लेखिका - सौ. सोनल गुरुनाथ शिंदे.
धनश्री चा साखरपुडा व्यवस्थीत पार पडतो. लग्नाला दीड महिना बाकी असतो..विद्या तीला बोलते तू हळू हळू तुला जमेल तशी तुझ्यासाठी खरेदी करायला सुरवात कर..मी लग्नाच्या आठ दिवस आधी पासून सुट्टी टाकेन...तो पर्यंत जमेल तसं दागिने कपडे ची खरेदी करूया.
आदित्य च्या घरचे लोक फार चांगले असतात..धनश्री ची सासू फोन करून विद्या ला सांगते जी खरेदी तुम्हाला एकटीला जमत नसेल त्या गोष्टी आम्ही घेऊ अगदी हक्काने सांगा. माझी काही मदत हवी असेल तरी सांगा...विद्या पण मनोमन सुखावते...आदित्य पण एकदा विद्या ला फोन करून ( आई ) तुम्हांला काही मदत लागली तर सांगा असं सांगतो..आदित्य ने आई म्हंटल्यावर विद्या च्या डोळ्यात चटकन पाणी येत..तीला ओंकार ची आठवण येते...
लग्न जवळ येत असतं, दहा चं दिवस लग्नाला राहिलेले असतात..धनश्री चं कन्यादान तिचे मामा - मामी करणार असतात...विद्याच्या माहेरचे तीला सर्वतोपारी मदत करत असतात..धनश्री लग्नाच्या दहा दिवस आधीपासून सुट्टी घेते. मामी आणि ती मिळून उरलेली खरेदी करतात..
लग्न जवळ येत असतं, दहा चं दिवस लग्नाला राहिलेले असतात..धनश्री चं कन्यादान तिचे मामा - मामी करणार असतात...विद्याच्या माहेरचे तीला सर्वतोपारी मदत करत असतात..धनश्री लग्नाच्या दहा दिवस आधीपासून सुट्टी घेते. मामी आणि ती मिळून उरलेली खरेदी करतात..
विद्या ला वाटत असतं जगदी्श ला आमंत्रण दयाव..ती म्हणते उदया शाळा सुटल्यावर त्या घरी जावं कां..पण एक मन म्हणत असतं नको त्या सगळ्या आठवणी. जगदीश सासूबाई गेल्यापासून एकटे चं राहतात..ते कसं म्यानेज करत असतील त्यांचं त्यांना चं माहित..त्यांना तर साधं जेवण बनवता पण येत नव्हतं...एवढ्या वर्षात मी कधीच मागे वळून पाहिलं नाही आणि त्यांनी पण काहीच कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न सुद्धा केला नाही..विद्या एकटीच विचार करत खुर्चीत बसून राहते.
विद्या बोलते.....पुन्हा रडायला येणार..आठवणी जाग्या होणार त्यापेक्षा नकोच...पण ती विचार करते कि ओंकार तर नाही आहे..एकच मुलगी आहे त्यांची तिच्या लग्नाचं तरी त्यांना सांगायला हवे ना...विद्या दुस्र्या दिवशी संध्याकाळी जगदीश ला लग्नाची पत्रिका द्यायला घरी जाते.
तर एक स्त्री दरवाजा उघडते.. विद्या बोलते कोण तुम्ही, जगदी्श हवे आहेत मला तर ती बोलते मी त्यांची पत्नी आहे..विद्या तीच उत्तर ऐकून अवाक चं होते. विद्या विचार करत उभी राहते..ती बाई पुन्हा विचारते तुम्ही कोण...विद्या बोलते..तुम्ही जगदीश ना बोलावता कां...
विद्या मनातल्या मनात बोलते जगदीश ने दुसरं लग्न केलं म्हणजे...तेवढ्यात आवाज ऐकून जगदीश बाहेर येतो...अरे विद्या तू...ये ये आत ये असा पटकन जगदीश बोलतो...बस ना, तो बायकोला पाणी आणायला सांगतो...विद्या च्या डोळ्यात पाणी येत असतं खरंतर पण ते लपवायचा प्रयत्न करून ती जगदीश ला बोलते...धनश्री चं लग्न आहे तीन तारखेला त्याचीच पत्रिका घेऊन आले होते...
जगदीश खुश होतो आणि बोलू लागतो..अरे वा...मी नक्की येईन लग्नाला..कोण मुलगा, कसं आहे सगळं ह्याची तो अगदी आत्मीयतेने चौकशी करतो...तुझं कसं चाललं आहे, कशी आहेस तू..कुठे राहतेस सध्या अशे सर्व प्रश्न तो तीला विचारतो...
विद्या चा कंठ अगदी दाटून येत असतो म्हणून विद्या मी घाईत आहे असं सांगून पटकन निघते..जगदीश ची बायको पण हो आम्ही नक्की येऊ असं सांगते...विद्या तिथून बाहेर पडते आणि खूप रडते .ती मनातल्या मनात म्हणते .जगदीश ने लग्न केलं, चला बरं झालं त्यांना पण जोडीदार मिळाला...त्यांना पण कोणाची तरी साथ हवी चं असेल ना...
विद्या ला आपला संसार, ते सासर सगळं आठवू लागत..तेवढ्यात ती घराजवळ पोचते... उगाच धनश्री समोर चेहरा रडवेला नको म्हणून ती डोळे पुसते आणि घरात जाते...ती धनश्री ला मी पप्पाना पत्रिका दिली आहे हे सांगत नाही.
लग्नाचा दिवस जसं जसा जवळ येत असतो तसं तीला अजून एकटं एकटं वाटत असतं...धनश्री ला हळद लावली जाते..दुसऱ्या दिवशी लग्न असतं...
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - जगदीश लग्नाला एकटाच येतो कि त्याच्या बायकोला पण घेऊन येतो आणि त्यामुळे त्यावर धनश्री ची प्रतिक्रिया काय असेल..)
(लेखिका - सौ. सोनल गुरुनाथ शिंदे.)
( राहणार - देवरुख - रत्नागिरी )
( राहणार - देवरुख - रत्नागिरी )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा