ललाटलेख
ही गोष्ट आहे दोन सख्या बहिणींची. सख्या असूनही दोघींचे जीवन पूर्णपणे वेगळे आहे.
भाग २७
ईशा आणि संदेश खूप आनंदात महाबळेश्वरहून परत आले. आले तेव्हा संदेशच्या आईनी सगळं घर स्वच्छ करून ठेवलेले होते. त्यांच्यासाठी स्वयंपाक ही तयार करून ठेवलेला होता. त्यामुळे आल्यावर ईशा आणखी रिलॅक्स झाली. दिवसभर विश्रांती घेऊन दुसऱ्या दिवशी दोघे संदेशच्या आईला भेटायला गेले. दिवसभर तिथे थांबून दोघे संध्याकाळी ईशाच्या आईबाबांकडे गेले. रात्री घरी परत निघायच्यावेळी ईशाने आईबाबांना मिठी मारली तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी होते. ती म्हणाली, “तुम्हांला सोडून एकही दिवस रहायची सवय नाहीये. करमत नाही तुमच्या शिवाय. झोपही येत नाही.” ते ऐकून आईबाबांचे डोळेही पाणावले. संदेशने गडबड केली म्हणून ईशा बाहेर पडली.
ईशा आणि संदेशचे ऑफिस रुटीन सुरू झाले. रोज दोघांची जाण्याची वेळ एक होती. पण घरी येताना ईशा लवकर निघायची, संदेशला मात्र यायला उशीर व्हायचा. तोपर्यंत ईशाचा स्वयंपाक झालेला असायचा. पण सकाळी मात्र तिची खूप ओढाताण व्हायची, तिला नाष्टा करायला पण वेळ नसायचा. महिना दोन महिन्यांनी संदेशने तिला सकाळचा स्वयंपाक करण्यासाठी बाई बघायला सांगितली. स्वयंपाकाची बाई यायला लागल्यावर ईशाचे रूटीन व्यवस्थित बसले. महिना दीड महिना दर रविवारी सकाळी संदेशच्या आईकडे जायचे हे ठरले होते. पण जवळजवळ दोन महिने होत आले तरी आईबाबांना न भेटल्यामुळे ईशा अस्वस्थ झाली होती. एका शनिवारी ती संदेशला म्हणाली,” उद्या आईबाबांना भेटायला जाऊया.”
“पण आईकडे जायला हवे.” संदेश म्हणाला.
“दर रविवारी जातोच की आपण, आईबाबांना भेटून दोन महिने झाले.” ईशा म्हणाली.
“अग आईकडे मला जायला हवे. तिच्याकडे काय संपले आहे काय नाही बघायला हवे. ती पैसै घेत नाही मागत नाही. पण तिला जाऊन आणायला ही होत नाही.” संदेश म्हणाला.
“का? त्यांना बरे नाहीये का?” ईशाने विचारले.
“ती पडली परवा घरात. कंबर आखडल्यासारखी झाली आहे.” संदेश म्हणाला.
‘अरे तू बोलला नाहीस मला काही!” ईशाने विचारले.
“मलाच काल समजले. रात्री यायला उशीर झाला. सांगायचे राहून गेले.” संदेश.
“आपण त्यांना इकडेच घेऊन येऊ या ना थोडे दिवस. त्यांनाही बरे वाटेल.” ईशा म्हणाली.
“बघू येते का?’ संदेश म्हणाला. याही रविवारी ईशा संदेश परत त्याच्या आईकडे गेले. आईच्या कमरेला थोडा मार लागला होता. त्यांना चालताना पण दुखत होते. ईशा आग्रहाने त्यांना घरी रहायला घेऊन आली. वन बेडरूम किचन फ्लॅट, त्यात अगदीच स्वयंपाकघर छोटेसे होते. गाद्या फक्त बेडवरच होत्या. जास्तीची गादी नव्हती. आईंना खाली झोपता येणे शक्य नव्हते. आई आणि ईशा बेडरूममध्ये आणि संदेश हाॅलमध्ये चटईवर एक बेडशीट घालून झोपत होता. दहा दिवस असेच गेले. मग मात्र आईनेच समजुतीने आपल्या घरी जाणे पसंत केले. संसार म्हणजे काय याची खरी जाणीव या दहा दिवसांत ईशा आणि संदेश दोघांनाही झाली. सगळाच संसार नवीन, काय आणि किती घ्यायचे हे कळायला ही काही दिवस जावेच लागतात. एक दिवस घरातला तांदूळ संपलेला असतो तर एक दिवस कणिक. कधी भाजीच काही नसते करायला. इतकी वर्षे आईच सगळे बघत होती. आता मात्र ईशा ला सवय होईपर्यंत थोडे जड जात होते. आणि असे काही झाले की संदेशला खूप राग येई. तो ईशावर ओरडून बोले “आधी नीट बघता येत नाही का? जेवायला बसताना आज भातच नाही केला अस नको व्हायला.” मग तो तिला समजावून ही सांगे. “आयुष्य आश्रमशाळेत काढले. कधी पोटभर मनासारखे जेवण नाही मिळाले, त्यामुळे आता स्वतःचे घरी असे नको वाटते. साॅरी तुझ्यावर रागवण्याचा हेतू नसतो, ते सगळे आठवते.” संदेश म्हणे. असेच एकमेकांना समजून घेत दिवस जात होते. बघता बघता वर्ष सरले. ईशाचे बाबा ही रिटायर झाले. ईशाला मात्र आईबाबांना कधीतरीच आईबाबांना भेटायला मिळत असे. पण तेही समजून होते की ईशावर सगळी जबाबदारी आहे.

अनिरुद्ध आता दोन वर्षांचा झाला. नचिकेतला आखाती देशांमध्ये चांगला चान्स मिळाला. त्याच्याबरोबर निशा आणि अनिरुद्ध ही गेले. आता अगदीच एकटे पडणार म्हणून मम्मी पप्पांना खूप वाईट वाटत होते. निरंजन एम. एस. झाला. त्यालाही अमेरिकेत जाॅब मिळाला. निशा तिकडे गेल्यावर तिला घरी बसून काम मिळू लागले. ती हुशार होती. सी. ए. झालेली होती. त्यामुळे तिथेही तिला कामाचा मोबदला ही चांगला मिळत होता. नचिकेतला ही खूप चांगली नोकरी होती. हळूहळू तेही तिथे सेटल होऊ लागले. दोन वर्षात त्यांनी तिथे स्वतःचे घर ही घेतले. ते स्वतःच्या घरात रहायला गेले आणि निशाला परत मातृत्वाची चाहूल लागली.
क्रमशः
©️®️ सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज
मिरज
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा