ललाटलेख
ही गोष्ट आहे दोन सख्या बहिणींची. सख्या असूनही दोघींचे जीवन पूर्णपणे वेगळे आहे.
भाग २६
लग्न ठरल्यावर संदेश आणि ईशा दोघांनाही हूश्य झाले. दोन महिन्यानंतरची तारीख निघाली. ईशा आणि संदेशची आता फ्लॅट बघण्यासाठी धावपळ सुरू झाली. दोघेही आपले ऑफिस सांभाळून फ्लॅट बघायला धावत होते. महिन्याभरात त्यांना ऑफिसच्या बऱ्यापैकी जवळ फ्लॅट मिळाला. त्यामुळे ईशाचा जाण्यायेण्याचा वेळ खूप वाचणार होता. फ्लॅट सर्व सोयींनी युक्त होता. त्यामुळे फार खरेदी करावी लागणार नव्हतीच.
ईशा आणि संदेशचे लग्न अगदी छोटेखानी पण छान झाले. दोन्ही बाजूची म्हणून जेमतेम शंभर माणसे होती. संदेशकडची फक्त पस्तीस माणसे होती. त्यातही जास्त मित्र मैत्रिणी होते. संदेशने सांगितल्याप्रमाणे ईशासाठी नेकलेस सेट घेतला. निशा आणि नचिकेत दोघांनी त्यांना कॅश दिली, जेणेकरून त्यांना घरासाठी खरेदी करायला उपयोग होईल. सासूबाईंनी ईशाला गंठण घातले. लग्नाच्या दिवशी त्यांनी जवळच्या सवाष्णींना बोलवून दोघांचे खूप छान स्वागत केले. फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. सुगंधित पाणी आणि फुलांच्या पाकळ्या डोईवर शिंपडल्या जात होत्या. त्यांची बेडरूम छान सजवली होती. आल्या आल्या दोघांना थंडगार सरबत पेश केले होते. मग संदेशच्या आईने दोघांना पेढा भरवला आणि प्रेमाने भरभरून आशीर्वाद दिला. पहिल्या दिवशी दोघे बेडरूममध्ये झोपायला दिले तरी आईने हळूच संदेशच्या कानात सांगितले, “आधी देवाला जावं लागलं, ध्यानात ठिव.”
दुसऱ्या दिवशी सगळे त्यांच्या देवाला जाऊन आले आणि दुसऱ्या दिवशी ईशा आणि संदेश महाबळेश्वरला निघाले.
महाबळेश्वरला जाताना शेजारी शेजारी बसल्यामुळे होणाऱ्या ईशाच्या स्पर्शाने संदेश मोहीत होत होता. फक्त एस. टी. बसचा प्रवास म्हणजे हाड खिळखिळी करणारा होता. महाबळेश्वरला पोचल्यावर ईशा चे सगळे अंग दुखायला लागले होते. ताप भरला आहे असे वाटत होते. पण हाॅटेलची रूम खूप सुंदर होती. वेण्णालेकच्या जवळच हाॅटेल होते. पोचल्यावर दोघांनी आधी फ्रेश होऊन थोडे खाऊन घेतले आणि सरळ रूमवर जाऊन झोपले.. संध्याकाळी मग दोघे हातात घालून महाबळेश्वर मार्केट फिरायला गेले. पावसाळा सुरू होता आणि महाबळेश्वरला प्रचंड पाऊस, त्या पावसात भिजून दोघे रूमवर आले. दोघे थंडीने कुडकुडत होते. रूमवर गरम जेवण आले. त्याचा आस्वाद घेतल्यावर दोघांची थंडी थोडी कमी झाली. ईशा नाईट ड्रेसमधे खूप गोड दिसत होती. तिच्या रंगाला नाईट ड्रेसचा अबोली रंग खुलून दिसत होता. ती काहीतरी करायला गेली आणि तिने केस विंचरून बांधलेला अंबाडा सुटला आणि तिचे थोडेसे केस तिच्या कपाळावर आले. ते सावरण्यासाठी संदेशने ते हाताने बाजुला केले आणि हलकेच तिच्या कपाळावर ओठ टेकले. ईशाचे सर्वांग शहारले. चिंब पावसाने आणि हवेतल्या धुंद गारव्याने आपले काम केले होते. एकमेकांच्या मिठीत कुडकुडणारी थंडी केव्हाच पळून गेली होती. एकमेकांच्या मिठीत त्यांना केंव्हा झोप लागली कळलेच नाही.

©️®️सौ.हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा