देव माणूस भाग 2

माणसातले चांगले गुण बघावे
देव माणूस भाग 2

©️®️शिल्पा सुतार

विषय... जग दोघांचं

ती कॉटवर बसलेला होती. त्याच्याकडे बघत होती. ती बोलली तर खरी पण तो चिडतो की काय ती बघत होती.

" काय झालं आहे मीरा? काही प्रॉब्लेम? तुला कोणी दुसरा मुलगा आवडतो का?" मोहनने विचारलं.

"नाही." ती म्हणाली.

" मग तू का अस करतेस? काय प्रॉब्लेम आहे? तू तुझ्या मनाने लग्न करून आली ना."

"नाही, मला हे लग्न करायचं नव्हतं. मला इथून जायचं आहे." ती म्हणाली.

"काय कारण आहे सांग तरी." त्याने परत शांततेत घेतल.

ती नुसतीच बसून होती. रुसल्यासारखी. तो खोलीत फेऱ्या मारत होता. आता तो चिडला. एकदम तिच्या जवळ आला. तिला हात धरून जवळ ओढलं.

"काय प्रॉब्लेम आहे लवकर सांग? आपला आयुष्य काही टीव्ही सिरीयल सारखं नाही. लग्न करून वेगवेगळं रहायचं. होकार द्यायचा नाही. माझ्यासमोर असे नाटक चालणार नाही. समजल ना."

ती मानेने हो म्हणाली. ती घाबरली होती. आता रडेल अस वाटत होत. त्याने तिला सोडलं.

" जा जागेवर जाऊन झोप. जे काय असेल ते उद्या बोलु. याबद्दल घरात कोणाला काही सांगितलं तर बघ." त्याने मोठ्या आवाजात सांगितलं.

ती पटकन कॉटवर गेली. तोंडावर ब्लॅंकेट घेऊन झोपली. बहुतेक ती आत मधे रडत असेल. त्याला समजत होतं. तो सोफ्यावर बसला होता. तिच्याकडे बघत होता. काय करावं सुचत नव्हतं. त्याने सोफ्यावर जोरात हात मारला.

माझ्या स्वप्नांचा चुराडा झाला. हा मूर्खपणा आहे. काय करू? हिला कस मनवू. मला हिच्या सोबत रहायच आहे.
विचार करत जरा वेळाने तो तिथेच झोपला.

तो सकाळी उठला तर मीरा कॉटवर नव्हती. बहुतेक ती आवरून बाहेर गेली होती. तो पण आंघोळ करून बाहेर आला.

आई, बाबा, दादा, वहिनी, मीरा नाश्त्याला बसले होते. तो गेल्यावर वहिनीने त्याला चहा दिला. मीरा काही झालं नसल्यासारखं काम करत होती. वहिनी उगाच त्या दोघांना चिडवत होती.

मोहन थोडासा हसला. तयार होऊन आला.

"तू कुठे चालला आहे मोहन?" दादाने विचारलं.

"मी पण तुमच्यासोबत दुकानात येतो."

" अजिबात नाही तू आठ दहा दिवस सुट्टी घे आणि तुम्ही दोघ फिरून या. " दादा म्हणाला.

" आम्ही नंतर फिरायला जावू. खूप काम खोळंबले आहेत. बऱ्याच सुट्ट्या झाल्या." तो सगळ्यांसोबत दुकानात गेला.

नाहीतरी घरात बसुन ही काय करणार. मीरा मला नकार देते आहे. तो नाराज होता.

मीरा बघत होती. तिला वाटलं होतं की तो घरच्यांसमोर तिचं नाव सांगेल. घरचे तिला बोलतील. पण तसं काही झालं नव्हतं. ती रूम मधे आली तिने तिचे कपडे बॅग मधे भरून ठेवले. मी इथे रहाणार नाही. हे माझ घर नाही. मोहन नुसते चिडतात. मला भीती वाटते.

मीराचा मैत्रिणींचा छान ग्रुप होता. त्या मुली फिल्मी होत्या. पिक्चरचे हीरो मनात बसले होते. त्यात तीच एवढ्यात लग्न करायच नाही अस सुरू होत. शिक्षण झाल तिला पुढे अ‍ॅडमिशन घ्यायचं होत ते कॉलेज शहरात होत. त्याच दरम्यान मोहनच स्थळ आल. अतिशय चांगले लोक म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यामुळे आई बाबांना वाटल लग्न करून टाकू. मीरा तिथेच अ‍ॅडमिशन घेईल तिथे नवर्‍याकडे राहील. मीरा अल्लड होती. तिला हे समजत नव्हतं.

ती दुपारी जेवण करून आराम करत होती. मोबाईल वर गाणे ऐकत होती. मोहन आत आला. त्याने रूम बंद केली. ती पटकन उठून बसली. साडी नीट केली. ती दाराकडे बघत होती.

तो तिच्याजवळ येऊन बसला. ती परत मागे सरकली. चेहर्‍यावर भीती होती.

" काही सांगायचं आहे का? तू अशी का वागते आहे? परत विचारतो. तुझं कोणा दुसऱ्यावर प्रेम आहे का?"

तिने नाही म्हटलं.

त्याला बरं वाटलं." मग काय प्रॉब्लेम आहे? अस का करतेस. माझा राग आला का? मी माफी मागू का?"

तिने मानेने नाही म्हटलं.

" काय झालं बोल तरी?" मोहन तिच्याकडे बघत होता.

" मला पुढे शिकायचं होतं बाबा नाही म्हणाले. " तिने सांगितल.

" बस इतकंच? इथे कॉलेज आहे. आपण तुझ ऍडमिशन घेऊ. शिक तुला हव तितकं. " तो म्हणाला.

"मला हिरो सारखा नवरा हवा होता. " तिने हळूच सांगितल.

आता मोहनला थोडा हसू येत होतं. "म्हणजे कसा?" त्याने विचारलं.

ती काही म्हणाली नाही.

"हे बघ मीरा मी जे विचारतो त्याचे पटपट उत्तर दे. मला राग येतो आहे. " मोहन मोठ्याने म्हणाला.

" शाहरुख खान सारखा. लहानपणापासून मी त्याचे सिनेमे बघितले. " तिने सांगितलं.

आता मोहन हसत होता. "असं प्रत्यक्षात होत नाही. ते खोट असत. "

"होतं, माझ्या मैत्रिणीचा नवरा तसाच दिसायला आहे." मीरा म्हणाली.

"बर, आता मी शाहरुख खान सारखं दिसत नाही. आता काय करायचं. एकदा बघ तरी माझ्याकडे काही कमी आहे का? "

ती त्याच्याकडे बघत होती. हे खूप चांगले वाटत आहेत. तरी पण हे हीरो सारखे नाहीत.

" तुला इथून जाता येणार नाही. लग्न झालं आहे. माझ्यासोबतच राहावं लागेल." तो म्हणाला.

मीरा चिडली होती. ती रागाने रूम बाहेर गेली. स्वतःला समजतात काय. मी त्यांच ऐकणार नाही. मला हव तेच करेन.

सासूबाईंनी आवाज दिला." मीरा, मोहन आला आहे चहा ठेव. "

ती किचन मध्ये गेली. चहा झाल्यावर मोहन परत दुकानात गेला.

थोड्यावेळाने तिने वडिलांना फोन केला." बाबा मला इथे राहायच नाही. माहेरी यायचं आहे."

"काय झालं?"

" काही नाही. मला तिकडच्या सगळ्यांची आठवण येते. तुम्ही कधी येणार. आत्ताच्या आत्ता सांगा. "

" शांत रहा जरा मीरा अस करतात का? पुढच्या आठवड्यात घ्यायला येतो." बाबा म्हणाले.

" नक्की ना बाबा."

" हो."

तिने आनंदाने फोन ठेवला. मी इथे राहणारच नाही. बाबा घ्यायला आले की मी तिकडे चालली जाईल. आता तिला बर वाटल.

🎭 Series Post

View all