Login

तीच नशीब - भाग - 19

tich nashib
फासे - भाग - 19

( विद्या बोलते - हा बोला ना....काय सांगायचं आहे तुम्हाला मला....जगदीश ची बायको बोलते..बसा हा मी पेपर्स घेवून येते....विद्या बोलते कसले पेपर्स, तुम्ही कशा बद्दल बोलत आहात ते जरा मला समजावून सांगता कां....जगदीश ची बायको ( सरिता ) बोलते....मी आज तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे... आणि तिच्या डोळ्यांत पाणी येत..विद्या बोलते रडू नका...सावकाश सांगा...

सरिता सांगू लागते...सर्वप्रथम मी कोण आहे, कुठून आली आहे, जगदीश बरोबर लग्न कां केले ह्या बद्दल तुम्हाला सांगणार आहे...मी मूळची अहमदनगर ची आहे...आणि इथे मला आमच्या गावच्या एका माणसाने प्रेमात फसवून आणले होते...मी तेव्हा बावीस वर्षाची होती आणि तो व्यक्ती पंचवीस वर्षाचा होता....माझं खूप प्रेम होत त्याच्यावर...आणि माझा असा भ्रम होता कि तो ही माझ्यावर खूप प्रेम करतो आहे...पण तो भ्रम चुकीचा होता..

माझ्या घरची आर्थिक स्थिती चांगली होती..वडील एका ऑफिस मध्ये मॅनेजर होते....दादा चं लग्न झालं होत, त्याला एक मुलगा होता - दोन वर्षाचा..वहीनी घरी आठवी ते दहावी चे क्लासेस घेत असे..आई ने पण मला खूप समजावून पाहिलं कि तो मुलगा चांगला नाही आहे असं पण माझ्या डोळ्यावर प्रेमाची धुंदी होती ना मी कोणाचंच ऐकत नव्हती.

घरचे सगळे ह्या नात्याच्या विरोधात होते, पण मी वेडी त्याच्या प्रेमात आंधळी झालेली होती...माझे आई - वडील, काका - काकी, दादा - वहिनी सर्व चं तो मुलगा चांगला नाही आहे, त्याचं चाल - चलन वाईट आहे असं सांगत होते....पण म्हणतात ना प्रेम आंधळं असतं, मला त्या वेळी त्याच्या प्रेमाशिवाय काहीच दिसत नव्हतं...

मी घरचे सगळे समजावून सुद्धा, माझ्यावर त्यांनी बाहेर जाण्यासाठी बंधने लावून सुद्धा मी त्याच्या बरोबर पळून गेले, घरं सोडून निघाले..त्याने मला चार दिवस खूप छान छान ठिकाणी फिरवले..मला त्या चार दिवसात अज्जीबात जाणवलं नाही कि त्याने मला फसवलं आहे...

आणि पाचव्या दिवशी फिरता फिरता तो मला एका बीच वर घेऊन गेला..आणि बोलला तू इथे बस मी पाच मिनिटात इथे बाजूला जाऊन आपल्या दोघांसाठी भेळ घेऊन येतो.मी हो चालेल बोलले....मी पण मोठया विश्वासाने त्याची वाट बघत तिथे समुद्र बघत बसली...दुपार ची संध्याकाळ झाली तरी तो आलाच नाही..


सहा वाजता त्याचा एक मित्र आला आणि बोलला त्याला एका ठिकाणी अचानक जावं लागलं म्हणून मी तुला न्यायला आलो आहे..मी तुम्हाला त्याने सांगितलेल्या ठिकाणी बरोबर पोचवतो...आणि मी पण वेडी त्याच्यावर आंधळा विश्वास असणारीअशी होते....

मी त्यांच्या मित्राने त्याला माझ्या समोर खोटा खोटा कॉल केला आणि बोलला सरिता ला घेऊन येतो हा....मला ते सगळं खरं वाटलं...आणि मी त्या माणसाबरोबर सरळ रिक्षात बसून गेली...आणि त्या मुलाने मला एका अशा ठिकाणी नेले. ज्या ठिकाणी मी कधीच चुकून पण गेली नसती...

त्याने मला नेवून कुंटनखाण्यात विकले होते.....पुढे मला काय काय भोगावे लागले ..पुढे मला जगदीश कशे भेटले ते सगळं मी सांगते....

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - सरिता आणि जगदीश ची भेट कशी झाली....

( लेखिका - सौ. सोनल गुरुनाथ शिंदे )
( राहणार - देवरुख - रत्नागिरी )


0

🎭 Series Post

View all