ललाटलेख
ही गोष्ट आहे दोन सख्या बहिणींची. सख्या असूनही दोघींचे जीवन पूर्णपणे वेगळे आहे.
भाग २५
आठ दहा दिवस होऊन गेले पण आई बाबांनी ईशाशी बोलणे बंद केले ते बंदच होते. शेवटी एक दिवस संध्याकाळी घरी ईशाने आईबाबांना विचारले, “असे किती दिवस तुम्ही माझ्याशी बोलणार नाही आहात? कमीतकमी “ तो” कसा आहे, चांगला आहे का? तो काय करतो? काहीतरी बोला. तुमची परवानगी असल्याशिवाय आम्ही लग्न करणार नाही. पळून तर अजिबात जाणार नाही. पण एक सांगते बाबा आपण इतकी मुले पाहिली त्यांच्यामध्ये संदेश नक्कीच उजवा आहे. नुसते शिक्षण असून उपयोग नसतोच असे तुम्हीच म्हणता ना? तो सुशिक्षित आहे पण मनाने ही चांगला आहे. फक्त “जात” वगळली तर त्याच्याकडे नाकारण्यासारखे काही नाहीये.” ईशा भडाभडा बोलत होती. पण आईबाबा काहीच बोलले नाहीत. तेंव्हा मात्र ईशा फार चिडली. “तुम्ही कायम तुमचे विचार आमच्यावर लादता. आम्ही कधी काही बोललो नाही. पण आमच्या जीवनाचा साथीदार तरी आमच्या मनासारखा निवडायचा अधिकार आम्हांला नाहीये का? तुम्ही काही विचारच करणार नसाल तर हरकत नाही. मी आयुष्यभर एकटीच रहायला तयार आहे.” इतकेआईबाबा ती झोपून गेली.
दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला जायच्या आधी बाबा तिला म्हणाले, “परवाच्या दिवशी रविवारी त्याला घरी यायला सांग. बरोबर घरातले कोणी मोठे असेल तर बरे होईल.” ईशा एकदम हरखून गेली. पण काही न बोलता चेहऱ्यावरचा आनंद लपवून ती ऑफिसला गेली. ती गेल्यावर बाबा आईला म्हणाले, “शेवटी पोरगी आपलेच म्हणणे खरे करणार. पण जात वेगळी म्हणजे खूप पद्धती, गोष्टी वेगळ्या असतात. हे तिच्या लक्षात येत नाहीये. लग्नानंतर काही समस्या उद्भवू नयेत म्हणजे झाले.”
“हो ना. काही झाले तर आपण किती दिवस पुरणार आहोत तिला? तिचे तिलाच सगळे बघावे लागणार आहे.” आई म्हणाली.
ऑफिसला गेल्याबरोबर ईशाने ही बातमी संदेश ला दिली. तो तर हवेतच मनोरे बांधायला लागला.
रविवारी आईने निशा आणि नचिकेतला पण बोलावून घेतले होते. बरोबर पाच वाजता संदेश आईला घेऊन आला. चहापाणी ईशा च्या बाबांनी संदेशला प्रश्न विचारायला सुरुवात केली.
“ईशाच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही दोघांनी लग्न करायचे ठरवले आहे. तुलाही मनापासून तिच्याशी लग्न करायचे आहे का?”
“हो, मीच तिला लग्नाविषयी विचारले आहे.”संदेश म्हणाला.
“बरं, पण तुमच्या आईला घरच्या लोकांना हे मान्य आहे का?” इथे संदेश ऐवजी आईनेच उत्तर दिले.
“असं बगा, माझी भाषा गावाकडची, पन म्या स्पष्ट बोलते. आमच्या घरला म्या अन् माझी दोन लेकर येवढेच. ह्याच वडील गेल्यावर त्यांच्या जागेवर नोकरी मिळाली. तवा कोनीबी आमचं न्हवतं. आता त्यांच म्हनन म्या ईचारत नाय. दुसर असं म्या मानूस ही एकच जात मानते. तुमास्नी पटलं तर घ्या. आमच्या हिकडल्या काय पद्धती, रितभात ते माझ्याजवळ. लेकरांना काय न्हाय.”
“आय, अग कळते की त्यांना पण आपली भाषा आणि बोलणं. माझी आई मनाने भाबडी आहे. खूप खस्ता खाल्ल्या आहेत आम्हाला मोठ करताना. आम्हाला बहीण नाही. आम्ही दोघे भाऊच. पण आईने आम्हा दोघांनाही स्वतः पासून लांब ठेवले. आमचे शिक्षण आश्रमशाळेत झाले. आजही तिने स्पष्ट सांगितले आहे, तुमचे तुम्ही वेगळे रहा. मी तुमच्या संसारात मधेमधे येणार नाही. पण मला तिच्या या वयात तिला इतके लांब ठेवायचे नाही. म्हणून मी तिला इकडे घेऊन आलो. पण लग्न झाल्यावर आम्ही वेगळे रहाणार आहोत. तशीच आईची पण आज्ञा आहे. फक्त सध्याचा फ्लॅट दोन खोल्यांचा आहे. तिथे आई रहाणार आहे. आम्ही थोडे दिवस भाड्याचे घर घेऊन राहू. पण लवकरात लवकर मी स्वतःचे घर घेण्याचा प्रयत्न करीन.”संदेश हसून म्हणाला.
“बरं, ठीक आहे. आमची काही हरकत नाही. पण लग्न कधी आणि कसे करायचे आहे तुम्हाला?” बाबांनी विचारले.
“मी बोलू का?” ईशा घाबरत म्हणाली.
“हो, बोल ना” बाबा म्हणाले.
“बाबा आई आणि आई मला वाटते लग्नावर जास्त खर्च नको करायला. तसही इथे नवीन घर घेणे सोपे नाही. त्यामुळे लग्नावर जास्त खर्च न करता ते पैसे फ्लॅट घेताना वापरता येतील.” ईशा म्हणाली.
“लयीच बराबर हाय तुज पोरी. रीण काढून साजर करण्यापरीस घराच्या येळी उपयोगी पडेल वाचलेल पैस.” संदेशाची आई म्हणाली.
“पण चार मोजके लग्नाचे विधी तरी व्हायला हवेत. तेवढेच करू. आणि मोजक्या माणसांना बोलवू. आम्ही निशाला दिले तसे बांगड्या आणि कानातले ईशालाही देणार आहोत. आणखी तुमची काही मागणी आहे का?” बाबांनी संदेशच्या आईला विचारले.
“नाय नाय, तुमी काय बी द्या, आमी फकस्त गंठण घालू शकतो. माज्या जवळ काय बी न्हाय. हा माज्या पेन्शन चे पैस तेवढे येतात.” संदेशच्या आई म्हणाल्या.
“नाही. आमची तुमच्याकडून काहीच मागणी नाही. आणि गंठण आई तिच्या कडून देणार आहे. तिने दादाच्या बायकोला पण दिले आहे. मी काहीतरी नक्कीच घेईन पण ते ईशाच्या पसंतीनेच घेईन.” संदेश म्हणाला.
निशा आणि नचिकेत दोघेही संदेशवर खूश झाले होते. इतक्या कष्टातून तो मोठा झाला, या पदापर्यंत पोचला याचे त्यांना खूप कौतुक वाटले. आईबाबांना सुद्धा मुलगा, त्याची आई दोघेही सच्चे वाटले. ईशाचे लग्न ठरले. आता लवकरात लवकर तारीख तेवढी काढायची होती. ईशा आणि संदेश दोघेही सुख स्वप्नात हरवले होते.

क्रमशः
©️®️सौ.हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज
©️®️सौ.हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा