ललाटलेख
ही गोष्ट आहे दोन सख्या बहिणींची. सख्या असूनही दोघींचे जीवन पूर्णपणे वेगळे आहे.
भाग २९
मम्मीच्या आडमुठ्या स्वभाव नचीला चांगलाच माहिती झाला होता. पण मम्मीचे हे रूप निरंजन साठी नवीन होते. त्याचा आणि सुजाताचा फारसा काॅन्टॅक्ट होत नव्हता. पण सात आठ दिवसातून एकदा तो तिला ऑफिसच्या फोनवर काॅल करत असे. परत निघायच्या आधी त्याने तिला सांगितले “तुझ्या आप्पा आम्मांना आपल्या बद्दल सांग. आणि जमले तर त्यांना बोलावून घे.”
निरंजन अमेरिकेला गेला, त्या आधीच आठ दिवस नचिकेत आणि निशाही परत गेले होते. आता मम्मी पप्पांना घर खायला उठले. पण मम्मी काही निरंजनचे म्हणणे मान्य करायला तयार होत नव्हत्या. निरंजन अमेरिकेला पोचल्यावर त्यानी सुजाताला सर्व काही सांगितले. नंतर तो म्हणाला, “आपण इथेच लग्न करू. तुझे आप्पा, आम्मा तयार आहेत ना?”
“हा, और वो अगले महिने यहाॅं आ रहे हैं।” सुजाता म्हणाली.
“ये तो बहोत अच्छी बात हैं। हम अभी से शादी की तय्यारी शुरू करते हैं।” निरंजन म्हणाला.
आम्मा आप्पा आल्यानंतर आठच दिवसांनी लग्न करायचे ठरले होते. निरंजनने नचिकेत आणि निशाला बोलवले, पण भारताच्या प्रवासाच्या दगदगीमुळे तिची तब्येत ठीक नव्हती म्हणून एकटाच नचिकेत अमेरिकेला लग्नाला आला. ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळी लग्न लागले. मम्मी आणि पप्पांना निरंजनने फोटो पोस्टाने पाठवले. “आपण जाऊ शकलो नाही” याचे पप्पांना खूप वाईट वाटले. फोटो बघून मम्मींची तळपायाची आग मस्तकात भिनली. निरंजन आणि सुजाता बरोबर नचिकेतचा फोटो पाहून त्या म्हणाल्या, “म्हणजे नचीची सुद्धा फूस होती याला. तरीच म्हंटल माझ्या निरंजन मध्ये एवढे धाडस कुठून आले.”
“काय तोडांला येईल ते बोलायला लागली आहेस तू हल्ली. नची आखाती देशात, निरंजन अमेरिकेमध्ये. नची कुठून फूस लावणार आहे त्याला. मीच सांगितले होते त्याला, “ तिकडे गेलास की शक्य तेवढ्या लवकर लग्न कर. म्हणजे तुला तिथले कार्ड मिळायला ही सोपे जाईल.” पप्पांनी नकळत नचिकेतची बाजू सावरली.
“म्हणजे तुमची फूस होती या लग्नाला.” मम्मी ओरडल्या. तितक्याच शांतपणे पप्पा म्हणाले, “हो होती, मग काय करायच त्या मुलांनी आयुष्यभर तुझ्या पदराखाली रहायचे. मला आईवडीलांपासून तोडले होतेस, आता मुल तुझ्या स्वभावामुळे तुझ्यापासून दूर गेली आहेत. आणि माझ्यावर ओरडायचे नाही. तुला काही झाले तर तुझे करायला मीच इथे आहे हे लक्षात ठेव.” मम्मीना चांगलाच धक्का बसला त्यांचे बी. पी. वाढले.
इकडे निशाला जुळी असल्याचे समजले. पण तो आनंद फार काळ टिकला नाही. भारतात येण्याची दगदग सहन न झाल्यामुळे तीचे अॅबाॅरशन झाले. पण सुदैवाने एकच बाळ गेले. एक जीवंत होते. आता निशाला बेडरेस्ट होती. नचिकेत तिची पूर्ण काळजी घेत होता. अनिरुद्ध सुद्धा शहाण्या सारखा वागत होता.
निशाच्या आधी ईशाकडे गोड बातमी होती. पण “पाचवा लागल्याशिवाय कुणाला सांगायचे नाही” असे सासूबाईंनी तिला बजावले होते. ईशा बाळंतपणासाठी माहेरी आली, तेव्हा निशाला ही गोष्ट समजली. दिवसभरत आल्यावर ईशा डाॅक्टरांना दाखवून आली. तिच्यासोबत आईही होती. “ बेबी हेल्दी आहे. फार दिवस वाट पहायला नको. पुढच्या आठवड्यापर्यंत बघू, नाहीतर सिझेरियन करू.” डाॅक्टर मॅडम म्हणाल्या. तेव्हा ईशा ला नववा महिना संपत आला होता. आठवड्याभरात वाट देखील बघावी लागली नाही. त्याआधीच ईशा ची नाॅर्मल डिलीव्हरी होऊन तिला गोंडस मुलगी झाली. तिला बघून सगळेच खूश झाले, पण संदेशच्या आईंना फारच आनंद झाला. म्हणाल्या, “मला मुलगी नाही. तुला मुलगी झाली हे बरे झाले. आता मी तिचे खूप लाड करणार.”
अशिक्षित किंवा कमी शिकलेली आई इतकी समंजसपणे बोलली. आईबाबांना आणि ईशाला अनिरुद्ध झाला तेव्हाचे नचिकेतच्या मम्मीचे बोलणे आठवले. “शिक्षणाची शहाणपण येतच असे नाही. समजूतदारपणा अंगीच असावा लागतो.” बाबा मनातल्या मनात म्हणाले. ईशाच्या मुलीचे बारसे ही आईबाबांनी थाटामाटात केले. नचिकेतच्या मम्मी आणि पप्पांना पण आमंत्रण दिले होते. पण मम्मी आल्या नाहीत. पप्पा एकटेच आले. त्यांनी ईशाला आहेर केलाच पण निघताना बाबांच्या हातात एक पाकिट दिले. “हे तुमच्या लेकीने द्यायला सांगितले आहे.” पप्पा म्हणाले. पाकिटात ली रक्कम बघून बाबांना खूप सुखद धक्का बसला. जवळजवळ बाळंतपण आणि बारशाच्या सर्व खर्च झाला, त्याहून जास्त रक्कम त्यात होती. आणि त्या बरोबर एक चिठ्ठी होती.
“ बाबा अस समजा की मी तुमचा मुलगा आहे. रिटायर झालात तरी एवढा खर्च तुम्ही करालच यात शंकाच नाही. पण तुमच्या म्हातारपणी तुमच्याजवळही पैसे हवेतच.” निशाच्या समजूतदारपणाने आई बाबा दोघांचेही डोळे पाणावले. निशाला माहिती होते, “संदेश अशी रक्कम देऊ शकणार नाही. आणि बाबा आपल्याकडे मागणार नाहीत.” म्हणून तिने आधीच पप्पांना हे करायला सांगितले होते. आता निशाला काय होते याची सगळे वाट पहात होते.

क्रमशः
©️®️ सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज
मिरज
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा