Login

देवयानी, विकास आणि किल्ली भाग २४

विकास ला कोविड मुळे हॉस्पिटल मधे अॅडमिट करावं लागलं आता पुढे काय ?

      देवयानी विकास आणि किल्ली.

पात्र परिचय

विकास                          नायक

देवयानी                         नायिका  

सुप्रिया                         देवयानीची मैत्रीण

लक्ष्मी                          सुप्रियाची रूम पार्टनर.

राजू                           सुप्रियाचा मित्र

शीतोळे                         पोलिस इंस्पेक्टर

भय्या                          विकासचा मोठा भाऊ.

अश्विनी                         विकासची वाहिनी, भैय्याची बायको

भगवानराव                       विकासचे बाबा

यमुना बाई                      विकासची  आई

गोविंद राव                      देवयानीचे बाबा

कावेरी बाई                      देवयानीची आई.

मावशी आणि काका               देवयानीची मावशी आणि तिचे मिस्टर

मनीषा                         विकासची बहिण

अंकुश                          मनीषाचा नवरा.

सुरेश                           देवयानीचा भाऊ.

विश्राम                         देवयानीचा चुलत भाऊ.

विनोद                          विकास चा चुलत भाऊ

प्रिया                           विकासची चुलत बहीण.

सेजल                          देवयानीची अमेरिकेतली रूम मेट.

पूर्णिमा                          देवयानीची अमेरिकेतली रूम मेट.

राजेश                          विकासचा मित्र.

  भाग   २४

भाग  २३    वरून  पुढे  वाचा ................

थोडा वेळ विचार केल्यावर सेजल जे अनपेक्षित रित्या बोलून गेली होती, ती कल्पना देवयानीला पटायला लागली होती. काय हरकत आहे त्याच्या hospitalisation चा उपयोग करून घेतला तर ? तो चांगला असता  आणि खोटं सर्टिफिकेट दिलं असतं, तर ते अनैतिक झालं असतं. पण आता कंडिशन बदलली आहे त्यामुळे असं करण्यात काहीही गैर नाही. उलट, त्याची काळजी घ्यायला मी तिथे असेन. सेजल म्हणाली त्या प्रमाणे त्याची recovery पण लवकर होऊ शकेल. तो समोर असला तर माझ्या मनाची पण उलघाल होणार नाही. तिच्या मनाने निर्णय घेतला, आणि मग ती कामाला लागली.  तिने आंघोळ, नाश्ता वगैरे आटोपला आणि फोन घेऊन बसली. आधी एयर इंडिया च्या हेल्प लाइन ला फोन लावला. वेगवेगळ्या नंबर वर फोन करून  बोलणं झाल्यावर  तिला एकदाचा प्रॉपर माणूस भेटला. त्याला देवयानीनी सिचुएशन काय आहे याची कल्पना दिली. तो म्हणाला की बघतो काय करू शकतो ते आणि तुम्हाला मेल करतो.

आता मेल ची वाट पाहण्या पलीकडे, करण्या सारखं काहीच नव्हतं मग ती झोपायला गेली. आणि शक्य ते सर्व केल्या मुळे तिला शांत झोप पण लागली.

दुपारी तिला मेल आली. त्यात सोमवारी तिला भेटायला बोलावलं होतं.

रात्री तिने नागपूरला फोन केला. आज तिच्या डोक्यावर टेंशन नव्हतं. त्यामुळे हसऱ्या आणि प्रसन्न मूड मध्ये तिने विडियो कॉल केला. तिचा नेहमी सारखा प्रसन्न चेहरा बघून नागपूरकरांचा जीव भांड्यात पडला. त्यांना पण बोलायचं उत्साह आला.

हॅलो देवयानी, आज खुशीत दिसते आहे स्वारी. काय खास.

अहो वहिनी, मी आज एयर इंडिया च्या ऑफिस ला कॉनटॅक्ट केला होता. वेळ लागला पण संबंधित अधिकारी भेटला. त्याला मी नागपूरची  सिचुएशन सांगितली आणि पटवून दिलं की होणारी बायको या नात्याने माझं नागपूर ला  असणं किती आवश्यक आहे ते.

मग ?

त्यांनी मला सोमवारी भेटायला बोलावलं आहे. I will do my best. असं म्हणाला.

मग आता सांगा आहे की नाही खुशी ची गोष्ट ?

अग तूच काय, आम्हाला पण आनंद झाला आहे विकासची आई म्हणाली.

आता तुम्ही सांगा वहिनी, काय अपडेट आहे ?

विकास ला काल इंजेक्शन चा पहिला डोस दिला.

पहिला डोस ? म्हणजे असे किती इंजेक्शन द्यायची आहेत ?

पांच पण तसे सहा.

म्हणजे ?

म्हणजे पहिला डोस दोन इंजेक्शन चा असतो.

हे नवीनच ऐकते आहे मी.

आम्हाला पण माहीत नव्हतं. कोरोंना नवीन आहे त्यामुळे मग सगळंच नवीन.

मग आता बाकीचे कसे देणार ?

जसं अलॉटमेंट होईल त्या प्रमाणे देतील. खरं म्हणजे रोज एक द्यायला पाहिजे. डॉक्टर म्हणाले की तुम्हाला अरेंज करता आले तर बघा.

पण वहिनी, तुम्हीच तर म्हणाल्या होत्या की सरकारच वितरण करणार म्हणून.

हो, पण अजूनही ब्लॅक मध्ये मिळताहेत असं म्हणतात. हे त्या दृष्टीने प्रयत्न करताहेत. बघूया मिळतं का ? नाही तर जेंव्हा allot  होईल तेंव्हा.

बाकी कंडिशन कशी आहे आता ?

काही विशेष फरक नाहीये, ऑक्सिजन लेवल अजूनही ८५-९० च्या आसपास fluctuate होते आहे, आणि खोकला पण बराच आहे. पण डॉक्टर म्हणताहेत की इंजेक्शन चे किमान तीन डोस गेले की फरक दिसायला लागेल.

ठीकच आहे. मग उद्या रात्री बोलू आता. अरे, हो एक मिनिट वहिनी,

हं बोल.

मी काय म्हणते,

आणि असं म्हणून, देवयानी गप्प बसली. तिला सुचेना की कसा  विषय काढावा ते.

अग बोल ना.

बोलू ?

अग विचारते काय आहेस, बोल पटकन.

तुम्हाला राग आला तर ?

नाही येणार राग, काय हो आई ?

हो हो, नाही रागवणार आम्ही, तू बोल बाळा, जे काही मनात असेल ते बोलून टाक. यमुना बाई म्हणाल्या. यमुना बाईच बोलल्या मुळे देवयानीला धीर आला.

मला तुम्ही, विकासची हॉस्पिटल मध्ये ट्रीटमेंट चालू आहे असं हॉस्पिटलचं सर्टिफिकेट आणून द्याल का ?

सगळे एक क्षण भर तिच्याकडे पहात  राहिले आणि मग सगळेच हसायला लागले.

त्यांचं हसणं थांबल्यावर देवयानीनी विचारलं

वहिनी, काय झालं ? एवढं हसायला काय झालं ? मी काही विनोदी बोलले का ?

अग नाही, आम्ही सुद्धा तुला आत्ता तेच सुचवणार होतो. पण कसं सांगायचं तुला, तुला आवडेल की नाही, याचाच विचार करत होतो. यांनी तर सर्टिफिकेट आणून पण ठेवलं आहे काल. आम्ही तुझी काय रिएक्शन असेल याचाच विचार करत होतो, तर आत्ता तूच विषय काढला. म्हणून हसायला आलं.

औँ, काय सांगताय ? आणि देवयानीला एकदम हसू फुटलं. अगदी खळखळून हसायला आलं. अगदी नेहमी जशी हसायची तशीच. आणि साथी चा रोग असल्या सारखा नागपूरकर सुद्धा सगळेच तिच्या बरोबर हसायला लागले. वातावरण एकदम हलकं  झालं, मळभ  निघून गेलं होतं.

भैय्या म्हणाला की

देवयानी, मी तुला सर्टिफिकेट ची कॉपी आणि एंगेजमेंट चे अंगठी घालतांनाचे दोन फोटो whatsapp केले  आहे. आत्ताच बघून घे.

भाऊजी, फोटो कशाला ?

असू दे. सरकारी काम आहे, जर तो म्हणाला की तुमचं लग्न ठरलं आहे याला पुरावा काय ? तर तेंव्हा हे फोटो तू दाखवू शकतेस.

होss, माझ्या लक्षातच आलं नाही.

वातावरण इतकं नॉर्मल झालं होतं की बराच वेळ अवांतर गप्पा झाल्यावर देवयानीनी फोन ठेवला.

सोमवारी इंटरव्ह्यु झाला. सर्टिफिकेट चा उपयोग झाला. तिला बूकिंग ला clearance मिळाला. जुलै महिन्यांची ५ तारखेचं बूकिंग पण मिळालं. आता देवयानीच्या आनंदाला काही सीमा राहिली नाही. आता विचार चालू झाले की कोणा  साठी काय खरेदी करायची, काय न्यायचं वगैरे. आल्यावर सेजल ला सांगितलं की बूकिंग मिळालं म्हणून.

तू त्या दिवशी म्हणालीस आणि बघ मिशन सक्सेसफुल.

अभिनंदन देवयानी.

थॅंक यू सेजल.

रात्र देवयानीनी

नागपूर ला विडियो कॉल  केला.

काय देवयानी काय न्यूज ? अश्विनीनी विचारलं.

पांच जुलै चं बूकिंग झालं आहे.

अरे वा. अभिनंदन सगळ्यांनीच मग तिचं अभिनंदन केलं.

देवयानी, quarantine मध्ये राहावं लागणार आहे का ग आल्यावर ?.

हो, माझा होम quarantine साठी प्रयत्न चालू आहे. त्यासाठी एक exemption चा फॉर्म  भरावा लागतो. तो मी भरणार आहे. जर झालं, तर घरीच १४  दिवस नाही झालं तर एखाद्या हॉटेल मध्ये सोय करावी लागेल मुंबईला.

अरे बापरे, देवयानी, मग हॉटेल बूक केलं का ?

नाही. मुंबईला आल्यावर तिथे पण एक टेस्ट होईल आणि मग तेच लोक ठरवतील. आपल्याला ते हॉटेलची यादी आणि त्यांचे rates देतात, आपण त्यातून सिलेक्ट करायचं. अशी प्रोसीजर आहे.

अरे देवा, कठीणच आहे सर्व. म्हणजे भारतात आल्यावर सुद्धा बेळगाव ला जायला १४-१५ दिवस लागतील.

हो वहिनी, असं होऊ शकतं.

भैय्या मध्येच बोलला

देवयानी, माझ्या मनात आत्ताच एक विचार आला, सांगू का ?

काय भाऊजी, सांगा न.

ए, देवयानी, तू मला भाऊजी वगैरे म्हणू नकोस. सरळ  भैय्या च म्हण. ते भाऊजी वगैरे म्हंटलं की मला फेटा, पगडी बांधल्या सारखं वाटतं. भैय्याच ठीक आहे. विकास मला भय्या म्हणतो, तू ही तेच म्हण.

बरं. तुम्ही म्हणता तसं. पण हेच सांगायचं होतं का ? आणि देवयानी प्रसन्न हसली.

लगेच अश्विनी म्हणाली, देवयानी, तू अशीच मोकळे पणाने  हसत रहा. घर उजळून निघाल्या  सारखं वाटतं. काय आई, बरोबर आहे ना ?

हो तर, अगदी खरं आहे. अग गेले काही दिवस तुझा मलूल चेहरा बघून आम्हाला सुद्धा उदास व्हायला झालं होतं.

देवयानीनी एक स्माइल दिलं, आणि म्हणाली की भैय्या भाऊजी काय सांगत होते, ते सांगा ना.

अरे काय देवयानी, पुन्हा भाऊजी ?

असू द्या हो, माझी जीभ नाही रेटत तुम्हाला नुसतं भैय्या म्हणायला. हिन्दी सिरियल मध्ये होतं असं, मला नाही जमणार. ते जाऊ द्या, तुम्ही काय सांगणार होता ?

ओके. हे बघ, तू जर बेळगाव ला गेलीस तर नागपूरला येता  नाही येणार.

का असं ?

एक तर सर्व बंद आहे, म्हणजे, गाड्या बंद, बसेस बंद, flights बंद. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायला बंदी. इतकंच काय, जिल्हा बंदी सुद्धा आहे. अश्या कंडिशन मध्ये तू बेळगाव हून नागपूर ला कशी येणार ?

अरे देवा, मग आता मी काय करू ?

Destination नागपूर दाखव. म्हणजे तिथून मुंबई आणि मुंबई हून नागपूर. असं तुला येता येईल. पण ऑफकोर्स नागपूर वरुन तुला हलता येणार नाही. नाही म्हंटलं तरी, तू ट्रान्सपोर्ट ओपन होई पर्यन्त नागपूरलाच अडकून पडशील. बघ. सोच  लो

पण मी विकासची शुश्रूषा करायलाच भारतात येणार आहे, ते मी बेळगाव ला राहून कशी करणार ? आणि आता नागपूरच तर माझं गाव आहे, नाही का ? मी नागपूरलाच  येते.

भगवानराव मध्येच बोलले.

आम्हाला असं वाटतं देवयानी, की तू आधी तुझ्या आई, बाबांना विचारावस. साखरपूडा झाला असला, तरी अजून लग्न व्हायचं आहे आणि मुलगी लग्ना आधीच सासरी राहायला जाते म्हंटल्यावर त्यांची वेगळी मतं असू शकतात.

हो. बाबा विचारते.

ठीक तर मग तू विचार, डिसकस कर त्यांच्याशी. आपण उद्या तू फोन करशील तेंव्हा या विषयावर बोलू.

बाबा, आपण एवढं सगळं बोललो, पण विकास ची तब्येत कशी आहे हे सांगीतलंच नाही.

अग भैय्याने कसं तरी करून जुगाड लावून, चारही इंजेक्शन ची सोय केली. हॉस्पिटल मध्ये जमा पण करून आला आहे आज. आता आज पासून रोज एक इंजेक्शन दिल्या जाईल. त्यामुळे उद्या कळेल आपल्याला किती सुधार आहे तो. कारण आजच्या रात्रीचं धरून दोन डोस दिल्या जातील. ओके ?

ओके, ठेवते मी आता.

दुसऱ्या दिवशी, नेहमी प्रमाणे सगळं आटोपून सेजल आणि देवयानी आपापल्या रूम मध्ये लॅपटॉप घेऊन बसल्या. थोड्या वेळाने सेजल कशाला तरी बाहेर आली होती, तेवढ्यात डोअर बेल वाजली. सेजल बाहेरच होती म्हणून तिने दार  उघडलं. दोघींचं बोलणं चालू होतं. वेगळाच आवाज आला म्हणून कोण आलं आहे हे पाहण्यासाठी देवयानी पण बाहेर आली. पूर्णिमा आली होती. चेहरा उतरला होता. आवाज कांपरा झाला होता. आणि एकदम दोघींच्या गळ्यात पडून रडायलाच लागली. सेजल आणि देवयानी दोघीही पहातच राहिल्या. काय झालं आहे हे कळायला काहीच मार्ग नव्हता.

पांच मिनिटांनी तिचे हुंदके  थांबले. मग सेजलने तिला खुर्चीवर बसवलं आणि देवयानी पाणी घेऊन आली. पाणी प्यायल्यावर पूर्णिमा थोडी शांत झाली. थोड्या वेळ तशीच चुपचाप बसून राहिली. देवयानी आणि सेजल तिच्या बोलण्याची वाट बघत होत्या. सेजल म्हणाली की तिला आधी शांत होऊ दे मग आपण बोलू. आणि देवयानीनी मान हलवली. पण तेवढ्यात दोघींचेही कॉल आले मग सेजल म्हणाली

पूर्णिमा, तू फ्रेश हो. नाश्ता तयार आहे, तो खाऊन घे. तो पर्यन्त आमचे कॉल घेतो मग आपण बोलू. आणि दोघीही  आपापल्या रूम मध्ये गेल्या. पूर्णिमा पण त्यांच्याच ऑफिस मधली होती त्यामुळे तिला काही वाटलं नाही. ती फ्रेश व्हायला गेली.

दोनेक तासाने  सेजल बाहेर आली तेंव्हा पूर्णिमा गाढ  झोपली होती. सेजल नी  काही तिला उठवलं नाही. पण नंतर दोघींनाही काम संपवून मोकळं व्हायला संध्याकाळचे सात वाजले. बाहेर पूर्णिमा एकटीच बसली होती. झोप झाल्या मुळे  चेहरा तसा बरा दिसत होता. सेजल ने चहा केला आणि मग तिघी बसल्या.

हं पूर्णिमा सांग आता, काय झालय ते.

पूर्णिमाचा चेहरा पुन्हा कसा नुसा झाला. रडवेल्या आवजातच म्हणाली की

तुम्हाला मी सनातनी म्हणून चिडवत होते पण काल कळलं की तुम्हीच बरोबर वागत होत्या म्हणून. तुमचं न ऐकल्यामुळे माझी फार वाताहत झाली. आणि तिला भावना आवरता आल्या नाहीत. ती रडायलाच लागली.

 क्रमश:.......

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

माझ्या ब्लॉग ची लिंक देत आहे माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा. 

https://www.irablogging.com/profile/dilip-bhide_4187

धन्यवाद. 

0

🎭 Series Post

View all