ललाटलेख
ही गोष्ट आहे दोन सख्या बहिणींची. सख्या असूनही दोघींचे जीवन पूर्णपणे वेगळे आहे.
भाग २३
ईशाची नोकरी पर्मनंट झाल्यावर आई बाबांनी तिच्यासाठी स्थळे बघायला सुरुवात केली. तिच्या अपेक्षा पूर्ण होतील अशी स्थळे येत होती. पण कधी ही पसंती द्यायची नाही, तर कधी त्यांना मुलगी बारीक अशक्त वाटायची. ईशा होतीच बारीक पण अशक्त नव्हती. ती लहानपणापासून किरकीर करायची पण तो स्वभावच होता तिचा. असे होत असतानाच तिच्या ऑफिसमध्ये बदलून आलेला मॅनेजर संदेश तिच्या संपर्कात आला. तो हुशार होताच पण हॅंडसमही होता. कामासाठी बोलता बोलता दोघांमध्ये मैत्री झाली. एक दिवस त्याने सरळ सरळ ईशाला विचारले, “मला आवडतेस तू. माझ्याशी लग्न करशील का?”
“मला तुमच्या बद्दल काहीच माहिती नाही. आणि मैत्री झाली म्हणजे आयुष्यभर आपले पटेलच असे नाही. शिवाय माझ्या घरी माझ्यासाठी स्थळे बघणे ही चालू आहे. तुम्ही काही अपेक्षा ठेऊ नका.” ईशान्य स्पष्ट सांगितले.
“हा तुझा स्पष्टपणाच मला आवडतो. जे आहे ते क्लिअर, स्वच्छ बोलून टाकायचे.” संदेश म्हणाला.
“एखादा गुण आवडला म्हणून ती व्यक्ती आपल्या बरोबर आयुष्य काढण्यासाठी योग्य आहे असे नाही ना होत.” ईशा हसून म्हणाली.
“तू मुलं बघते आहेस त्याचा स्वभाव, त्यांची सगळी माहिती तुला माहीत असते का?” संदेश ने ईशाला शब्दात पकडण्याचा प्रयत्न केला.
“कसे आहे, हे सगळे बघण्याची मला गरज वाटत नाही. आईबाबा सगळे बघतात आणि माझा माझ्या आईबाबांवर पूर्ण विश्वास आहे.” ईशान्य ठासून सांगितले.
“तुझे आईबाबा चांगलेच बघणार याबद्दल शंकाच नाही. पण त्यांना मिळालेली माहिती खरीच असेल कशावरून? आणि नेहमी ओळखीच्या माणसाशी लग्न झाले तर माहिती खोटी असण्याची शक्यता नसते.” संदेश उशाला पटवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होता. ईशा काहीच न बोलता त्याच्या केबीन मधून बाहेर पडली. नंतर दोन दिवस ऑफिसला सुट्टी होती. आणि नेहमी प्रमाणे निशा आईकडे आली होती. अनिरुद्ध आणि आई बाबा झोपल्यावर ईशान्य निघाला सगळे सांगितले. निशा म्हणाली, “कसा आहे मुलगा? तुला आवडला आहे का?” निशाने विचारले.
“चांगला आहे, पण मला आवडतो वगैरे काही नाही. फक्त मी ऑफिस पुरतीच बोलते त्याच्याबरोबर मग आवडण्याचा प्रश्न कुठे येतो.” ईशा म्हणाली.
“हे बघ ईशा. तो म्हणतो तेही बरोबर आहे. अनोळखी माणसापेक्षा ओळखीच्या माणसाच्या स्वभावाचा, त्याच्या आवडी निवडींचा आपल्याला थोडा तरी अंदाज असतो. त्याच्याबरोबर आयुष्य काढणे जास्त चांगले असते. अनोळखी माणूस कसा असेल काही अंदाजच बांधता येत नाही. त्यातून तुमची क्षेत्रही एक आहेत ना?” निशाने विचारले.
“नाही, तो सी. ए. आहे. पण खूप हुशार आहे. माझ्यापेक्षा लहान पण आहे आठ महिन्यांनी. शिवाय…..” ईशा बोलता बोलता अडखळली.
“शिवाय काय?” निशाने विचारले.
“तो आपल्या जातीचा आहे असे वाटत नाही.” ईशा म्हणाली.
“हा मात्र प्रॉब्लेम होऊ शकतो. नची आणि आपली जात एक असून ही मम्मीच्या पसंतीस मी उतरत नाही. जात वेगळी असली तर पद्धती खूप वेगळ्या असतात. शिवाय खाण्याच्या सवयी पण वेगळ्या असतात आणि घरातल्यांमधे वैचारिक अंतर ही असू शकते. तरी पण तो चांगला असेल तर तुला विचार करायला हरकत नाही. फक्त सगळे फेस करायची तयारी ठेव.” निशाने मोठ्या बहिणीच्या नात्याने ईशाला सगळे नीट सांगितले.
ईशान्य ऑफिसमध्ये गेल्यावर संदेशला काहीच दाखवायचे नाही असे ठरवले होते. पण ती वेळ तिच्यावर आलीच नाही. कारण संदेशच रजेवर होता. ईशा आपल्या कामात दंग होऊन गेली. घरी जाताना मात्र तिच्या मनात सारखा संदेशचाच विचार होता. “तो का आला नसेल ऑफिसला? तो बरा असेल ना?” असे विचार आपल्या मनात का येऊ लागले हे ही तिला कळत नव्हते. दुसऱ्या दिवशी संदेश ऑफिसला आला. तो बरा आहे हे बघून ईशाला हूश्य झाले. त्यानी कामासाठी ईशाला केबीनमध्ये बोलावले. ईशाला मनातून खूप आनंद झाला. ती केबीनमध्ये गेली. कामाचे बोलणे झाल्यावर त्याने विचारले, “तू विचारले नाहीस मी काल का नाही आलो.” त्याने तिच्याकडे बघत विचारले.
“का नाही आलात?” ईशाने पटकन विचारले.
“मी आईला आणायला नाशिकला गेलो होतो. तिला पण सून आणायची घाई झाली आहे.” संदेश सहेतुक ईशा कडे बघत म्हणाला. ईशाने मुद्दामहून विषय बदलून कामाला सुरुवात केली.
दुसऱ्या दिवशी शेवटी संदेशने तिला क्लिअर विचारले, “ईशा तुझा काय विचार आहे, तू काहीच सांगत नाहीस.”
“अरे, तू पूर्ण विचार केला आहेस का? आपली जात वेगळी आहे. तुमच्याकडे हे चालणार नाही. शिवाय मला ही डोक्यावरून पदर घेणे, मोठे कुंकू लावणे प्रकार आवडत नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे जात वेगळी म्हणजे पद्धती वेगळ्या, अगदी जेवण खाण्यापासून सगळ्या मग रोज वाद भांडणे, सगळाच विचार करायला हवा ना.” ईशा म्हणाल्यावर संदेशने केबीनमध्ये छोटी उडी मारली व म्हणाला, “म्हणजे तू माझा विचार तरी करते आहेस, हे ही नसे थोडके. चल आता आपण दोघे मिळून सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधू.”
ईशा लाजली, “ओय होय, क्या बात है।” संदेश पुरता दिवाना झाला.

क्रमशः
©️®️ सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज
मिरज
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा