Login

तीच नशीब - भाग - 22 ( अंतिम भाग )

tich nashib


 फासे - भाग - 22 ( अंतिम भाग )

धनश्री आणि आदित्य पंधरा दिवसांनी विदया च्या घरी आले, त्या नंतर त्या रूम चं काय करायचं ह्या विषयावर सगळे चर्चा करणार होते. विदया आदल्या दिवशी रात्री विचार करत बसते कि त्या रूम मधल्या सामानाचं काय करायचं. जगदीश च्या संसाराच्या आठवणी त्या वस्तू मध्ये आहेत....

जगदीश ची बायको बोलली होती...त्या रूम मधलं सामान म्हणजे - एक बेड, फ्रीज, एक कपाट, आणि गॅस आणि सिलेंडर, टी व्ही....हे सर्व रूम मध्येच आहे...विदया मनातल्या मनात बोलते एखाद्या गरजू व्यक्तीला ह्या वस्तू दयाव्यात कां..तीला पटकन आठवत कि शाळेतल्या कचरा, लादी, साफ - सफाई करायला येणाऱ्या मावशी आहेत त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती - गरीब आहे, विदया बोलते चार दिवसांनी त्या मावशींना सांगते कि येऊन ह्या सगळया वस्तू घेऊन जा....

विदया धनश्री ला बोलते....मला काही नको त्या रूम मधलं, पैसे पण नकोत हा..माझ्या पगारातले मी एकटीच असल्यामुळे जास्त पैसे खर्च होत नाहीत...त्यात मी रिटायर झाल्यावर ही मला सर्विस चे पैसे मिळतील..पुन्हा मला बऱ्यापैकी पेन्शन ही बसेल त्यात माझं उरलेलं आयुष्य सुंदर जाईल...

धनश्री बोलली..अग आई मग काय करायचं...आणि तो एरिया पण थोडा आत आहे त्यामुळे मला तिथे जाऊन कधीतरी राहणं पण तेवढं योग्य वाटत नाही आहे...त्यामुळे तो रूम विकलेला चं बरा असं वाटतंय...

विदया बोलली, असं केलं तर..... ती रूम विकून त्याचे जे काही पैसे येतील ते आपण बाळाच्या ( श्रेयाच्या ) नावे त्याची एफ डी केली तर....आदित्य पण बोलला - आई ही आयडिया छान आहे.. श्रेया च्या शिक्षणाला चं डायरेक्ट हे पैसे वापरूयात...म्हणजे जगदीश ने जे घरं धनश्री च्या नावावर केले आहे त्याचे पैसे चांगल्या कार्याला पण खर्ची होतील...

मग तिघांच्या मते हा निर्णय पक्का झाला...आणि मग दोन दिवसांनी रूम विकण्यासाठी एजन्टबरोबर चर्चा करून आदित्य ने रूम विकायला काढली..एक महिन्यांनी रूम विकली गेली...धनश्री ने ते पैसे बँकेत एफ डी मध्ये ठेवले. श्रेया हळू हळू मोठी होत होती...

विदया दोन वर्षांनी रिटायर झाली..तिने त्या नंतर एक महिन्याने अष्टविनायक यात्रा करायचं ठरवलं, धनश्री चे सासू - सासरे आणि विदया अशे तिघे जण यात्रा करून आले...विदयाला वाचनाची खूप आवड होती.. आता जमतील तेवढी पुस्तकं आणि कादंबऱ्या वाचून आपला वेळ व्यतित करावा असं तिने ठरवलं....

धनश्री ने पण एका मुलीवर चं थांबायचं ठरवलं..तिने श्रेया ला छान शिकवले...आदित्य पण नेहमी विदया ची चौकशी करत असे..तीला कायम आई सारखं चं वागवत असे....विदया ने मैत्रिणींनबरोबर देव - दर्शन करणे, फिरणे...हे सर्व चालू केले...त्यात तिचा वेळ जाऊ लागला...

श्रेया खूप शिकली, डॉक्टर झाली. तिने घरच्या सर्वांना - आजी, आजोबा, आई - बाबा, विदया ह्या सर्वांना घेऊन परदेश वारी पण करून आणली......विदया ने देवाचे खूप आभार मानले ती देवाला बोलू लागली देवा तुझ्या कृपा म्हणून माझ्या नातीने मला परदेश पण दाखवला....

त्या नंतर वयाच्या सत्याऐंशी व्या वर्षी विदया चा वृद्धापकाळाने मृत्यू झाला...
अशाप्रकारे विदया चा जीवनप्रवास इथे संपतो...
( लेखिका - सौ. सोनल गुरुनाथ शिंदे )
0

🎭 Series Post

View all