आपण सर्वांनी देवमाणूस ही मराठी सिरीयल पाहिली असेलच, त्या सिरीयल चे दोन भाग आपल्याला दाखवण्यात आले. त्यात संतोष पोळ ची कहाणी, सत्यघटना आपल्यासमोर डायरेक्टरणी व्यवस्थितरित्या मांडली आहे.
संतोष पोळ ने केलेले गुन्हे त्याला दिलेली ज्योती ने साथ आणि त्याने कशा प्रकारे बायकांना फसवून त्यांची हत्या केली हे चांगलेच साधरीकरण केले आहे.
तर मि आज देवमाणूस बद्दलची खरी गोष्ट तुमच्या समोर मांडणार आहे.
खरं तर अभिनेता किरण गायकवाड यांनी ही भूमिका साकारली ती म्हणजे खरा संतोष पोळ ह्याची.
ही घटना साताऱ्यातील वाई धोम येथे घडली, स्त्रियांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे खून करायचा आणि चांगल्या रीतीने डोकं लावून त्यांचे पुरावे नष्ट करायचा. त्याने रेश्मा, अपर्णा आणि मंजुळा ह्या तिघींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे खून केले.

कंपाउंडर असलेला अजित कुमार देव हा सिरीयल मध्ये डॉक्टर बनलेला दाखवला आहे. तो डॉक्टर बणुन सगळ्यांची सेवा करताना दाखवलाय, आणि त्यामुळे लोकं त्याला देवमाणूस म्हणुन ओळखू लागले.
खऱ्या आयुष्यात तो एक कंपाउंडर असतो आणि बोगस डॉक्टर बणुन त्याचा फायदा घेऊन तो सगळ्यांची हत्या करताना दिसतो.
जवळ जवळ सहा खून केल्या नंतर तो गायब होतो, खून काय लोकांना तोह जिवंत गाढतो.
पोलिसांनी संतोष पोळ ह्याचा खुप तपास करतात, तेरा वर्ष तो त्याचे धंदे, लोकांना फसवण्याचे काम चालूच ठेवतो आणि शेवटी मुंबई मधल्या दादर येथून त्याला अटक करण्यात येते.
पोलिसांनी संतोष पोळ ह्याचा खुप तपास करतात, तेरा वर्ष तो त्याचे धंदे, लोकांना फसवण्याचे काम चालूच ठेवतो आणि शेवटी मुंबई मधल्या दादर येथून त्याला अटक करण्यात येते.
सिरीयल मध्ये त्याने डिंपल ( डिंपी ) हिची मदत घेताना दाखवली आहे. तर खऱ्या आयुष्यात त्याच्या ह्या कर्म कांडामध्ये त्याने ज्योती मांद्रे हिची मदत घेतो. ज्योती मांद्रे ही परिचारिका असते. ज्योती हिची संतोष पोळला खुप मदत होते आणि जेव्हा तिला अटक होते तेव्हा संतोष पोळ ह्याचे अनेक प्रकरण उघडकीस येतात आणि शेवटी ज्योती ही माफिची साक्षीदार होते.
ति स्वतःचा गुन्हा कबूल करते.
संतोष पोळ ह्याची डॉक्टर डिग्री ही बोगस असते. पोलिसांनपासुन तेही लपले जातं नाही, त्याचे सर्टिफिकेट खोटे असल्याचे पुरावे ही समोर येतात.
संतोष पोळ ह्याची डॉक्टर डिग्री ही बोगस असते. पोलिसांनपासुन तेही लपले जातं नाही, त्याचे सर्टिफिकेट खोटे असल्याचे पुरावे ही समोर येतात.
ज्योतीने सांगितल्या प्रमाणे पोलीस त्याच्या फार्महाऊस वर छापा टाकतात तेव्हा नारळाच्या झाडाखाली त्यांना माणसाचा सांगाडा सापडतो. आणि जेव्हा त्या सांगाड्याचे तपासासाठी अवशेष घेण्यात आले तेव्हा तो सांगाडा मंजुळा जेठे हिचा असल्याचे उघडकीस आले.
एक सांगाडा समोर आल्यामुळे पोलिसांनी अजुन खोदकाम करण्यास सुरवात केली तेव्हा अजुन पाच सांगाडे समोर आले.
सिरीयल मध्ये आपण पाहिलं कि कित्येकदा डॉक्टर अजितकुमार देव वर पोलिसांचा सौंशय येतो, पण तेवढ्याच चलाखीने तो सुटतो. तसंच तो खऱ्या आयुष्यात ही अनेकदा पोलिसांच्या तावडीतून सुटतो.
गावात अनेक जण बेपत्ता आहेत पोलिसांना संतोष पोळ वर सौंशय आहे. ते खरंच बेपत्ता आहेत कि संतोष पोळ चे शिकार झालेत.
एकीकडे संतोष पोळ हा भ्रष्टाचार विरोधी म्हणुन काम करत होता. जेव्हा मंगला जेधे ह्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांवर दबाव टाकला तेव्हा संतोष पोळ ह्याची चौकशी करण्यात आली. पण संतोष पोळ ने गुन्हा मान्यच केला नाही. उलट फसवणूकीचा आळ हा मंगला जेधे वर घातला.
मंगला जेधे चा मोबाईल ट्रेस करण्यात आला तेव्हा तिचा मोबाईल, नर्स ज्योती मांद्रे हिच्या कडे सापडला. ज्योती ही संतोष पोळ कडे काम करत होती, आणि म्हणुनच पोलिसांनी तिची चौकशी करण्यास सुरवात केली. तिच्या वर दबाव टाकला तेव्हा तिने मंगला जेधे ह्यांना संतोष पोळ ने मारले आणि त्यांना फार्महाऊस वर गाढले असल्याचे कबूल केले.
ज्योती पोलिसांसमोर गुन्हा कबूल करणार हे माहित असताना, संतोष पोळ ने मुंबई गाठली.
2003 मध्ये संतोष पोळ ने पहिली हत्या केली, उपचाराच्या बहाण्याने तो रुग्णांना स्वतःच्या फार्महाऊस वर बोलवायचा. इंजेक्शन देऊन त्यांचं शरीरकार्य थांबवायचा आणि त्यांना जिवंत गाढायचा, आणि त्यावर नारळाच झाड लावायचा.

पण ह्या सगळ्या प्रकरणात एकही पुरुषाचा मृतदेह सापडला नाही. त्यामुळे हे असे सिद्ध होते कि त्याने प्रेमाच्या जाळ्यात अडकवून ह्या महिलांचे खून केले आणि त्यांची संपत्ती हडपली.
वाई मधल्या डॉक्टर घोटावडेकर ह्यांच्या दवाखान्यात ज्योती आणि संतोष पोळ ह्याची ओळख झाली. ज्योती सांगते कि 13 ऑगस्ट 2013 रोजी ह्यांनी वाई मधल्या एका मंदिरात दोघांनी लग्न केल.
संतोष पोळ हा लोकांना स्वतः mbbs डॉक्टर असल्याचे सांगायचा, पण त्याच्याकडे इलेक्ट्रॉहोमिओपॅथी ची पदवी होती. आणि त्याने अनेक हॉस्पिटलमध्ये ओपॅरेशनथेटरमध्ये काम केले होते, आणि त्यामुळे त्याला ऑपरेशन दरम्यान वापरल्या जाणाऱ्या अनेक औषधंची माहिती होती.
महिलांचे खून केल्या नंतर जेसिबी च्या मदतीने तो खड्डे बनवून घ्यायचा, आणि रात्रीच्या वेळी त्यांना त्या खड्डयामध्ये पुरवायचा.
मृतदेह चा कुजल्यावर वास येऊ नये म्हणुन त्याने घरात कोंबड्या पाळल्या होत्या. त्या कोंबड्याच्या वासात त्या मृतदेहचा वास यायचाच नाही. आणि त्यामुळे त्याच्यावर कोणाचा सौंशय जायचा नाही.
ज्योतीच्या मदतीने हे गुन्हे केले पण तिच्याच मदतीने त्याचे अनेक गुन्हे उघडकीस आले.
वाई पोलिसांनी संतोष पोळला 11 ऑगस्ट 2016 रोजी अटक केली. संतोष ने फक्त सहा खु्नांची कबुली दिली पण त्याने अजुन अनेक गुन्हे केल्याचे पोलिसांना सौंशय आहे.
वाई पोलिसांनी संतोष पोळला 11 ऑगस्ट 2016 रोजी अटक केली. संतोष ने फक्त सहा खु्नांची कबुली दिली पण त्याने अजुन अनेक गुन्हे केल्याचे पोलिसांना सौंशय आहे.
संतोष पोळ ऑर्गन रॅकेट चालवायचा असेही पोलिसांना सौंशय असल्याचे समोर येतंय.
आज ही कोर्टात संतोष पोळ बद्दल खटला चालू आहे, त्याला चांगली शिक्षा होईल याची खात्री आहे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा