देऊळ बंद
( रहस्य कथा)
भाग - २
सगळं सुरळीत सुरु होतं.
की,
अचानक एक दिवस पहाटे देऊळा बाहेर गुरुजींचे मृत देह काही गावकरींच्या निदर्शनास आले.
अचानक एक दिवस पहाटे देऊळा बाहेर गुरुजींचे मृत देह काही गावकरींच्या निदर्शनास आले.
बघता बघता सगळ्या गावात बोंबा बोंब झाली. गुरुजींचा मृत्यू का अन् कसा झाला असेल? याच चर्चेला गावभर उधाण आले होते.
त्यात आणखीन एक भर म्हणून गावात वेगळीच चर्चा रंगू लागली.
" त्यो गुरुजी.
आपल्या कर्मांन गेला बघ. आणि काय बी नाय?"
आपल्या कर्मांन गेला बघ. आणि काय बी नाय?"
पारावर बसलेले एक वयस्क गृहस्थ समोर असलेल्या त्यांच्या मित्रा समोर मनातले विचार मांडत म्हणाले.
" झालं बी असंल तसं."
दुसरा गृहस्थ मित्र ही डोकं खाजवित उत्तरला.
" आर् ss
त्या गुरुजीला किती समजावलं , पण ते काय ऐकलं नाय. आता बघ काय होऊन बसलं"
त्या गुरुजीला किती समजावलं , पण ते काय ऐकलं नाय. आता बघ काय होऊन बसलं"
पुन्हा ते पहिले गृहस्थ डोक्याला हात लावित थोडेसे काळजीच्या सुरात बडबडले.
" उगाच का?
काही नियम ठरले गेले असतात. देवा धर्माच्या बाबतीत लय सबुरीने घ्यावं लागतंय."
काही नियम ठरले गेले असतात. देवा धर्माच्या बाबतीत लय सबुरीने घ्यावं लागतंय."
दुसरे गृहस्थ समजुतीने त्यांचा मुद्दा मांडत पुटपुटले.
..
..
" आता हे गुरुजी कोण??
आणि त्याचा काय संबंध देऊळाशी?"
आजीच्या बोलण्याची लय मध्येच तोडत मंदारने पुन्हा मनातले प्रश्न आजीसमोर ठेवले. अन् उत्तराची वाट पाहू लागला.
अजून ही आजीच्या चेहऱ्यावरचे गांभीर्याचे भाव होते. अन्, त्या पुन्हा शून्याशी एकरुप होत पुढे सांगू लागल्या.
..
..
" गुरुजी"
सहा महिन्यांपूर्वीच बदलीमुळे आपल्या पत्नीसह गावात शिक्षक म्हणून रुजू झाले होते. गुणाने अन् वाणाने अतिशय निर्मळ....
दिसायला जरी हलकेसे सावळे असले तरी त्यांच मन मात्र दुधावानी शुभ्र पांढर होतं. त्यांची बायको ही दिसायला देखणी पण तितकीच साध्या वृत्तीची होती.
दोघे ही महादेवाचे मोठे उपासक होते. महादेवाप्रती त्यांच्या मनात अपार श्रद्धा होती. पण, अंधश्रद्धा म्हंटल की गुरुजींना राग आल्याशिवाय राहत नव्हता.
अशातच त्यांच्या कानी असे काही पडले जे ऐकून गुरुजीं पूर्णतः चक्रावून गेले.
"श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी देऊळ बंद."
कारण काय, तर " श्रावण मासातल्या प्रत्येक सोमवारी सांजवेळी साक्षात महादेव त्यांच्या संगिणीसोबत देऊळात वास करतात."
त्या गावातल्या देऊळाबद्दल हा समज सगळीकडे आगीप्रमाणे पसरले होते. म्हणूनच , इतक्या पवित्र मासात प्रत्येक सोमवारी संध्या नंतर कुणी ही त्या देऊळाकडे साधं फिरकत नव्हतं.
सगळे गावकरी नेहमीप्रमाणे मुकाट त्याच पालन ही करत होते. पण गावात नवीन आलेल्या गुरुजींना मात्र हे काही पटले नव्हते.
सगळे गावकरी नेहमीप्रमाणे मुकाट त्याच पालन ही करत होते. पण गावात नवीन आलेल्या गुरुजींना मात्र हे काही पटले नव्हते.
हे कारण ना त्यांच्या मनाला पटत होते ना बुध्दीला. त्यांनी या संदर्भात गावातल्या मुख्य लोकांशी संवाद ही साधला. पण,सगळे व्यर्थच.....
संवादाने हळू हळू आता विरोधाची भूमिका घेतली होती. जे मनाला मान्यच नव्हते ते स्वीकारणं म्हणजे आपल्या विवेक बुध्दीवर शंका घेण्यासारखं होतं.
असं,
त्या गुरुजींच ठाम मत होतं.
त्या गुरुजींच ठाम मत होतं.
पण
अखेर, तो दिवस आलाच. श्रावण महिन्यातला पहिला सोमवार.
अखेर, तो दिवस आलाच. श्रावण महिन्यातला पहिला सोमवार.
सालाना प्रमाणे त्या ही वर्षी श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारी संध्याकाळची आरती धूप करुन देऊळाचे मुख्य दार बंद करण्यात आले.
अन्,
त्या वेळी कुणी ही देऊळाच्या त्या क्षेत्रात किंवा नदी पात्रात जायचं नाही अशी सक्त ताकीद दिली गेली होती.
त्या वेळी कुणी ही देऊळाच्या त्या क्षेत्रात किंवा नदी पात्रात जायचं नाही अशी सक्त ताकीद दिली गेली होती.
त्या रात्री अख्खं गाव देऊळाच्या दिशेला साधं वळून ही बघत नव्हतं. पण, ते गुरुजी स्वस्थ कुठे बसणार होते.
गावात पसरलेल्या अंधश्रध्देला त्यांना मुळासकट उपटून जे टाकायचं होतं. अन् म्हणूनच मागचा पुढचा कसलाच विचार न करता, महादेवांवर विश्वास ठेवून गुरुजींनी थेट देऊळाकडची वाट धरली अन् त्या दिशेला पाऊलं उचलायला सुरवात केली.
त्यांच घर गावाच्या कडेला असल्याने सारं गाव पार करुन त्यांना जावं लागत होतं.
दुपारी गजबजणारा गाव त्या क्षणी मात्र नसल्याप्रमाणे त्यांना भासत होता. एखादी व्यक्ती सोडाच पण साधं कुत्रं ही कुठं दिसत नव्हतं.
एक एक घर पार करुन ते देऊळातलं अन् त्यांच अंतर पार करत होते. ना त्यांच्या चेहऱ्यावर कसली भीती होती ना कसली शंका. काही होते तर तो म्हणजे महादेवांवरला विश्वास.
जो त्यांना पुढे पाऊल टाकण्यास बळ देत होते. अन्, तितकं त्यांना पुरेसं होतं.
जसं जसं देऊळ जवळ येऊ लागलं, तसं तसं त्यांची पाऊलं मंदावली. पापण्या सारख्या उघडझाप करु लागल्या.
कदाचित,
ते काही बारकाईने बघण्याचा प्रयत्न करत होते.
ते काही बारकाईने बघण्याचा प्रयत्न करत होते.
..
..
" काय आजी??"
आडवा पडलेला मंदार सरळ होत डोळे मोठे करत एकाएकी पुटपुटला.
..
..
त्यांची पाऊलं हळू हळू मंदावत आता जागीच थांबली होती.
घसा कोरडा पडला होता. कपाळी आठ्या पसरल्या होत्या. केसातून घामाचे थेंब खाली गालावर ओघळू लागले होते. हृदयाची गती ही नेहमीपेक्षा थोडी वाढली होती.
अन्,
पापण्यांची सारखी उघडझाप होताना त्यांच्या डोळ्यात एकाएकी दिसून आली ती एक चमक जी अद्भुत होती अलौकीक होती.
पापण्यांची सारखी उघडझाप होताना त्यांच्या डोळ्यात एकाएकी दिसून आली ती एक चमक जी अद्भुत होती अलौकीक होती.
व्,
त्याच क्षणी त्यांचा श्र्वास थांबला.
त्याच क्षणी त्यांचा श्र्वास थांबला.
( क्रमशः )
© रेखा खांडेकर स्वरा
( असं काय दिसलं असेल गुरुजींना?)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा