Login

तीच नशीब - भाग - 21

tich nashib


 फासे - भाग - 21

विद्या हे सर्व ऐकून आश्चर्यचकित होते.....हे सर्व ऐकून विद्या बोलते अहो ही रूम जगदीश नी धनश्री च्या नावावर कां केली..तुम्ही रहा इथे धनश्री ला मी ह्यातलं काहीही सांगणार नाही...माझी खरंच कशाला चं हरकत नाही आहे...आणि धनश्री पण तिच्या घरी खूप सुखी आहे तीला पण ह्यातलं काहीही नको असेल...

..जगदीश ची बायको बोलते, अहो त्यांना मी ते लास्ट स्टेज ला होते तेव्हाच बोलली होती कि तुम्ही सगळं धनश्री च्या नावावर करा...मला काही ही नको...सोनं पण मला काहीही नको...मी इथून जाणार चं आहे...माझा आश्रमात जाण्याचा निर्णय कधीच झाला होता...

जगदीश ची बायको बोलते मी उदया इथून निघून जाणार आहे..माझी उदया च्या ट्रेन ची बुकिंग आहे..त्याआधी तुमच्या हातात हे सर्व सुपूर्त करावं म्हणून तुम्हांला मी इथे बोलावलं...ती जबरदस्ती ते पेपर्स आणि बोरमाळ विदया च्या हातात ठेवते आणि बोलते मी उदया तुम्हाला जाताना तुमच्या घरी येऊन ह्या रूम ची चावी देऊन जाईल...

ती ऐकत नाही बघून विद्या ते सर्व घेऊन तिचा निरोप घेऊन निघते...विद्या घरी येते..आणि फ्रेश होऊन सर्व गोष्टींचा विचार करत बसते..ती बोलते जगदीश नी घर धनश्री च्या नावावर कां केलं, त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली होती कां....त्यांना आपली मुलगी आहे आणि आपण तिच्या सोबत चुकीचे वागलो आहोत आजपर्यंत.....ह्याची जाणीव झाली असेल कदाचित....

विद्या - धनश्री ला फोन करते आणि सांगते उदया जरा ऑफिस ला जाताना घरी येऊन जा....धनश्री सकाळी घरी येते आणि विद्या तीला काल घडलेलं सगळं सांगत असते तो पर्यंत जगदीश ची बायको निघताना घरची चावी द्यायला येते....धनश्री तीला बघून बोलते...अहो मला काही नको तुम्ही रहा तिथे...धनश्री ला बघून तिच्या डोळ्यात पाणी येत..ती बोलते....धनश्री बाळाला सांभाळ...तिची काळजी घे..धनश्री तीला थांबवण्याचा प्रयत्न करते.

पण ती डोळ्यातली आसवं लपवत पटकन धनश्री च्या हातात घराच्या चाव्या देऊन निघून जाते...विद्या आणि धनश्री दोघी ही रडायला लागतात...विद्या बोलते आई मला हे सर्व पप्पांनी द्यायची गरज नव्हती...विद्या बोलते अग त्यांनी स्वइच्छेने तुला हे सगळं दिल आहे...धनश्री बोलते आई त्या रूम चं काय करायचं गं आपण...विद्या बोलते बघू विचार करू...आदित्य बरोबर पण चर्चा करू ह्या विषया बद्दल आणि मग ठरवू....

धनश्री आणि विद्या दोघी ही एकत्रच निघतात..विदया शाळेत जाते, धनश्री ऑफिस ला जाते...विद्या मनातल्या मनात बोलते मी एवढी शिकले, चांगल्या पदाची नोकरी स्वतः च्या हिमतीवर मिळवली....माझ्या आयुष्यात जगदीश आले आणि सर्व चं वाताहत झाली...जगदीश ने मला थोडं तरी समजून घेतलं असतं ना तर मी ही त्यांच्या साथीने सुखाचा संसार केला असता..

ह्या सगळ्या आमच्या दोघांच्या भांडणामुळे माझ्या सोन्या सारख्या मुलाने ( ओंकार ) ने मानसिक त्रासामुळे स्वतः चा जीव गमावला...देवाच्या कृपेनें धनश्री चांगली शिकली, तिची प्रगती झाली...तीला सासर पण छान मिळालं आहे...मला नात पण झाली...माझी रिटायरमेन्ट ची दोनच वर्ष राहिली आहेत.... आजपर्यंत माझ्या नोकरीमुळे मी कधीच कोणावर अवलंबून राहिले नाही, ती खूप वेळ रात्री विचार करत बसलेली असते..

रात्री चे साडे - बारा वाजलेले असतात आणि तिच्या दादाचा कॉल येतो, विद्या बोलते एवढ्या रात्री दादाचा फोन.... ती घाबरते आणि पटकन फोन उचलते...दादा सांगतो..अग विद्या.. बाबा हार्ट अटॅक ने गेले...तू घरी ये, मी माझ्या मित्राला गाडी घेऊन पाठवतो...विद्या रडायला लागते आणि बोलते हो मी येते.....

विद्या गाडीने घरी पोचते.. धनश्री आणि आदित्य पण येतात...विद्या वहिनीला म्हणते बाबांनी मला कायमचं माझ्या सर्व निर्णयात साथ दिली..त्यांच एकच वाक्य असायचं..विद्या तू निर्णय घेतला आहेस म्हणजे तो पूर्णपणे विचार करूनच घेतला असणार..विदया आई ला सावरते...सगळे पाहुणे जमतात आणि सकाळी सात वाजता च्या दरम्यान बाबांचं प्रेत नेलं जातं...विदया एक दिवस माहेरी राहून पुन्हा घरी येते...

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - धनश्री त्या रूम बद्दल काय निर्णय घेते ते....)

लेखिका - सौ. सोनल गुरुनाथ शिंदे....

0

🎭 Series Post

View all