देव माणूस भाग 1

माणसातले गुण महत्वाचे
देव माणूस भाग 1

©️®️शिल्पा सुतार

विषय... जग दोघांचं

दोन दिवसांपूर्वी मोहन, मीराच वाजत गाजत लग्न झालं. लग्नात तिच्या घरच्यांनी कसलीच कमी ठेवली नव्हती. खूप छान लग्न सोहळा झाला. मानपान, आहेर सगळं व्यवस्थित केल होत. मीरा सासरी आली. सोबत तिची मावशी होती.

नवरीच्या सौंदर्याची सगळीकडे चर्चा होती. सगळे मोहनच्या नशीबाचा हेवा करत होते.

मोहन ही अतिशय चांगला मुलगा होता. समजूतदार मन मिळावू. दिसायला ही जबरदस्त होता. उंच पुरा. व्यायामाने कमवलेले शरीर. रुबाबदार होता. मुलाकडचे खूप चांगल्या परिस्थितीतले होते. बाजार पेठेत स्वतः चे कपड्याचे दुकान होते. बिझनेस जोरात सुरू होता. वडील कारभार बघत होते. दोघ भाऊ त्यांच ऐकत होते. एकत्र कुटुंब होत. मोठ्या भावाच लग्न झाल होत. दोघ भावांच छान पटत होतं.

आजच सत्यनारायणाची पूजा झाली. मावशीने मीरा, मोहनची नजर काढली. दुपारी छान जेवणाचा प्रोग्राम होता. ते देवाला जावून आले.

मोहन अतिशय खुश होता. आज त्याची आवडती पत्नी मीरा त्याच्याजवळ येणार होती. बरेचसे पाहुणेही गेले होते. लग्नाच्या कामात सगळे थकले होते. म्हणजे ते लगेच झोपतील असा त्याचा अंदाज होता. म्हणजे कोणाचा डिस्टर्बन्सही होणार नाही. त्याच्या मनात लाडू फुटत होते.

जेवतांनाही त्याचं मन लागत नव्हतं. त्याला माहिती होतं आईने आणि वहिनीने लोकांना बोलावून त्यांची रूम सजवली होती.

मीरा तर लग्न झाल्यापासून किती सुंदर दिसत होती. आजही पूजेला ती जवळ बसली तिचा होणारा स्पर्श, तीच रूप तो मोहित झाला होता. तिचा सडपातळ बांधा. लांब केस. गोरा पान रंग. मेहेंदी लावलेले हात. सगळं छान होत.

पण ती दोन दिवसापासून त्याला विशेष दिसली नव्हती. सारखी तिच्या मावशी सोबतच आत बसून होती. काहीतरी हळूहळू बोलत होती. बरं झालं आज तिची मावशी गेली. त्याला वाटल होत मावशी सोबत ती ही जाते की काय. पण आईने तिला पाठवलं नाही.

थोड्यावेळाने वहिनी बोलवायला आली. "मोहन भाऊजी जरा इकडे या."

त्याला खूप आनंद झाला होता. पण तसा विशेष न दाखवता तो वहिनी सोबत गेला. वहिनी दरवाजा अडवून उभी होती.

"काय आहे वहिनी?" तो हसत होता.

" आत जायच ना? मला खरेदीसाठी पैसे द्या. नाहीतर आज तुम्हाला रात्र भर बाहेर उभ रहाव लागेल."

त्याने हसतच वहिनीला पाच हजार रुपये दिले.

" बस एवढेच? दहा हजार हवे."

त्याने पूर्ण पाकीटच वहिनीला देऊन टाकलं. सोबत नेकलेस ही दिला.

" वाह हा कधी केला? मला नको मीराला द्या." वहिनी समजूतदार पणे म्हणाली.

" तिला ही आहे. हा तुमचा. "

"बापरे आज तर काहीही मागितलं ते मिळालं असतं." ती हसत होती. जा आत खूप सुखी रहा. तिने आशिर्वाद दिला.

त्या दोघांचा एकमेकांशी फार पटत होतं. मोठी वहिनी नाही तर बहीणच होती. ती पण मोहनच खूप करत होती.

मोहन आत मध्ये आला. रूम खूप छान सजवलेली होती. मीरा कॉटवर बसलेली होती. लाल रंगाची साडी ती नेसलेली होती. तो आल्यामुळे ती अवघडली होती. थोडी घाबरली होती.

तो तिच्याकडे बघत होता. हा रंग तिला खूप खुलून दिसतो त्याने मान्य केलं. तिचे मोठे सुंदर केस तिने मोकळे सोडले होते. विशेष मेकअप नव्हता. टिकली लावलेली होती. गळ्यात मोठ मंगळसूत्र होत. हातात बांगड्या होत्या. तो एकटक तिच्याकडे बघत होता. ही खरच मुलगी आहे का की कोणी अप्सरा.

त्याच्या बघण्याने ती अवघडली. तिने उगाच साडी नीट केली. तिच्या बांगड्या कीणकीणल्या. निरागस होती. चेहरा भोळा.

तो तीच अल्लड रूप बघत होता. ती फक्त एकवीस वर्षाची होती.

तो तिच्याजवळ जाऊन बसला. तिला नेकलेस दिला. तिने तो घेवून बाजूला ठेवला. त्याने पुढे होवुन तिचा हात हातात घ्यायचा प्रयत्न केला. ती बाजूला सरकली. तसा तो थोडासा हसला. परत तिच्याजवळ सरकला. ती आता उठून उभी राहिली. त्याने पुढे होऊन तिचा हात धरला. जवळ ओढलं.

आता ती चिडली होती. तिने हात सोडवून घेतला. ती दाराकडे बघत होती.

" इथून दरवाजा लांब आहे. जाता येणार नाही. मी कोणी परका नाही तुझा नवरा आहे. घाबरू नकोस ये इथे बस." मोहन त्याच्या जवळची जागा दाखवत होता.

ती नाही म्हणाली. "माझ्यापासून लांब रहायचं. काही नातं जोडायचं नाही."

" बापरे मी एवढ काय केल? तू मला म्हणते आहेस का ? " त्याने प्रेमाने विचारल.

"हो मी तुमच्याशी बोलते आहे. मला हात लावायचा नाही. आपला काही संबंध नाही. " मीरा रागाने म्हणाली.

" काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? " मोहन तिच्याकडे बघत होता.

" हो मला सासरी यायच नव्हतं. आई बाबा ऐकत नाही. माझ लग्न केल. मला हवा होता तसा नवरा तुम्ही नाही." तिने रागाने सांगितल.

तो विचार करत होता हिने माझ्याकडे बघितल नाही का? मी एवढा हॅन्डसम आहे. गल्लीतून जातांना किती मुली माझ्याकडे बघत असतात. सगळे कौतुक करतात.
"हे बघ मीरा." त्याने बोलण्याचा प्रयत्न केला.

" मला काही सांगू नका. मला आईकडे जायचं. मी तिकडे रहाणार. " ती म्हणाली.

" अस करता का? लोक काय म्हणतील. यात माझा काय दोष सांग. लग्न ठरलं तेव्हा का नाही सांगितल?" तो ही आता चिडला होता.

"आई बाबा रागवत होते. त्यांनी शप्पथ देवून लग्नाला उभ केल. "तिने सांगितल.

"काय पोरगी आहे. मला हे चालणार नाही. तु लहान आहेस का? काय हे वागण? लग्न म्हणजे काही खेळ नाही. " त्याला काही सुचत नव्हतं. तिला रागवावस ही वाटत नव्हतं. तो नाराज होता.

हे नक्की माझ्या बाबतीतच का झालं. माझ्यात काय कमी आहे? हिला कसा मुलगा हवा होता? हिला लग्न का करायच नव्हतं? काही समजत नव्हतं. तो खुर्चीवर जाऊन बसला.

🎭 Series Post

View all