ललाटलेख
ही गोष्ट आहे दोन सख्या बहिणींची. सख्या असूनही दोघींचे जीवन पूर्णपणे वेगळे आहे.
भाग २२
ईशा सी. एस. झाली. ती सी. एस झाली म्हणून नचिकेतने आई,बाबा ईशा आणि निशाला बाहेर जेवायला घेऊन जायचे ठरवले. तसे त्याने मम्मी आणि पप्पांना सांगताच मम्मी म्हणाल्या, “तू कशाला पार्टी देतोस, पार्टी तिच्या आईबाबांनी द्यायला हवी.” निशा नचिकडे बघत होती, तो पटकन म्हणाला, “जर माझी बहीण असती तर मी दिलीच असती ना, आणि पार्टी मी देतोय. मी तुला विचारले नाही मी देऊ का?”
“मी बघती आहे, हल्ली तू फारच बोलायला लागला आहेस नचिकेत.” मम्मी रागात म्हणाल्या.
“हो कारण तुझे बोलणे बरोबर नाहीये. मला बहीण असती तर तू अशी बोलली असतील का? आणि निरंजनचे सुद्धा मी तितकेच कौतुक करतो. पण तुला कुणाचे कौतुक केलेले आवडत नाही. त्याला मी काय करणार?” नचिकेत ताडकन बोलून रिकामा झाला.
निशा अनिरुद्ध आणि नचिकेत बाहेर निघाल्यावर पप्पांना मम्मीच्या नकळत नचिकेतच्या हातात पाकीट दिले आणि उशाला द्यायला सांगितले.
“नको पप्पा आम्ही घेतले आहे तिला गिफ्ट. “ नची म्हणाला.
“ते तुमच्या तर्फे झाले, हे आमच्याकडून.” नचिने ते घेऊन खिशात ठेवले. बाईकवर बसल्याबरोबर निशा नचीला म्हणाली. “ तू उगाच बोललास मम्मींना, आता उद्या दिवसभर मला ऐकून घ्यावे लागेल.”
“तू पण ऐकू नकोस. तेव्हाचे तेव्हा बोल. नाहीतर ती तुला बोलायचे सोडणार नाही. ती बोलायला कुणाला ऐकत नाही.” नचिकेत म्हणाला.
दोघे हाॅटेलवर पोचले. अनिरुद्ध लगेच निशाच्या बाबांकडे गेला. आई ईशा आणि निशा गप्पात दंग झाल्या. जेवताना अनिरुद्ध भरपूर दंगा करत होता. सारखा ह्याच्या कडेवरून त्याच्याकडे असे त्याचे चालले होते. त्याचा मऊ भात येताना निशा डब्यातून घेऊन आली होती. जेवण झाल्यावर नची आणि निशाने ईशाला महागडे रिस्ट वाॅच घेतले होते. पप्पांना दिलेले पाकीट पण नचीने ईशाला दिले. “हे पप्पांना दिले आहे. त्या दोघांच्या कडून.” जेवणाचे बील ही नचीने दिले. बाबांना अवघडल्यासारखे झाले. नची म्हणाला, “बाबा मी जावई नाही, तुमचा मुलगा आहे.” बाबांनी नचीला मिठी मारली. निशाचे मन अभिमानाने भरून आले. रात्री घरी यायला थोडा उशीर झाला. पप्पा जागेच होते.
“तुम्ही अजून जागे कसे पप्पा.” नचिकेतने विचारले.
“रात्रीचे युद्ध सुरू नको व्हायला म्हणून.” पप्पा म्हणाले.
“म्हणजे?” नचीने विचारले.
“तू ज्वालामुखी भडकावून गेलास, तो शांत नाही झाला अजून.” पप्पा म्हणाले.
“ पण पप्पा ती वागते ते बरोबर आहे का? किती कडवट बोलते ती. आणि सतत मनाला लागेल असचं बोलते. कधीतरी दुसऱ्याचा विचार करावा ना?” नची म्हणाला.
“हं. तो केला असता तर माझ्या आईवडीलांना सोडून मला तिच्या माहेरच्या गावात घेऊन आली नसती. पण आता तब्येत बरी नसते म्हणून काळजी करायची. माणसांचा स्वभाव काही केल्या बदलत नाही.” पप्पा खेदाने म्हणाले.
“ती तुमची चूक होती. पप्पा तुम्ही तेव्हाच तिच्या मनाप्रमाणे वागायला नको होते. तुमच्या आईवडिलांना सोडून येताना तुमच्या मनालाही यातना झाल्याच ना? तुम्ही ठाम राहिला असतात तर कदाचित ती बदलली असते.” नची म्हणाला. आणि झोपायला गेला. दुसऱ्या दिवशी मम्मी रागातच होत्या. त्या दिवसभर निशाशी बोलल्या नाहीत. निशाने चारपाच वेळा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही. नची ऑफिसमधून घरी आल्यावर त्या नचीशी सुद्धा बोलल्या नाहीत. हा अबोला खूप दिवस चालू राहिला. निशा तिला करायचे ते सर्व नीट नेटके करत होती. त्यांना नाष्टा जेवण वेळेवर देत होती. पण मम्मींचा राग कमी व्हायला तयार नव्हता. पप्पा ही समजावून सांगून दमले होते.
ह्या घरातल्या वातावरणाला सहा महिन्यात नची कंटाळून गेला. मम्मी धड त्यांना घेतलेल्या फ्लॅटवर वेगळे राहू देत नव्हत्या, आणि घरातही नीट वागत नव्हत्या. निशा काही म्हणत नसली तरी तिला मम्मीच्या आज्ञेतच राहावे लागत होते. शिवाय तिची नोकरीही तिला सोडावी लागल्यामुळे ती सारखी घरातच होती. मम्मीच्या वागण्याला तिला जास्त तोंड द्यावे लागत होते.
एक दिवस पप्पांनी जालिम उपाय केला. घरी कुणी नसताना ते मम्मीना म्हणाले, “हे बघ, निरंजन अमेरिकेला गेलाच आहे. तो परत येईल ह्याची खात्री आहे का तुला? मग ही दोघे जवळ आहेत, व्यवस्थित मानाने वागत आहेत, मग तू का अशी वागते आहेस? जरा वय वाचल्यासारखे वाग. वय वाढल्यावर समजूतदारपणा वाढायला हवा, पण तुझे वेगळेच चालले आहे. हे जर असेच चालू राहिले तर नची आणि निशा पण आपल्यापासून दूर जातील.”
हा उपाय बरोबर लागू पडला. आणि नची निशा आल्यावर मम्मी दोघांशी हळूहळू बोलायला लागल्या.
फक्त पप्पांना प्रश्न होता “ही यात्रा किती दिवस उपयोगी पडेल!”

क्रमशः
©️®️सौ.हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज
मिरज
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा