लेखिका - सौ. सोनल गुरुनाथ शिंदे.
लग्नाची पूजा झाल्यावर दोन दिवसांनी नवीन जोडपं देव-दर्शनाला जावून येत. त्यानंतर धनश्री दहा दिवस सुट्टीवर असते. पाच – सहा दिवसांनी धनश्रीला बोलते तुझी सुट्टी संपायच्या आधी दोन दिवस माहेरी राहायला ये, धनश्री सासूबाई ना विचारते तर त्या हि हो जा असं बोलतात. विद्या ने ठरवून ठेवलेलं असत कि – धनश्री आल्यावर तिला जगदीश च्या लग्नाबद्दल सांगायचं ...तिला पण माहित पाहिजेच असं तिला वाटत असत.
धनश्री माहेरी लग्नानंतर पहिल्यांदा राहायला येते. सासरच खूप कौतुक सांगत असते. नणंद तर अगदी मैत्रिणी सारखी आहे, सासूबाई खूप प्रेमळ आहेत आणि सासरे तर मला आरोही बेटा अशीच हाक मारतात. खूप सगळे छान आहेत. मस्त आम्ही सगळे गप्पा मारत मारत नाश्ता, जेवण करत असतो.
नणंद तर खूपच गोड आहे, सारखी वहिनी – वहिनी असं च करत असते. आई आणि मी गप्पा मारत , हसत मस्त स्वयंपाक करत असतो. आदित्य पण खूप चांगला आहे , मला समजून घेतो, घरी लादी – भांडी हि काम करायला एक बाई येतात. त्यामुळे तशी दगदग नसते कामांची, आई छान छान नवीन पदार्थ बनवतात. आई आणि मी जवळच्या दोन देवळात पण जावून आलो. असं सर्व धनश्री आनंदाने सांगत असते. विद्या ला पण खूप छान वाटत हे सर्व तिच्या सासरच कौतुक ऐकून.
विद्या बोलते – बाळा मला तुला काहीतरी सांगायचं आहे ..विद्या बोलते – परवा मी घरी पत्रिका दयायला गेली होती बघ तेव्हा समजल पप्पांनी दुसर लग्न केल आहे ..त्यांची बायको होती घरी. धनश्री बोलते काय सांगतेस आई आपल्याला काही माहितच नव्हत बघ ह्यातलं. ती म्हणते आई – पप्पांना त्या दिवशी मला नवरी च्या वेशात बघून रडायला येत होत, ते हुंदका आवरत होते अग.. विद्या बोलते हो मला समजल ते.
धनश्री दोन दिवस राहून सासरी निघुन जाते. विद्या दोन दिवसांनी शाळेत जायला सुरवात करते. आता शाळेतून आल्यावर विद्या एकटीच असे घरी. विद्या तिच्यापुरत काही तरी जरास जेवण बनवत असे, आणि मग वाचन करत राहत असे. अधून मधून धनश्री आणि आदित्य विद्या ला भेटायला येत असत. असेच दिवस जात होते. धनश्री च्या लग्नाला वर्ष होत आलेलं असत.
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित धनश्री आणि आदित्य अष्टविनायक ची चार दिवसांची ट्रीप ठरवतात.. विद्या आणि धनश्री च्या घरचे असे सहा जण मिळून जायचं ठरत. सगळे मस्त चार दिवस पिकनिक एन्जॉय करून येतात. विद्या ला पण बऱ वाटत ती पण बरेच वर्ष कुठेच फिरायला गेलेली नसते. धनश्री पण सासरी खूप खुश असते. लग्नानंतर दोन वर्षांनी धनश्री गरोदर राहते , सगळ्यांना खूप आनंद होतो.
धनश्री ला नऊ महिन्यांनी गोंडस मुलगी होते. धनश्री बोलते आई – पपांना बारश्याचे आमंत्रण देवूया ना. त्यांची पण नात आहे ना ती.. विद्या हो चालेल बोलते.
विद्या आणि धनश्री ची सासू बारश्याच आमंत्रण दयायला जातात तर तिथे समजत जगदीश खूप आजारी आहेत हॉस्पिटल ला आहेत असं. त्यांना लंग्स चा कॅन्सर झालेला असतो, विद्या मनातल्या मनात बोलते अरे जगदीश ची तशी नोकरी पण निट नाही आहे त्यामुळे आजारपणाला खर्च येत असेल त्याच ते कसं करत असतील.
विद्या हे ऐकून खूपच अस्व्वस्थ होते. तिला वाटत कसेही असले तरी ते माझे पती आहेत, त्यामुळे त्यांना ह्या आजारपणात काही पैश्याची मदत लागली मदत लागली तर मी जरूर करेन. तसा त्यांना जास्त पगार नाही आहे त्यामुळे सेविंग पण नसेल एवढी.. विद्या उद्या हॉस्पिटल ला जायचं ह्या विचाराने तिथून निघते.
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत – जगदीश ह्या आजारातून बरा होतो कि नाही ते.)
लेखिका - सौ. सोनल गुरुनाथ शिंदे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा