"आई, तू आणि इथे! मानसी आपल्या आईला जाऊन बिलगली.
"एकटी कशी आलीस?"
"अगं, हे काय राघव आलेत ना. तुमच्या मुलीला माहेरी यायला जमलं नाही. मस्त सरप्राइज देऊ म्हणून मला सोबत येण्याचा आग्रह केला त्यांनी. आता जावयाचा मान राखायला हवा ना. लगेच हो म्हणाले." अरुंधती ताई म्हणाल्या.
"या..अहो, लेकीच्या लग्नानंतर पहिल्यांदाच येताय. पण तुमचे स्वागत करायला मी काही उभी राहू शकत नाही. कारण पाय चांगलाच मुरगळला आहे." मनोरमा बाई बसल्या ठिकाणाहून म्हणाल्या.
"आई, पाय कसा मुरगळला?" राघव आत येत म्हणाला.
"ते आपलं.. बाथरूममध्ये जाताना मुरगळला." बाई चेहरा कसनुसा करत म्हणाल्या.
"तुला हजार वेळा बजावलं आहे. सगळी कामं मानसीला सांगत जा म्हणून. पण तुला दंडगा उत्साह असतो. मग हे असं काहीतरी होतं." राघव चिडून म्हणाला.
"अहो, असं व्हायचचं कधीतरी. आमची वय झाली आता. पूर्वीसारखी कामं झेपत नाहीत." अरुंधती ताई मध्येच म्हणाल्या.
"अगदी बरोबर आहे तुमचं. पण आमचं ऐकणार कोण?" मनोरमा बाई आणि अरुंधती ताई गप्पा मारत बसल्या. आश्लेषा निरोप घेऊन निघून गेली आणि मानसी राघवच्या सेवेत गुंतली.
"अहो, तुम्ही येणार आहात, हे आधी सांगितलं का नाही?" मानसी.
"इतके फोन केले तुला. पण फोन बंद लागतोय तुझा आणि आईने नेहमीप्रमाणे फोन उचलला नाही. पण सरप्राईज कसं वाटलं? ते आधी सांग."
"सरप्राईज तर छानच आहे आणि मला खूप बोलायचं आहे तुमच्याशी. तुमची विश्रांती झाली की संध्याकाळी एखादी चक्कर मारायला जाऊ." मानसी म्हणाली. मनोरमा बाई आपल्या विहीणबाईंशी बोलत होत्या. मात्र त्यांचं सगळं लक्ष आपल्या लेकाच्या आणि सुनेच्या बोलण्याकडे होतं.
"बरं, ते सगळं जाऊ दे. काम कसं झालं तुमचं?" मानसी.
"काम लवकर आटोपलं म्हणून लगेच निघालो." बोलत बोलत राघव विश्रांतीसाठी खोलीत गेला आणि मानसी आई जवळ येऊन बसली.
"आई, जेवायला काय करू?"
"आई, जेवायला काय करू?"
"माझ्याजवळ बस थोडा वेळ. मग दोघी मिळून करू काहीतरी. मनोरमा बाईंचा पाय मुरगळला आहे ना, त्यांना काही काम नको लावायला. आता मी आले ना, काही काळजी करू नको." आईचं बोलणं ऐकून मानसीला बरं वाटलं. मनोरमा बाई मात्र चेहरा वाकडा करत, पाठ फिरवून पडून राहिल्या.
------------------------------------------
------------------------------------------
"मनू, घर कसं छान ठेवलं आहेस गं आणि स्वयंपाकघरही अगदी नेटकं लावून ठेवलं आहेस. शेवटी आईचं नाव राखलंस म्हणायचं." अरुंधती ताई सगळं डोळ्यांखालून घालत म्हणाल्या.
"पण आई, इथे कोणाला माझं कौतुक नाहीय, ना कोणी माझ्याशी धड बोलतं. सासुबाई कामापुरतं बोलतात आणि ह्यांना माझ्याविषयी काहीबाही सांगत राहतात." मानसीच्या डोळ्यांत पाणी आलं.
"मनू, असा गैरसमज करून घेऊ नये. अजून तशी नवीन आहेस तू आणि इथे बघून तसं काही वाटत नाही गं." अरुंधती ताई तिला समजवत म्हणाल्या.
"ज्याचं जळतं, त्यालाच कळतं आई."
"अगं, सासरी मुलीला जमवून घ्यावं लागतं. हळूहळू सगळं नीट होईल." ताई.
"मनू, झाली का तयारी? पोटात कावळे ओरडत आहेत. मगाशी नुसती लापशी खाल्ली होती." मनोरमा बाईंची हाक ऐकून मानसी उगीचच हसली. पुढचे काही दिवस आता छान जाणार होते. कारण आई आल्याने सासुबाई तिच्याशी छान वागणार होत्या!
दोघींनी मिळून जेवणाची तयारी केली. जेवणं झाली, आवराआवर झाली आणि मानसी आपल्या खोलीत आली. पुढे वाढून ठेवलेलं संकट तिची वाट पाहत होतं.
--------------------------------------
--------------------------------------
"हे काय? झोपला नाहीत? ताट वाढू का?" मानसी जाग्या असलेल्या राघवला पाहून म्हणाली.
"आई कशी पडली?" राघव थोड्या रागाने म्हणाला.
"भाजी मंडईत एक चक्कर टाकावी म्हणून गेले होते. इतक्यात आईंचा फोन म्हणून आले तर त्या पडल्या होत्या आणि सोसायटीमधल्या बायका सगळ्या घरी जमलेल्या. तसं फारसं काही लागलेलं नाही. चार दिवस विश्रांती घ्या म्हणाले डॉक्टर." मानसी भाबडेपणाने म्हणाली.
"तुला माहिती आहे ना, हल्ली आईला काही करायला जमत नाही. मग बाहेर गेलीस कशाला? जास्त मार बसला असता तर एकटीने काय केलं असतंस?" राघव अजूनही चिडलेलाच होता.
"पण मी सगळी कामं आवरून गेले होते. त्यांच्यासाठी काही काम शिल्लक नव्हतं."
"आणि एवढं असूनही त्या रमाकडे कशाला गेली होतीस? आईला खायला -प्यायला कोण देणार? का तेही ताईने येऊन करायचं?" राघव भलताच रागावला होता.
"अहो, मला ताई येणार आहेत हे मला माहिती नव्हतं. तुम्ही गेल्यानंतर आठ दिवस त्या इथेच होत्या. नुकत्याच घरी गेल्या आणि आई पडल्या. बरं, आईंचा डोळा लागला म्हणून रमाकडे गेले होते, इतकंच." मानसीने खरं ते सांगितलं.
"अच्छा, ताई आठ दिवस इथे होती, ते तुला आवडलेलं दिसत नाही म्हणून ही असली कारस्थानं करतेस? माझ्या आईला काय झालं असतं तर? ताईने मला हे सांगितलं म्हणून बरं झालं." राघवचा आवाज बाहेरपर्यंत येत होता.
"तसं काही नाही. हे घर ताईंचही आहेच की. त्यांनी कधीही यावं आणि कधीही जावं. त्यावर माझं काही म्हणणं नाही आणि तुमची आई म्हणजे माझी कोणीच नाही का? मी असं का वागेन त्यांच्याशी?" मानसी रडायच्या घाईला आली.
"बस् झालं. उगीच रडायचं नाटक नको आता. डोळे पुस नि जेवायला वाढ." राघव उठून बाहेर आला.
'असं का वाटतं यांना? खरंच इतकी वाईट आहे मी? ह्यांचा माझ्यावर विश्वास कसा नाही? हे घर माझं आहे. या घरातली माणसं माझी आहेत. मग मी त्यांचं वाईट होईल असं का वागेन?' विचारात बुडालेल्या मानसीने ताट वाढताना भाजी डाव्या बाजूला वाढली, तर कोशिंबीर उजव्या बाजूला. चपाती मोडून वाढण्याऐवजी अखंड वाढली. जेवताना राघवला ताट अगदी व्यवस्थित लागायचं.
मानसीने घातलेला घोळ पाहून त्यांचं डोकं गरगरायला लागलं.
"काय हे? आई अहो, तुमच्या लेकीला साधं पानही वाढता येत नाही. ताई म्हणते ते खरं आहे. मानसी ला अजून काहीही कळत नाही. काही येत नाही." राघव चिडून म्हणाला.
मानसीने घातलेला घोळ पाहून त्यांचं डोकं गरगरायला लागलं.
"काय हे? आई अहो, तुमच्या लेकीला साधं पानही वाढता येत नाही. ताई म्हणते ते खरं आहे. मानसी ला अजून काहीही कळत नाही. काही येत नाही." राघव चिडून म्हणाला.
"मानसी, अगं काय हे? पुरुषांना वाढताना व्यवस्थित वाढावं गं. बायकांना थोडं इकडे तिकडे चालतं. पण पुरुष खपवून घेत नाहीत." अरुंधती ताई.
"राघव, चुकून झालं असेल. त्यात काय एवढं? मुकाट्याने जेव आणि विश्रांती घे." मनोरमा बाई मधेच म्हणाल्या.
"बघ, इतकं होऊनही आई तुला सांभाळून घेते. तिची नीट काळजी घ्यायला तुला काही जमत नाही." राघव ताट घेऊन आपल्या खोलीत निघून गेला.
अरुंधती ताई पलीकडल्या खोलीत आडव्या पडल्या. 'मनू अशी धसमुसळेपणाने वागणारी मुलगी नव्हे. मग नक्की काय बिनसलं आहे? तेच कळत नाहीय. तिच्या चेहऱ्यावर आनंद नाही की, लग्न अजून ताजं आहे याचा नवखेपणाही नाही. मनोरमा बाई स्वभावाने बऱ्या वाटतात. राघव थोडेसे रागीट वाटतात. पण आश्लेषा ताई अशा का म्हणाल्या असतील? मानसीला काही कळत नाही, येत नाही.'
विचार करता करता ताईंचा डोळा लागला. एकतर प्रवासाने त्यांची दमणूक झाली होती आणि त्यात लेकीच्या काळजीची भर नुकतीच पडली होती.
विचार करता करता ताईंचा डोळा लागला. एकतर प्रवासाने त्यांची दमणूक झाली होती आणि त्यात लेकीच्या काळजीची भर नुकतीच पडली होती.
काही वेळाने ताईंना जाग आली ती रमाच्या बोलण्याने.
"मनोरमा काकू, मी काय म्हणते, आमच्या ऑफिसमध्ये काही जागा भरायच्या आहेत तर मानसीच्या जॉबसाठी मी तिथे शिफारस करू का? पगार बरा आहे. काम योग्य आहे आणि वेळ फक्त सकाळी दहा ते संध्याकाळी सहा. ती घरची कामं आवरून जाऊ शकते अन् सहा नंतर आल्यावर पुन्हा घरचं काम करू शकते." रमा उत्साहाने बोलत होती.
"तिची वकिली करतेस की हे खूळ तुझ्या डोक्यातून आलं?" बाईंनी थेट प्रश्न केला.
"हे खूळ माझ्या डोक्यातून आलं. कारण मानसी दिवसभर घरीच असते. दुपारचा रिकामा वेळ खूप असतो. तो सत्कारणी लागावा हेच माझं म्हणणं." रमा.
"मानसी आणि नोकरी? तिला जमणार नाही हे." राघव मधेच म्हणाला.
" घरचं कोण करणार? मला आता काही जमत नाही." बाई.
"मी सगळं करून जाईन आणि आल्यावर सगळं काम व्यवस्थित करेन." मानसी आपली बाजू मांडत म्हणाली.
"काकू, तुम्हीही नोकरी करत होता ना? मग सुनेने केली तर काय हरकत आहे? मी असं ऐकलं आहे की, इतकी मनोरमा बाई घरचं सगळं करून नोकरी करत होत्या म्हणे.." रमा डोळे मोठे करून म्हणाली. ही मात्रा बरोबर लागू पडली.
"हो का? अगं, सगळा उरका पाडून मी कामाला जात होते बाई. त्यात ह्यांची फिरतीची नोकरी होती. घरात सासुबाई, सासरे, दिर -जाऊ इतकी मंडळी. मी मोठी म्हणून घरचं करावं लागायचं. त्यात जाऊ मोठ्या पदावर होती म्हणून सासुबाई तिला कामातून सूट द्यायच्या. सासऱ्यांनी एक दमडी सुद्धा कमावली नव्हती. दिरांची नोकरी जेमतेम. त्यात आम्ही तिघे कमवणारे. मग काय.. सगळा भार आमच्यावर येऊन पडला."
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा