ललाटलेख
ही गोष्ट आहे दोन सख्या बहिणींची. सख्या असूनही दोघींचे जीवन पूर्णपणे वेगळे आहे.
भाग ३४
निशा आईचे ऑपरेशन झाल्यानंतर परत गेली. यावेळी ती आई बाबांकडे राहिली होती. तिकडे गेल्यावर मात्र तिला खूप मानसिक ताण आला. ती परत डिप्रेशनमध्ये जाते काय अशी भिती नचिकेतला वाटू लागली. अनिरुद्ध कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होता. तो लंडनमध्ये शिकत होता. निशा थोडे दिवसात सावरली. तिच्या कामात व्यस्त झाल्यावर आपोआप तिचे टेन्शन कमी झाले. ती लंडनला जाऊन अनिरुद्धला भेटून यायचा विचार करत होती. इकडे नचिकेतच्या पप्पांना सिव्हीअर हार्ट अटॅक आला. नचिकेतला तसा काॅल आल्यावर तातडीने त्यांना परत भारतात यावे लागले. नचिकेत आणि निशा घरी पोहोचले. मम्मी नचीची वाटच बघत होत्या. नचीचे पाऊल दारात पडले आणि दवाखान्यातून नचीच्या चुलतबहीणीचा नचीला फोन आला. “पोहोचला आहेस का? लगेचच ये इकडे. एकटाच ये काकूला आणू नको.”
“निघतोच. निशा मी जाऊन येईपर्यंत थांब. मी आलोच.” निशा गुपचूप बेडरूममध्ये गेली. हातपाय धुवून फ्रेश झाली. स्वयंपाकघरात जाऊन चहा केला. स्वतः घेतला, मम्मींनाही दिला. त्यांचा चहा पिऊन व्हायच्या आधीच नचिकेत आणि त्याची बहीण आणि दोन तीन जण घरी आले. नचिकेतचा चेहरा बघूनच निशाला काय झाले आहे त्याची कल्पना आली. नचिकेत मम्मीच्या पुढे बसला, म्हणाला, “मम्मी, (तो क्षणभर अडखळला) मम्मी पप्पा, … पप्पा सोडून गेले ग आपल्याला.” नचिकेतच्या डोळ्यातून अखंड धारा वहात होत्या. मम्मीच्या डोळ्यातून ही धारा वहात होत्या. त्या मूकपणे रडत होत्या. निशा नकळतच तिथे आली आणि मम्मीच्या पाठीवरून हात फिरवला. तिच्याही डोळ्यात पाणी होते. नचिकेतची काकू आल्यावर ती तिथून उठली. बाबांच्या शेजारी फोन करून तिने बाबांना निरोप दिला. ईशाला ही निरोप दिला. थोड्या वेळात सर्व काही आवरले. नचिकेत घाटावरून घरी आला. अंघोळ वगैरे आटपले. तेव्हा त्याला भुकेची जाणिव झाली. कुणी कुणी आणून दिलेला पिठलं भात पोटात घालून नचिकेत आणि निशाने जरा पाठ टेकली. मम्मीच्या जवळ काकू बहीण दोघीही होत्या.
निरंजन वेळेवर येऊ शकला नाही. तो दुसऱ्या दिवशी दुपारी पोचला. तो एकटाच आला होता. त्याच्या मुलींच्या परीक्षा सुरू होत्या त्यामुळे सुजाताला येता आले नाही.
दिवस झाल्यावर नचिकेत आणि निशा मम्मीना घेऊन परत गेले. कशातरी दोन महिने मम्मी तिकडे राहिल्या आणि परत आपल्या घरी आल्या. पण त्याला दोन महिन्यात निशाला बोलायची एकही संधी त्यांनी सोडली नाही. “तिकडे मारे सगळ्या कामाला बाई लागत होती. इकडे बाईच मिळत नाही. मग सगळे कसे होते सहज!” हे ते सारखे बोलून दाखवत. फक्त पप्पा नुकतेच गेले होते म्हणून निशा गप्प होती. निरंजनकडे जायला त्यांना तोंडच नव्हते. कारण लग्न झाल्यापासून त्यांनी सुजाताला वागणूक तशीच दिली होती. कधी गेल्या अमेरिकेला तरी त्या सुजाता आणि तिच्या आईवडिलांशी नीट वागत नव्हत्याच, पण दोन्ही मुली झाल्या म्हणून सुद्धा त्यांचा राग होता. निरंजन आणि सुजाता मात्र त्यांना मनापासून बोलावत होते.
आईचे आजारपण आणि पप्पांना अचानक जाण्यामुळे निशाची खूपच रजा झाली. “आता दोन तीन वर्षे तरी काही इतकी रजा मिळणार नाही.” असा विचार करून तिने अनिरुद्धला परीक्षा झाल्यावर बोलावून घेतले. तेवढाच त्याचा सहवास मिळेल. अनिरुद्ध अगदी मोजून पंधरा दिवस आला. त्याला पंधराव्या दिवसांत नोकरी जाॅईन करायची होती. तेवढे तर तेवढे अनिरुद्ध भेटला, आपल्या जवळ राहिला हेच निशासाठी खूप होते. तेच तिचे टाॅनिक होते.
पप्पांच्या नंतर नचिकेतने मुंबईत आणखी एक फ्लॅट घेतला. इकडे आल्यापासून त्यांना प्रशस्त जागेत रहायची सवय होती. त्यांचे लिव्हिंग स्टॅण्डर्ड पण बदलले होते. त्यांनी तीन बेडरूमचा मोठा लॅव्हीश फ्लॅट घेतला. मम्मीच्या घरापासून पंधरा वीस मिनिटांच्या अंतरावर हा नवीन फ्लॅट होता. निशा मम्मीच्या घरी रहाणार नाही हे तिने आधीच स्पष्ट केले होते. आणि भारतात कधी काही दिवसांसाठी येणे झाले तरी त्यालाही प्रशस्त जागेतच रहायला आवडणार होते. त्याचा आधीचा घेतलेला फ्लॅट ही खूप लहान होता आणि जूना ही झाला होता. “माणसाला नेहमीच असे वाटते की सारे काही आपण करतो. पण देवाची करणी वेगळी असते.” इकडे नचिकेतने फ्लॅट घेतला, तिकडे निशाच्या आईचा कॅन्सर पुन्हा उद्भवला. त्यावेळी बरोबर संचिताचे दहावीचे महत्त्वाचे वर्ष होते. ईशाला सारखे सारखे आईबरोबर दवाखान्यात जाणे शक्य नव्हते. बाबांनी निशाला फोन केला. निशा भारतात परत आली. यावेळी ती येतानाच दोन महिन्यांची सुट्टी सांगून आली होती. किती दिवस लागतील आणि पुढे काय होणार हे तिला तरी कुठे माहिती होते. फक्त आईला आपला आणि आपल्याला आईची जास्तीत जास्त सेवा करता यावी इतकेच तिला वाटत होते.

क्रमशः
©️®️सौ.हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज
मिरज
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा