Login

देवदूत..

कविता
सगळे रस्ते बंद झाल्यावर खचून बसलो एका जागी
अचानक तू भेटला मित्रा अगदी देवदुत रुपानी
आपली मैत्री तशी खूप जुनी पण मध्ये भेट झालीच नाही
त्या दिवशी कसे तू ओळखले मला इतक्या गर्दीत मलाच कळले नाही
हताश होऊनी बसलो असता देवाला मी कोसत होतो
का इतके दुःख माझ्याच नशीब तू लिहीत असतो
पण तेव्हा कुठे माहिती होते तो तर सगळ्यांचा विचार करून ठेवतो
आणि असा अचानक माणसाच्या रूपात आपल्या समोर येतो.
असे म्हणतात देव सगळीकडे जाऊ शकत नाही
म्हणून आपला देवदूत तो असा अचानक पाठवीत असतो.