुनाथ शिंदे.
( राहणार - देवरुख - रत्नागिरी )
0

🎭 Series Post

View all