Login

तीच नशीब - भाग - 20

tich nashib


 फासे - भाग - 20

सरिता बोलू लागते - मी तिथे गेल्यावर खूप रडली, बाहेर पळून जायचा खूप प्रयत्न केला पण मला कोंडून ठेवण्यात आलं, आठ दिवस त्या लोकांनी मला खूप मारलं...मी एकच सांगत राहिली त्या कोठेवालीला कि मला इथून सोडा...पण सगळं व्यर्थ होत तिथे माझा आवाज ऐकणार कोणी नव्हतं...

..शेवटी दहा दिवसांनी त्या लोकांनी माझं खाणं - पिणं बंद केलं..मग शेवटी भुकेने आणि तहानेने माझा जीव कळवळू लागला..आणि मी हार मानली...मी शेवटी त्या सगळ्याला सामोरं जायला तयार झाली...आणि पहिल्याच दिवशी जगदीश त्यांच्या एका मित्रा बरोबर तिथे आले होते म्हणजे त्यांच्या मित्राने त्यांना आणलं होत..

जगदीश तेव्हा थोडी दारू पिऊन आले होते, पण बऱ्यापैकी शुद्धीत होते...त्यांना मी अगदी रडून रडून विनंती करत होते इथून प्लिज मला सोडवा ना...ते म्हणाले माझ्याकडे एवढे पैसे नाहीत कि मी त्या बाईला पैसे देऊन तुम्हाला इथून सोडवू शकतो..पण एक मात्र करू शकतो मी पोलिसांना कळवतो..कि इथे तुम्हाला कोंडून ठेवण्यात आलं आहे असं...मी म्हंटल.... साहेब कळवा प्लिज तुमचे खूप उपकार होतील...

तीन दिवसांनी तिथे पोलिसांनी रेड टाकली, आणि त्या रेड मध्ये मी पोलिसांना सांगितलं कि मला इथे फसवून आणलं होत..त्यांनी माझी सुटका केली तेव्हा मी त्यांना म्हंटल कि हे तुम्हाला कोणी कळवलं तर त्यांनी जगदीश चं नाव सांगितलं..मी म्हंटल मला त्यांचा पत्ता द्या मी त्यांना जाऊन भेटते..आणि अशाप्रकारे मी जगदिश च्या घरी त्यांना थँक यू बोलण्यासाठी गेले...

तिथे गेल्यावर मी बघितलं जगदीश एकटेच राहत होते, दोन दिवसापासून ची एक भाकरी होती एका डब्यात ती ते अक्षरशः लोणच्या बरोबर खात होते.....मी त्यांची चौकशी केली तेव्हा कळलं त्यांची बायको सोडून गेली आहे...त्यांची आई वारली आहे...मी त्यांना म्हंटल तुम्ही एकटेच राहता तर ते हो म्हणाले.

मी खूप विचार केला आणि असं ठरवलं कि आता मी पुन्हा माहेरी गेली तर वीस दिवस बाहेर असलेल्या मुलीला कोण सन्मानाने घरी घेईल...त्यापेक्षा मी जगदीश एकटेच आहेत तर त्यांना जेवण वैगेरे करून देऊन मदत तरी करेन ना...मी जगदीश ना विचारलं मला कुठे राहायला जागा शोधण्यापेक्षा मी इथे राहू कां - जगदीश म्हणाले नको..मी आहे तो एकटाच बरा आहे...

मी खूप विनवण्या केल्यावर ते हो बरं रहा बोलले...मी तिथे राहू लागले..पण शेजारी - जगदीश ना पंधरा दिवसात चं त्रास देऊ लागले, आडून आडून ही कोण असं विचारू लागले म्हणून मग मीच त्यांना म्हंटल आपण समाजाला दाखवण्यासाठी तरी लग्न करू...अशा प्रकारे आमचे लग्न झाले...आणि आम्ही पती - पत्नी झालो...

जगदीश च्या तुटपुंज्या पगारात मी संसार करत होते, पण त्यांना कॅन्सर झाला आणि मग ते खूपच खचून गेले....सारखे बोलून दाखवत - मी धनश्री आणि विद्या ला त्रास दिला ना म्हणून देवाने मला ही शिक्षा दिली....कर्माची फळ ही भोगावी चं लागतात..आणि ती मी भोगतोय..असं बोलून रडत असतं...

जगदीश गेले त्यामुळे मी आता इथे राहणार नाही आहे मी हे शहर सोडून जातं आहे...मी माझं उरलेलं आयुष्य एका निराधार व्यक्ती असणाऱ्या आश्रमात व्यतीत करणार आहे...माझं उरलेलं आयुष्य मला शांततेत घालवायचं आहे...

तत्पूर्वी मला काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या..त्या अशा कि हे ह्या घराचे पेपर्स - हे घरं जगदीश ने धनश्री च्या नावावर केले आहे...आणि सासूबाईनची एक बोरमाळ आहे ती धनश्री ला त्यांनी द्यायला सांगितली आहे....ती माळ आणि हे घराचे पेपर्स द्यायला मी तुम्हाला देण्यासाठी इथे बोलावलं होत...

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत ह्या सगळ्यावर विद्या ची रिऍकशन काय असेल ते....)
( लेखिका - सौ.सोनल गुरुनाथ शिंदे )