देव माणूस भाग 3

माणसाचे गुण महत्वाचे
देव माणूस भाग 3

©️®️शिल्पा सुतार

विषय... जग दोघांचं

मोठी वहिनी खूप चांगली होती. तिला सपोर्ट करत होती. दोघी मिळून स्वयंपाक करत होत्या. सासुबाई पण सगळं सांभाळून होत्या.

रात्री सगळे परत घरी आले. हसत खेळत जेवण झालं. असे तीन चार दिवस मधे गेले. वहिनीला जाणवलं हे नीट बोलत नाही. मोहन मीराच्या मागे असतो. ती त्याच्याशी बोलत नाही. वेगळच वागते.

"काय झालं भावजी काही प्रॉब्लेम आहे का?"

" नाही वहिनी."

" मी तुमची बहीण आहे. मी तुमची मदत करू शकते." वहिनी म्हणाली.

तो सांगत होता. "मीराला लग्न करायच नव्हतं. अल्लड आहे. काहीतरी गोष्टी मनात धरल्या आहेत. हीरो सारखा नवरा हवा वगैरे. "

"म्हणजे? काय हे?" वहिनी हसत होती. मी तिच्याशी बोलते.

" तिच कोणावर प्रेम तर नाही ना ते ही विचारा. "मोहन म्हणाला.

हो.

रात्री जेवण झाल्यावर वहिनी सांगत होती. " तीच अस काही नाही. तिला सिनेमे आवडतात. लहान आहे. होईल ठीक. तिला वेळ द्या. तिला खूप प्रेमाने सांभाळा. तीच मन जिंका. ती पण विरघळेल. चांगली आहे साधी भोळी. "

" ठीक आहे वहिनी. " तो आत आला. ती मोबाईल वर गेम खेळत होती. त्याने शांत पणे झोपून घेतल. तो झोपल्यावर तिला बर वाटल. तिने हेड फोन लावून गाणे ऐकले. थोड्या वेळाने ती झोपली.

सकाळी मोहन दुकानात गेल्यावर तिने घरी फोन लावला. "आई , बाबा अजून घ्यायला का आले नाही. मी इथे राहणार नाही."

" तुला तिकडे काही त्रास आहे का? जावई ओरडतात का?" आईने विचारल.

"नाही. "

" सासू ओरडते का?"

"नाही. "

" जेवायला देत नाही?"

" अस नाही. उलट तर भरपूर पदार्थ असतात. मला आग्रह ही करतात." मीरा म्हणाली.

" कॉलेजला जायच होत का? "

"हो ते अ‍ॅडमिशन घेवून देणार आहेत. " मीराने सांगितल.

"मग काय प्रॉब्लेम आहे? मूर्खपणा सोड. एवढ चांगल सासर मिळालं नीट रहा. पिक्चर सारखं जिवन नसत मीरा. तू काही लहान नाही तुझ्या वयात मला दोन मुल होते. जरा जबाबदारीने वाग आणि घरात काम करत जा. जावई बापूंची काळजी घे. " आई ओरडली.

" तू बाबांकडे फोन दे. तेच माझ ऐकतात." मीरा चिडली .

"ते झोपले आहेत. "आईने खोट सांगितल. आईने फोन ठेवला.

"अहो पोरगी ऐकत नाही."

"राहील बरोबर नवीन आहे. करमत नसेल." बाबा म्हणाले.

"तुम्ही लगेच तिला घ्यायला जावू नका."

"हो."

मीरा रडत होती. आई बाबा माझ ऐकत नाही.

मोहन काहीतरी राहील म्हणून घरी आला. तो रूम मधे आला. तिने पटकन डोळे पुसले.

"आता काय झालं? का रडते आहेस? " त्याने विचारल.

तिने सांगितल नाही.

" काही बोलत नाही. काही सांगत नाही. कोणी ओरडल का?" त्याने परत विचारल.

तिने मानेने नाही सांगितल.

" मग? "

" मला आईकडे जायचं." तिने सांगितल.

"उद्या आपण जावू." तो म्हणाला.

"तुमच्या सोबत नाही मी एकटी जाणार. " ती म्हणाली.

"मी का नको. कमाल आहे. मला ही ने ना. मी तुला रस्त्यात मिसळ पाव घेवून देईल तुझा आवडता." मोहनच्या बोलण्याने ती थोडी हसली.

" मला पाणी दे." ती पाणी घेवून आली. तो दुकानात गेला.

रात्री तो रूम मधे बसला होता. मीरा आली. ती नेहमी प्रमाणे मोबाईल घेवून बसली.

"काय मग आमचा काही विचार केला का मीरा? किती दिवस अस राहणार? अस करायच नाही मीरा. आपल लग्न झाल ना. तुला इथे रहायच आहे. " मोहन म्हणाला.

तिने उत्तर दिल नाही. तिकडे तोंड करून झोपून घेतल. तो काही म्हणाला नाही. कठिण परिस्थिती आहे. हिला बघून मी किती स्वप्नं बघितले होते. तिला समजत नाही माझ तिच्यावर किती प्रेम आहे.

******

दुसर्‍या दिवशी मीरा आणि वहिनी तयार होत्या. त्या बाहेर निघाल्या. "आई आम्ही खरेदी साठी जातो आहोत. येतांना भाजी आणतो."

त्या त्यांच्या दुकानात आल्या. मोठ्या दादाने ज्यूस मागवला होता. मीराने दुकान बघितल. किती छान काम सुरू आहे. मोहन ही बिझी होता. अतिशय काॅन्फीडन्ट दिसत होता. तो ठरवेल ते सगळे ऐकत होते. त्याने तिला पूर्ण दुकान दाखवलं. अजून पुढे ते ही दुकान आपले आहेत. ती बघत होती.

त्या दोघी निघाल्या. मार्केट मधे मुल मीराच रूप बघून तिला छेडत होते. वहिनीने फोन केला. मोहन लगेच आला. तो खूप चिडला होता. त्याने एकाला कानामागे दिली.

" ही माझी बायको आहे. तिच्याकडे बघणाऱ्या लोकांचे डोळे काढून हातात देईन."

बाकीचे मुल पळाले.

" बापरे भाऊजी तुम्ही किती डॅशिंग आहात." वहिनी म्हणाली.

"वहिनी तुम्हाला तस वाटत. बाकीच्यांनी अजून शाहरुख खान आवडतो. मी कुठे हीरो आहे. कोणाला आमच काही पडल नाही." मोहन म्हणाला.

मीरा पण हसत होती. तिला छान वाटल यांनी माझ्यासाठी स्टँड घेतला. जबरदस्त फाईट केली. हे तेव्हा डॅशिंग दिसत होते. रात्री तिने त्याला थँक्यू म्हटलं.

आता ते दोघ थोड बोलत होते. ती रूम मधे बसली होती. त्याने गजरा आणून तिच्या ओटीत टाकला. तिचा आवडता मोगरा. वाह किती सुंदर आहे. तिने तो केसात माळला. मोहन खुश होता.

वहिनी बघत होती गजरा कोणी दिला. "अरे वाह भाऊजी. छान सुरु आहे." ती चिडवत होती.

******

मीराने मैत्रिणी सीमाला फोन केला. "तू या शहरात आहे आपण भेटू. पिक्चरला जावू."

"मी नंतर बोलते." तिने फोन ठेवून दिला.

हिला काय झाल? मीरा विचार करत होती.

संध्याकाळी ती चहा ठेवायला आली. खूप छान वास येत होती. "वहिनी समोसे?"

"हो तुला आवडतात ना. जिलेबी पण आहे. मोहन भाऊजी घेवून आले."

ती बघत होती तो छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेत होता. "चहा घे तयार हो ."

"कुठे जायच आहे ."

" एका ठिकाणी पूजेला."

निळी साडी नेसून ती तयार होती. "चला वहिनी."

"मी येत नाही तुझे दादा घरी आहेत. तू मोहन सोबत जा."

मोहन तिच्याकडे बघत होता. छान दिसते आहेस. त्याने तिचा हात हातात घेतला. तिने तो काढून घेतला. त्याने परत हात पकडला. तिच्या हातात बांगडी घातली. अतिशय सुंदर सोन्याचे कडे होते. ती बघत होती. हो तुझ्यासाठी केले.

ती खुश होती. " मला पटवायचा प्रयत्न आहे वाटत. तुम्ही माझ्या मागे आहात का?"

" माझ्या हातात तेच आहे .बघू तुला कधी पाझर फुटतो." तो म्हणाला.

ती लाजली होती. ती मोटर सायकल वर त्याच्या मागे बसली होती. दोघ ओळखीच्या लोकांकडे गेले. तिथून ते मंदिरात आले. देवदर्शन झाल्यावर छान नदी किनारी बसले होते.

🎭 Series Post

View all