Login

तीच नशीब - भाग - 18

tich nashib


 फासे - भाग - 18

विद्या दुस्र्या दिवशी सकाळी हॉस्पिटल ला जाते. जाताना बऱ्या पैकी कॅश घेऊन जाते..ती बोलते जगदीश च्या बायकोला विचारते काही मदत हवी आहे कां...विद्या हॉस्पिटल ला पोचते...जगदीश ची त्यबेत खूप च खालवलेली असते. त्याचा कॅन्सर थर्ड स्टेज ला असतो...

विद्या हॉस्पिटल ला पोचल्यावर त्याच्या बायकोला बोलते अहो कळवायचत तरी त्यबेत एवढी खराब आहे ते...ती बोलते अहो हे दोन महिने घरीच आहेत, बरं नाही जास्त म्हणून , विद्या बोलते एक निरोप तरी द्यायचात ना, विद्या पन्नास हजार कॅश घेऊन गेलेली असते, विद्या जॉब ला चांगली असल्यामुळे तिच्याकडे सेविंग बऱ्या पैकी असते..विद्या ते पैसे जगदीश च्या बायको च्या हातात देते आणि बोलते अडिअडचणी ला असूदेत पैसे तुमच्याकडें...

ती नको नको बोलत असते पण विद्या जबरदस्तीने तिच्या हातात पैसे ठेवते..जगदीश ला विद्या बोलते असूदेत पैसे, विद्या विचारते डॉक्टर काय बोललेत, तर जगदीश ची बायको बोलते ट्रीटमेंट चालू आहे, बघूया काय सुधारणा होते ते...विद्या अर्धा तास हॉस्पिटल ला बसते आणि मग शाळेत जायला निघते...

धनश्री च्या बाळाचं बारसं होत, बाळाचं नाव ( श्रेया ) ठेवलं जातं. धनश्री डिलिव्हरी ला माहेरी आलेली नसते, कारण विद्या शाळेत जातं असे, त्यामुळे तिची सासू बोलली मी घरी असते तर तू इथेच राहा आपण तुझे डोहाळे पुरवू...सर्वानुमते ठरत कि डिलिव्हरी ला धनश्री सासरी च राहिलं असं त्यामुळे बाळ एक महिन्याचं झाल्यावर धनश्री आठ दिवसांसाठी बाळाला घेऊन विद्या कडे राहायला येते.

विद्या - धनश्री ला बोलते तू पप्पाना जाऊन भेटून ये, त्यांना हॉस्पिटल मधून घरी सोडलं आहे..धनश्री - आदित्य दोघेही बाळाला घेऊन जगदीश ला भेटायला जातात. जगदीश छोटी ला बघून खूप भावुक होतो, त्याचे डोळे भरून येतात....तो धनश्री ला बोलतो....माझी नात खूप गोड आहे...पुन्हा नक्की भेटायला येते असं सांगून धनश्री थोड्या वेळाने निघते...

धनश्री पण पप्पा काळजी घ्या, मी फोन करेन सांगून निघते. धनश्री, आदित्य घरी पोचून अर्धा तास चं होत नाही तो पर्यंत जगदीश वारला असा त्याच्या शेजार्यांचा विद्या ला कॉल येतो...धनश्री माहेरी चं आलेली होती...ती पण बोलते आई आता तर पप्पा बोलले माझ्याशी...पप्पा लगेचच ऑफ झाले..विद्या मनातल्या मनात बोलते कदाचित तुझ्यासाठी चं त्यांचा जीव अकडून राहिला होता.

विद्या आणि तिचा भाऊ जगदीश कडे जातात. विद्या ला पण खूप वाईट वाटत असतं.. विद्या जगदीश चं प्रेत नेल्यावर थोड्या वेळाने घरी यायला निघते त्याच्या बायकोला बोलते काही गरज लागली तर नक्की कळवा ती पण हो बोलते...विद्या घरी येते...तिच्या डोळ्यासमोर तीच लग्न, सासर, जगदीश बरोबर केलेला संसार हा सगळा जीवनपट येत असतो.

धनश्री घरी आलेली असते...विद्या तीला बोलते मी जरा दोन तास बेडरूम मध्ये बसते आहे..विद्या आत जाऊन बसते आणि खूप रडते...जगदीश नावाचा अध्याय आपल्या आयुष्यातून संपला आहे...जगदीश वारले...तीला तिने सहन केलेला त्रास, जगदीश चं ते दारू पिऊन घरात गोंधळ घालणं, त्याच्या आईच तिच्याशी कुचकट वागणं, हे सगळं तिच्या डोळ्यासमोर येत...पण धनश्री आणि बाळ घरी आलेले असतात म्हणून विद्या स्वतः ला सावरते.

धनश्री आठ दिवस माहेरी राहून पुन्हा सासरी जायला निघते..विद्या पण दोन दिवसांनी शाळेत जायला निघते..जगदीश वारलेल्याला आता एक महिना होत आलेला असतो आणि त्याची बायको एक दिवस विद्या ला कॉल करते. आणि सांगते जरा तुमच्याशी बोलायचं आहे घरी येऊन जाल कां..विद्या हो चालेल बोलते...

विद्या - जगदीश च्या घरी जाते, त्याची बायको बसा बोलते, विद्या ला पाणी आणून देते..आणि सांगू लागते...मी आता इथून कायमची निघून जाणार आहे त्याआधी काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत, आणि त्या गोष्टी जगदीश वारल्यानंतर सांगणं गरजेचं आहे...

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - जगदीश ची बायको विद्या ला काय सांगते ते...)
लेखिका - सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
0

🎭 Series Post

View all