ललाटलेख
ही गोष्ट आहे दोन सख्या बहिणींची. सख्या असूनही दोघींचे जीवन पूर्णपणे वेगळे आहे.
भाग २४
अनिरुद्धचा पहिला वाढदिवस मोठा करायचा होता, पण मम्मींचे बी. पी. अचानक वाढले. आणि वाढदिवस फक्त जवळच्या नातेवाईक आणि अगदी जवळचे मित्र मैत्रिणींना बोलावून झाला. अनिरुद्ध अगदी बाळसेदार छान झाला होता. तेव्हा सगळया नातेवाईकांना मम्मी ठासून सांगत होत्या, “मी बघते ना त्याचे खाणे पिणे, म्हणून झाला आहे असा.” सगळ्यांसमोर उगाच वादावादी नको म्हणून निशा शांत होती. पण त्यांची तब्येत बरी झाली की त्यांना विचारायचे ठरवले. आणि नचिकेतलाही दाखवून दिले. पण मम्मीच्या तब्येतीच्या कारणामुळे दोघेही गप्प राहिले.
ईशा आता खरोखरच संदेशच्या प्रेमात पडली होती. पण ती प्रत्यक्ष काही कबूल होत नव्हती. कारण त्याची जात वेगळी होती. त्याच्या घरची माणसे कशी आहेत हेही तिला कळत नव्हते. संदेशलाही तिच्या उत्तराची खूप वाट पहायला लागत होती. एक दिवस त्याने ईशा बरोबर ईशाचा असिस्टंट परागला पण केबीनमध्ये बोलावले व म्हणाला, “पराग ईशा परवापासून चार दिवस मी नाहीये. त्यामुळे काही अर्जंट, महत्त्वाची कामे आज उद्यामधे संपवा. कदाचित माझी रजा दोन चार दिवस वाढू ही शकते. “हो सर, सगळी महत्वाची कामे संपवू आपण, पण अचानक इतकी रजा का? घरी ठीक आहेत ना सगळे?” परागने विचारले.
“हं. घरचे ठीक आहेत. पण माझेच काही खरे नाही. मामाच्या मुलीशी लग्न करण्यासाठी आई मागे लागली आहे. बहुतेक आता गेलो की नक्कीच होईल.” संदेश म्हणाला. इकडे ईशाचा जीव खालीवर व्हायला लागला. संदेश तिच्याकडेच बघत होता.
“अभिनंदन सर” पराग म्हणाला.
“अरे बाबा, अजून पक्के नाहीये. सांगू नकोस कुणाला. पण आईसाठी मुलगी बघायला तरी जावे लागणार.” संदेश म्हणाला. पराग गेला पण ईशा तिथेच थांबली. तिने डायरेक्ट संदेशला विचारले
“तू मला विचारले होतेस ना लग्नाचे, मग? आता कुठे निघालास मुलगी बघायला?”
“पण तू कुठे काही उत्तर दिले मला. आईपण इथे येऊन आठ दिवस राहून परत गेली, तरी तू काही बोलायला तयार नाहीस मग काय करणार?” संदेश म्हणाला.
“मग जा आता आणि ये लग्न करून.” ईशा जायला वळली, संदेशने तिचा हात पकडून तिला थांबवले आणि म्हणाला, “ पण मी नाही गेलो तर तू नक्की करशील का लग्न माझ्याशी.” असे म्हणत त्याने ईशाचे डोळे पुसले. आणि ईशा त्याच्या मिठीत सामावली.
“पण मी सांगितले त्यावर काय विचार केलास?” ईशाने संदेशला विचारले.
“अग सगळे सांगतो तुला. बैस. हे बघ मी आईशी बोललो आहे. मला वडील नाहीत. आईनेच मला आणि दादाला खूप कष्ट करून वाढवले. पण ती जुन्या मतांची नाही. शिवाय ती कोणावर अवलंबून पण नाही. तिची तिला पेन्शन आहे. मी तिला सांगितले “ईशा डोक्यावरून पदर कधीही घेणार नाही. मलाच ती पद्धत आवडत नाही. तिला मोठ कुंकू ही लावायला सांगायचे नाही. आणि मी तुला अंतर देणार नाही, पण आपण वेगळे राहू. कारण त्यांच्या पद्धती वेगळ्या आणि आपल्या पद्धती वेगळ्या मग त्यावरून रोज तू तू मी मी होणार, ते मला नको आहे.” बस.” संदेशने सांगितले.
“मग होकार मिळाला का त्यांचा.” ईशा म्हणाली.
“हो, अगदी. ती म्हणाली, “ हे बघ आविष्य तुम्हांला बरोबर काढायचे हाय, तुम्ही एकमेकांना ओळखता. मग मी नाही म्हणायचा सवाल कुठ हाय. फकत एकच लक्षात ठेव, आपलं पाव्हन या लग्नाला नसतील. तसही त्याने मला काही फरक पडनार न्हाय. ते कंधीबी आपल्या मदतीला आल न्हाईत. पण त्यांचे घरातल्यांना बी समद चालल का ह्ये ईचारून घे. मी काय तुमास्नी आडवणार न्हाय.” मग आणखी काय हवं.” संदेशने सांगितले.
“मग तू त्यांना जाऊ का दिलेस?” ईशाने विचारले.
“कुठे?” संदेशने विचारले.
“त्या गेल्याना परत दादांकडे?” ईशाने विचारले. संदेश हसायला लागतो. ईशा त्याच्याकडे बघत राहते.
“अग तिला कायमची इकडे आणली आहे, मग परत कशी जाईल.” संदेश हसतच म्हणाला.
“मग परागला का खोट सांगितले.” ईशा म्हणत असतानाच संदेशने तिला मिठीत घेतले. “प्यार में सबकुछ जायज़ है मेरी जान। पराग सबकुछ जानता है।” संदेश म्हणाला.
“म्हणजे परागला माहिती आहे सगळे!” ईशाने आश्चर्याने विचारले.
“हं. तो माझा मित्र आहे आधीपासून.” संदेश.
“पण आता तुझ्या घरी सांगायला हवं. तू कधी सांगशील?” संदेशने विचारले.
“बाबांचा मूड बघून सांगितले पाहिजे. त्यांच्या नकाराची मनाची तयारी ठेवायची. पण लढायचे. पळून जायचे नाही.” ईशाने संदेशला बजावले.
आठ दिवसात ईशाने घरी आईबाबांना सांगितले. घरात शब्दशः वादळ उठले. बाबांनी ईशाशी बोलणे सोडले. आई कामापुरती बोलत होती. ईशाचे काम व्यवस्थित चालू होते. संदेशला रोज तिच्याकडून घरची परिस्थिती समजत होती. पण ईशा शांत होती. असेच होणार याची तिला खात्री होती.
“तुझी बहीण काही मदत नाही करणार का?” संदेशने विचारले.
“ती करेल पण मीच अजून तिला काही सांगितले नाही. तिला तिचे खूप प्राॅब्लेम आहेत. त्यामुळे बाबा थोडे शांत झाले की आई बाबांशी मीच बोलेन. फक्त आपल्याला थोडी वाट पहावी लागेल. ” ईशा म्हणाली. संदेशला मात्र हे वाट पहाणे जीव घेणे वाटत होते.

क्रमशः
©️®️ सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज
मिरज
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा