भाग - ३
अन्,
ती अद्भुत, अलौकीक चमक बघताच त्यांचा श्र्वास क्षणात थांबला.
ती अद्भुत, अलौकीक चमक बघताच त्यांचा श्र्वास क्षणात थांबला.
..
..
दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा मृत देह काही गावकरींना देऊळाच्या आवारात आढळला.
दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा मृत देह काही गावकरींना देऊळाच्या आवारात आढळला.
एकाएकी सगळ्या गावात धावपळ सुरु झाली. त्या सोबतच गुरुजींनी नियम मोडला अन् त्याचीच शिक्षा त्यांना मिळाली असे शब्द एका तोंडून दुसऱ्या तोंडापर्यंत पसरु लागले.
मृत देह देऊळाच्या भागात सापडल्याने देऊळाची नियमाप्रमाणे शुद्धता करण्यात आली. हे सारं करण्यात एक सप्ताह लोटून गेला.
अन्,
पुन्हा आला श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार.
पुन्हा आला श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार.
श्रावणातल्या विशेष म्हणजे दुसऱ्या सोमवारी महादेवांच्या दर्शनाचं पुण्य सगळ्या भक्तांनी पदरात बांधून घेतले. व् आपापल्या घरी निघून गेले.
शिवाय गावकरींनी ही संध्याकाळची आरती करुन पुन्हा एकदा देऊळातले मुख्य दार बंद केले. व् तिकडे कुणाचे जाणे वर्ज केले.
सोबत,
पुन्हा एकदा गुरुजींच उदाहरण देत साऱ्या गावकरींना समज देण्यात आली.
पुन्हा एकदा गुरुजींच उदाहरण देत साऱ्या गावकरींना समज देण्यात आली.
इकडे गुरुजींच्या घरात याच कारणामुळे जीव गेल्याने त्यांची बायको निपचीप पडली होती. ना कुणाशी काही बोलत होती ना कुणाला दोष देत होती.
जे घडलं ते महादेवाची इच्छा मानून तिने तिचं ते नशीब मान्य केलं होतं.
..
..
" असं कसं???
आपल्या भक्तांचा जीव घेणं , ही इच्छा महादेवांची कधीच नसू शकते."
आपल्या भक्तांचा जीव घेणं , ही इच्छा महादेवांची कधीच नसू शकते."
गळ्यातंल महादेवाचं लॉकेट हातात घट्ट धरुन मंदार थोडं पुढे सरकत म्हणाला. अन्, एक चित्त होत भाव शून्य असणाऱ्या आजीकडे पाहू लागला.
" हो....
त्याची इच्छा नव्हतीच ती."
त्याची इच्छा नव्हतीच ती."
स्वतः च्याच हातावरल्या खुणेवर नजर गढवून आजी तोंडातल्या तोंडात पुटपुटल्या.
अन्,
पुन्हा बोलू लागल्या.
पुन्हा बोलू लागल्या.
..
..
अर्ध श्रावण महिना संपून गेला.
गुरुजींच्या रहस्यमयी मृत्यूला सगळे विसरुन ही गेले. खरंतर, सगळ्या गावकऱ्यांसाठी त्याची मृत्यू म्हणजे नियम मोडल्यामुळे मिळालेली शिक्षाच होती.
थोड्या फार फरकाने त्यांच्या बायकोचे ही हेच म्हणणे होते.
म्हणूनच,
श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आरतीसाठी किंबहूना क्षमा याचनेसाठी आपल्या तीन वर्षाच्या बाळासह त्या महादेवाच्या देऊळात आल्या.
श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आरतीसाठी किंबहूना क्षमा याचनेसाठी आपल्या तीन वर्षाच्या बाळासह त्या महादेवाच्या देऊळात आल्या.
नेहमीप्रमाणे आरती झाली. धूप दीप प्रज्वलित करण्यात आली. नैवेद्य दाखवून सगळ्या भक्तांनी खडी साखर प्रसाद मानून ग्रहण केले.
अन्,
पुन्हा मुख्य दार बंद करण्याची वेळ झाली.
पुन्हा मुख्य दार बंद करण्याची वेळ झाली.
मुख्य पूजाऱ्यांनी घंटा नाद करुन सगळ्यांना देऊळापासून दूर जाण्यास खुनविले. तसे, सगळ्यांनी आपापल्या घरी जात देऊळापासून दूर होऊ लागले.
त्यात,
गुरुजींची बायको व् बाळ ही होतं.
गुरुजींची बायको व् बाळ ही होतं.
देऊळाच्या शेवटच्या पायरीवर येऊन अखेरचं दर्शन करावे म्हणून त्या बाळाला खाली सोडले. व् दोन्ही हात जोडून पुन्हा एकदा महादेवांच्या कृपा दृष्टीसाठी प्रार्थना करु लागल्या.
अन्,
दुसऱ्याच क्षणी तिथून त्या निघून गेल्या.
दुसऱ्याच क्षणी तिथून त्या निघून गेल्या.
बघता बघता काही मिनिटातच देऊळ परिसर रिकामा झाला. चीत पाखरु ही त्या क्षणी तिथे नजरेस येत नव्हतं शिवाय , तिथले मुख्य पुजारी.
..
..
तासाभरानंतर....
" देऊळाकडे येणाऱ्या वाटेवरच्या झुडपात काही हालचाली होवू लागल्या. अधून मधून जमिनीवर एक सावली ही दिसू लागली.
जणू ती सावली काही शोधत होती.
काही क्षण शोधाशोध केल्यावर एका झुडपावर एक लॉकेट दिसलं. अन् तेव्हा कुठे त्या सावलीचा खेळ संपला.
त्याच क्षणी ती सावली मागे वळणार तितक्यात कुणाच्या तरी पावलांची चाहूल लागली. अन्, एकाएकी झुडपातली ती सावली जागीच स्थिर झाली.
समोरले दृश्य पाहून थक्क होऊ लागली. कारण, देऊळातले मुख्य पुजारी नदी पात्राच्या दिशेला हळू हळू पाऊल टाकीत होते.
काही पाऊलं चालून पुजारी नदी पात्रात उतरले अन् " ओम् नमः शिवाय" महादेवाचे नाम स्मरण करीत पाण्यात डुबकी मारु लागले.
त्या क्षणी नभातला चंद्र ही काहीसा वेगळा भासत होता. रातीच्या त्या पहरी चंद्र जरा जास्तच चमकत होता. वातावरणात ही एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली होती.
अन्,
काही कळण्याआधीच अद्भुत काही चमकले. ज्यांनी झुडपा आडून बघणाऱ्या सावलीचे ही डोळे क्षणभर मिटून गेले.
काही कळण्याआधीच अद्भुत काही चमकले. ज्यांनी झुडपा आडून बघणाऱ्या सावलीचे ही डोळे क्षणभर मिटून गेले.
डोळे उघडता समोरुन मुख्य पुजारी नदी पात्रातून बाहेर येताना दिसले.
त्यांच्या चेहऱ्यावर हसू होते. एकाच क्षणात जग जिंकल्याच समाधान त्यांच्या मुखावरुन झळकत होते.
दोन्ही हात उराशी जोडून पुन्हा एकदा " ओम् नमः शिवाय" जपत पुन्हा ते देऊळाच्या मुख्य दारासमोर येऊन उभे राहिले.
दुरुन बघणाऱ्या सावलीला पुजाऱ्यांच अशा वागण्यामागचं कारण कळत नव्हते. की, एकाएकी त्या सावलीचं लक्ष पुजाऱ्यांच्या कमरेजवळच्या धोतरावर गेले.
पुजाऱ्याच्या कमरेजवळ काहीतरी होते जे खूप चमकत होते. लपवून ही पुजाऱ्यांना त्याची चमक लपवता आली नव्हती.
ती चमक बघताच सावलीचे डोळे विस्फारले. अन् आठवला तो क्षण ज्या क्षणी नदी पात्रात काहीतरी चमकले होते.
ठरलं!
पुजाऱ्याचा पिच्छा करुन हे गुपित जाणून घ्यायचं त्या सावलीचे ठरले होते. अन् त्या सावलीने तसे केले ही....
पुजाऱ्याचा पाठ पुरवीत देऊळाच्या मुख्य गाभाऱ्यात ती सावली येऊन पोहचली होती. अन् समोर घडणाऱ्या गोष्टीचा अंदाज बांधत एका कोपऱ्यात उभी होती.
देऊळातले मुख्य पुजारी ही बरोबर महादेवांसमोर उभे होते. हात जोडून मान खाली घालून तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत.
की, एकाएकी झटक्याने मान वर करुन असुरी हसत म्हणाले.
" महादेवा ss
अरे, किती रे तू भोळा. अन् हे तुझे भक्त सगळे गावकरी तुझ्याहून दुप्पट पटीने भोळे. "
अरे, किती रे तू भोळा. अन् हे तुझे भक्त सगळे गावकरी तुझ्याहून दुप्पट पटीने भोळे. "
इकडे तिकडे बघत त्यांनी हळूच कमरेजवळचं धोतराची घडी थोडी उकलली. अन् पुन्हा एकदा प्रखरपणे सगळा गाभारा चमकला.
" ओम् नमः शिवाय"
पुन्हा त्या पुजऱ्यांच्या तोंडून ऐकू आले अन् एकाएकी ती चमक मंदावली. त्या सावलीचे डोळे ही स्थिर होऊ लागले.
मात्र,
काही क्षणांपुरतंच....
काही क्षणांपुरतंच....
कारण,
पुजाऱ्यांच्या हातातला चमकणारा हिरा पाहून पुन्हा सावलीचे डोळे सताड उघडेच राहणार होते. मुख्य पुजारीचे हे रूप पाहून सावली अचंबित होत ऐकत बघत होती.
पुजाऱ्यांच्या हातातला चमकणारा हिरा पाहून पुन्हा सावलीचे डोळे सताड उघडेच राहणार होते. मुख्य पुजारीचे हे रूप पाहून सावली अचंबित होत ऐकत बघत होती.
" श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी नदी पात्रातून हा हिरा उजागर होतो. ते ही केवळ लोकांच्या कल्याणासाठी....
आणि मी??? स्वतःच कल्याण करुन घेतो."
पुजारी पुन्हा त्या हिऱ्याकडे बघून हसत म्हणाला.
त्याच हे असुरी रुप सगळ्यांसमोर उघडं पाडण्यास ती सावली आल्या पावली माघारी फिरली. पण, वाटेत त्या दुष्ट पुजारीची नजर पडलीच.
" तू ???"
तुला कळले तर.... हरकत नाही. जसे तुझ्या नवऱ्याची अडसर दूर केली. तसे तुझी अडसर ही दूर करु आम्ही."
" म्हणजे??
तू मारलंस् त्यांना. या हिऱ्याच्या लोभापायी??"
तू मारलंस् त्यांना. या हिऱ्याच्या लोभापायी??"
ती सावली दुसऱ्या कुणाची ही नसून गुरुजींच्या बायकोची होती. तिच्या डोळ्यात पुजाऱ्यांबद्दल तिरस्कार स्पष्ट दिसत होता.
" लोभ..... लोभ...."
या क्षणापर्यंत जो महादेवाचं नाव जपत होता आता तोच लोभ लोभ कंठ पाठ करताना फार विचित्र वाटत होते.
" महादेव बघतायत , दुष्टा ss"
त्यावर काहीच न बोलता सभ्य रुपातला तो नराधम निव्वळ हसत होता.
..
..
नातवाच्या हट्टापायी गोष्टीची पूर्तता करत आजी जागची उठली. व् तिच्या अंथरुणात जाऊन पडली.
गोष्ट पूर्ण ऐकून हे खरचं कुठेतरी घडून गेल्याची जाणीव मंदारला होत होती. म्हणूनच, त्याने त्या गावाचे नाव विचारले.
" त्या गावाचं नाव? "
" मणिपूर "
आजी हळू आवाजात म्हणाली.
हे नाव आधी ही कुठेतरी ऐकल्यासारखं वाटत होते.
" त्या गुरुजींच नाव??"
मंदार हाताची मूठ आवळून आजीच उत्तर ऐकण्यास सज्ज होता. अन् आजीचे उत्तर दिले.
" माधव कुलकर्णी"
उत्तर ऐकताच मंदारच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. त्याच्या गळ्यातलं ते लॉकेट घट्ट पकडून तो रडू लागला.
तितक्यात,
त्याची नजर समोरच्या पोस्टावर पडली ज्यावर त्याच पूर्ण नाव लिहिलं होतं.
त्याची नजर समोरच्या पोस्टावर पडली ज्यावर त्याच पूर्ण नाव लिहिलं होतं.
" मंदार माधव कुलकर्णी"
© रेखा खांडेकर स्वरा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा