ललाटलेख
ही गोष्ट आहे दोन सख्या बहिणींची. सख्या असूनही दोघींचे जीवन पूर्णपणे वेगळे आहे.
भाग ३०
भारतात ईशाच बाळंतपण होते. म्हणून तिकडे भारताबाहेर एकटी असूनही निशा शांत राहिली. तिने सासरी माहेरी कुठेच काही सांगितले नाही. पण तिला यावेळी जास्त त्रास होत होता. त्यात जुळ्यातले एक गेल्यामुळे तिला मानसिकही त्रास होत होता. ती ईशा नंतर महिन्याभरातच बाळंतीण झाली. तिला मुलगा झाला. पण जन्मल्यापासून त्याची सारखी तब्येतीची तक्रार सुरू होती. तिथल्या डाॅक्टरांना ही काही उलगडा होत नव्हता. निशाने त्याचे नाव आधीच ठरवल्याप्रमाणे हर्षवर्धन ठेवले होते. ती त्याच्याकडे व्यवस्थित बघत होती. अनिरुद्ध शाळेत होत जात होता. तेवढावेळ तिच्या समोर नसायचा एरवी सतत तिच्या बरोबर असायचा. तिला खूप मदत करीत असायचा. डायपर दे, कपडे दे तर कधी त्याच्या समोर बसून त्याच्याशी बोलत त्याला खेळवत रहायचा.
तिकडे हर्षवर्धनाच्या तब्यतीचे काही निदान लागत नव्हते. मग तिने आणि नचिकेतने ठरवले की, “निशाने हर्षला घेऊन भारतात परत जायचे. त्याच्या तब्येतीवर लक्ष केंद्रित करायचे.” आणि “नचिकेतने तिकडे राहून नोकरी करून पैसे मिळवायचे. आणि अनिरुद्धकडे” बघायचे.” निशाने अनिरूद्धची खूप समजूत घातली. “तू थोडे दिवस दिवसभर मावशीकडे राहशील ना? दिवसभर मावशीकडे आणि संध्याकाळी बाबा बरोबर आपल्या घरी. आपल्या बाळाला थोड बरं वाटतं नाहीये ना म्हणून. त्याला बरं वाटायला लागले की आम्ही लगेच परत येतो.” अनिरुद्ध अगदी समंजसपणे सगळ्याला “हो” म्हणाला.
निशा हर्षला घेऊन भारतात आली. आधी तिने नेहमीच्या अनिरुद्धच्या पेडीएट्रीशियनकडे डाॅक्टर मुतालिक याच्याकडे दाखवले. त्यावेळी ती एकटीच हर्षला घेऊन गेली होती. ते म्हणाले “आपण ह्याची आधी ब्लड टेस्ट करू. मग बघू काय करायचे ते.” ब्लड टेस्टचे रिपोर्ट बघून निशाला इतकेच म्हणाले, “आपण सोमवारी याची आणखी एक टेस्ट करून घेऊ मग ठरवू. हे कार्ड घेऊन आणि सोमवारी सकाळी इथे बरोबर दहा वाजता जा. मी त्यांना फोन करून ठेवतो.” तिने कार्ड हातात घेतले वाचले आणि पर्समध्ये ठेवून दिले. सोमवारी सकाळी ती बरोबर दहा वाजता डॉ. मुतालिकांनी सांगितलेल्या ठिकाणी गेली. यावेळी जाताना ती तिच्या बाबांना घेऊन गेली होती. ज्यावेळी हर्षचे ब्लड तपासणीसाठी घेतले तेव्हा निशाला समजले की त्याची कॅन्सरची (ल्युकेमियाची) टेस्ट करायची आहे. हे ऐकूनच निशाची शुद्ध हरपली. तिला शुद्धीवर आणून तिला शांत करेपर्यंत बाबांची दमछाक झाली. इकडे हर्षचे रडणे ही चालू होते. तिला आणि हर्षला घेऊन बाबा त्यांच्या घरी गेले. तेव्हा घरी एकट्या मम्मी होत्या. निशाची चेहरा बघून त्या म्हणाल्या, “असा का चेहरा केलाय कुणी मेल्यासारखा?” तेव्हा मात्र निशाचे बाबा खूप चिडले आणि म्हणाले. “एखाद्या आईला समजले की तिचे बाळ कुठल्या आजाराची शिकार झाले आहे तर तिचा चेहरा असाच होईल. आणि झाला नाही तर ती आई आहे की नाही याविषयी शंका उत्पन्न होईल.” हे ऐकून मम्मी काही बोलणार तोच बाबांनी त्यांना हाताने थांबण्याची खूण केली आणि म्हणाले, “हर्षला जन्मतः ब्लड कॅन्सर असण्याची शक्यता आहे. डॉ. मुतालिकांना शंका आली म्हणूनच त्यांनी आज ही टेस्ट करायला सांगितले.” हे ऐकल्यावर मम्मी गप्प झाल्या. थोड्यावेळाने पप्पा आल्यावर निशाचे बाबा घरी निघाले. जाताना निशाला म्हणाले, “काळजी करू नकोस बेटा. मी उद्या रिपोर्ट घेऊन येईन. मग ठरवू काय करायचे.”
पप्पांनी विचारले, “काय झाले?” निशाच्या बाबांनी मम्मी काय म्हणाल्या ते सोडून बाकी सगळे सांगितले. पप्पांना खूप वाईट वाटले. नंतर मम्मी तेच वाक्य पप्पांना पण म्हणाल्या, “असे काय तोंड करून बसला आहात कोणी मेल्यासारखे?” पप्पांना ते सहन झाले नाही, त्यांचा मम्मीवर हात उठला. पण फक्त उठला. ते फक्त रागाने म्हणाले, “तू बाई आहेस का कोण आहेस? जरा पण दयामाया नाही तुला?” त्यानंतर पप्पांना मम्मीशी बोलणे सोडले.
दुसऱ्या दिवशी सकाळी निशाचे आई आणि बाबा दोघेही रिपोर्ट घेऊन निशाच्या घरी आले. बाबांनी निशाला रिपोर्ट दाखवला. डोळ्यात पाणी आणून त्यांनी पप्पांना सांगितले, “हर्षला ब्लड कॅन्सर डिटेक्ट झाला आहे.” निशा आणि निशाची आई रडत होत्या. बाबा म्हणाले, “निशा बाळा आता रडायचे नाही. निकराने लढा द्यायचा. मी आहे तुझ्याबरोबर.” पप्पांना उद्देशून ते म्हणाले, “पप्पा संध्याकाळी डाॅ. मुतालिकांना जाऊन भेटायला हवे. ट्रिटमेंट कुठे घ्यायची काय घ्यायची हे पण बघावे लागेल.”
पुरुषासारखा पुरुष पण पप्पा निशाच्या बाबांना मिठी मारून रडले. बाबांना ही अश्रू अनावर झाले.
संध्याकाळी बाबा आणि पप्पा दोघेही निशा आणि हर्षला घेऊन डाॅ. मुतालिकांकडे निघाले. पण निशाने आईला पण बरोबर घेतले. तिला आईच्या आधाराची खूप गरज होती. पप्पा आणि निशा त्यांच्या घरी आले. निशाचे जेवण होईपर्यंत पप्पा हर्षला सांभाळत बसले होते. जेवण झाल्यावर तिला म्हणाले, “तू झोप बेटा जाऊन उद्या सकाळी परत लवकर जायचे आहे ना?” पप्पा सगळे आवरत होते आणि मम्मी टिव्ही बघत बसल्या होत्या. हर्ष झोपल्यावर निशाने नचीला फोन लावला. त्याला फोनवर हर्षच्या रिपोर्ट विषयी सगळे सांगितले. फोनवर नचीशी बोलताना सुद्धा तिला अश्रू अनावर होत होते आणि तिकडे नचीलाही.

क्रमशः
©️®️ सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज
मिरज
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा