Login

देव माणूस भाग 4 अंतिम

माणसातले गुण बघावे
देव माणूस भाग 4 अंतिम

©️®️शिल्पा सुतार

विषय... जग दोघांचं

दोघ छान नदी किनारी बसले होते.

" तुझ्या बद्दल सांग. " तो म्हणाला.

" काही विशेष नाही. माझ आता कॉलेज झाल. आमचा छान ग्रुप होता. बर्‍याच मैत्रिणींचे लग्न झाले."

"तुमच्या ग्रुपला पिक्चर बघायचा खूप शौक होता का?" त्याने विचारल.

"हो तुम्हाला कस माहिती?"ती म्हणाली.

" असच. शाहरुख खान मुळे वाटलं."

तो विचार करत होता ही खरच भोळी आहे. ती खूप बोलत होती. तो ऐकत होता.

" तुझ पुढचं अ‍ॅडमिशन घेवून टाक. "

ती विचार करत होती इथे अ‍ॅडमिशन घेतल तर मी अडकेल. मला आईकडे जायच आहे. पण तसे हे चांगले आहेत. मी थोडे दिवस आईकडे जाणार आहे. तिकडून आल्यावर ठरवते. ती आई, बाबांशी बोलणार होती.

आजकाल तीच मन मोहनकडे ओढ घेत होत. तो घरी असला की ती खुश असायची. त्याच काम करायची. त्याला ही ते समजत होत.

बाबा घ्यायला आले. ती खुश होती. घाईत तयारी करत होती. मोहन आत आला. "मी निघू?" तिने विचारल.

त्याने तिला पैसे दिले.

"इतके पैसे?"

"असू दे तिकडे सगळ्यांना कपडे घे. तुला ही हव ते घे आणि लवकर ये मी वाट बघतो आहे." मोहन म्हणाला.

ती आपोआपच हो म्हणाली. तिला कसतरी वाटल. मी काय करू समजत नाही .

ती निघतांना सासुबाई, वहिनी दोघी हळव्या झाल्या होत्या. "लवकर ये आम्हाला करमणार नाही."

मोहन ही तिच्याकडे बघत होता. तीही त्याच्याकडे बघत कार मधे बसली. रस्ताभर ती त्याचा विचार करत होती.

ती माहेरी आली. आई भेटली. ती खूप खुश होती. तीच रूम, तिच्या वस्तू. ती आरामात होती. तिने टीव्ही बघितला. गाणे ऐकले. एक दोघी मैत्रिणींना फोन केले तरी वेळ जात नव्हता.

तिला एका दिवसात करमत नव्हतं. सकाळी वहिनीचा फोन आला. ती त्यांच्याशी बोलत होती.

मोहन ऐकतं होता. ही काय विचार करते काय माहिती. मला तिच्या शिवाय करमत नाही.

"आई काय केल ग जेवायला?"

तिच्या आवडीचे कढी फूनके होते. ती खुश होती. जेवत होती. लहान भाऊ कॉलेज मधून आला. "ताई तुझी ती मैत्रीण अ‍ॅडमिट आहे."

"कोण?"

"सीमा."

"काय झालं?"

"माहिती नाही तिला खूप लागल आहे."

"बापरे एक्सीडेंट झाला की काय? त्या दिवशी तर मी तिला फोन केला होता विशेष बोलली नाही." मीरा म्हणाली.

मीरा अजून एक दोन मैत्रिणी सोबत हॉस्पिटल मधे गेली. सीमा खूप रडत होती. काय झालं? सगळे विचारत होते.

तिचा तो शाहरुख खान सारखा दिसणारा नवरा तिला खूप त्रास देत होता. रोज मारहाण करत होता. तिच्या अंगावर खूप वळ होते. तो तिच्या आई बाबांकडे बिझनेस साठी सारखे पैसे मागत होता. रोज खूप छळ होता.

तिची कहाणी ऐकून सगळ्यांना वाईट वाटत होत. काही मैत्रिणी तर रडत ही होत्या. तिच्या नवर्‍यावर पोलीस केस केली होती. त्यांचे खूप भांडण सुरू होते.

मीराला रात्री झोप येत नव्हती. बापरे सीमाला किती मारल आहे. मला तर तिचा नवरा चांगला वाटला होता.

मी किती चुकीच विचार करत होती. रंग रूप वर जात होती. माझ्या आयुष्यातला खरा हीरो मोहन आहे. ते किती लाड करतात, चांगले वागतात. माझ्या पुढे मागे असतात. मोहनने एकदाही बळजबरी मला हात लावला नाही. दागिने, पैसे कशाची कमी नाही. मला कितीतरी वस्तू घेवून येतात. माझ्या मनाच करतात. मला देव माणूस भेटला आहे. माझ्यासाठी जगाशी लढणारा. काळजी घेणारा.

त्याचा फोन आला. ती रडत होती.

"काय झालं कोणी काही बोललं का?" मोहनने प्रेमाने विचारल.

"नाही."

"मग? काही घ्यायच का? पैसे पाठवू का? "त्याने विचारल.

"मला घरी यायच तुमच्या जवळ." ती म्हणाली.

"काय?" त्याला आनंद झाला होता.

"हो. माझ चुकलं."

"माझी खूप आठवण येते का?" त्याने मुद्दाम चिडवत विचारल.

हो.

" काही नको तू तिकडे रहा. इकडे आली की तुला माहेरी जायच असत. माहेरी असली की सासरी यायच असत." तो म्हणाला.

"मी अस करणार नाही. मला समजल. माझी चुकी झाली तुम्ही खरे हीरो आहात. मला शाहरूख खान नको." ती म्हणाली.

"माझ्या सोबत रहावं लागेल. नखरे चालणार नाही. " त्याने सांगितल.

" तुम्ही म्हणाल ते करेन. "ती म्हणाली.

"खरच ना?"

"हो मला घ्यायला या."

" बघ ह परत माहेरी पाठवणार नाही."तो मुद्दाम म्हणाला.

" चालेल."

दुसर्‍या दिवशी ती बॅग भरून तयार होती. घरचे बघत होते. काय सुरू आहे?" मीरा कुठे जायची तयारी? "आईने मुद्दामून विचारल.

"मी माझ्या घरी जाते. " ती म्हणाली.

" तू इकडे राहणार होती ना?" बाबा विचारत होते.

"नाही." तिने सांगितल. आई, बाबा खुश होते.

मोहन आला. चहा पाणी झाल्यावर ते दोघ निघाले. गाडीवर ती त्याला चिटकून बसली होती. त्याला फरक जाणवत होता. "काय झालं?"

ती सीमा बद्दल सांगत होती.

"ओह तो हीरो व्हीलन निघाला."

" मी तुला त्रास दिला तर? " त्याने विचारल.

" तुम्ही चांगले आहात. मला माहिती आहे. सॉरी ना."

मोहन छान हसत होता. तो खूप खुश होता. ते घरी आले सासुबाई, वहिनी खुश होत्या. मोहन दुकानात गेला. रात्री परत आला. जेवण झाल.

तो रूम मधे तिची वाट बघत होता. ती आवरून आली. त्याने दरवाजा बंद केला. ती घाबरली होती. त्याने तिला मिठीत घेतल." पुढे जायच ना? " हळूच विचारल.

हो... ती अजून त्याला बिलगली. तो हळू हळू तिला जवळ घेत होता. ती त्याच्या प्रेमात खुलत चालली होती. तिचा होकार होता . दोघांनी छान सोबत वेळ घालवला.

सकाळी ती झोपलेली होती. त्याने तिला प्रेमाने उठवलं. "मला दुकानात जायच आहे. उठ. चहा दे. "

दोघ खुश होते. त्यांना बघून घरचे ही खुश होते.

ती आवरत होती. वहिनी तिला चिडवत होती. तिने वहिनीला मिठी मारली. "असेच खुश रहा." वहिनी म्हणाली.

पुढच्या आठवड्यात दोघ फिरायला गेले. तिने कॉलेज मधे अ‍ॅडमिशन घेतल. मोहन तिला रोज कॉलेज मधे सोडायला येत होता. तिच्या मैत्रिणी बघत होत्या.

"तुमच लव मॅरेज का?" त्या विचारत होत्या. नवरा खूप प्रेमाने वागतो.

"हो माझा नवरा माझा हीरो आहे. तो खूप चांगला आहे. " ती गर्वाने म्हणाली.

🎭 Series Post

View all