भाग १
"दरवर्षी बघतेय. दिवाळीला घेतलेली साडी राखीला आणि राखीला घेतलेली साडी दिवाळीला नेसून येतात. तुमच्या ताईजवळ काय साड्याच नसतात का? एवढा पगार कमावतो नवरा, स्वतः पण ट्युशन्स घेते. स्वतःसाठी साड्या खरेदी करतच नसतील का त्या? काय एक एक नग भेटतात आयुष्यात?" कपाटात कपड्यांची उलथापालथ करताना, प्रेरणाची पटरपटर सुरू होती.
"तुला प्रॉब्लेम काय गं? दरवर्षी तू घेतलेली साडी ती नेसून येते हा की, ती कशी का असेना चांगली वाईट ती नेसते हा?" पंकजने विचारलं.
पंकजने बोललेलं लक्षात न आल्याने??? प्रश्नार्थक भाव चेहऱ्यावर आणत प्रेरणाने पुन्हा विचारलं... "काय म्हणालात?"
"काही नाही... मला कशाला थांबवून घेतलंस? काय ते सांग आणि जावू दे मला, काम पडलीत खूप." पंकज उत्तराला
प्रेरणाने कपाटातून चार पाच साड्या बाहेर काढल्या, पंकज समोर ठेवल्या.... "यातली कोणती साडी द्यायची तुमच्या ताईला?" प्रेरणाने विचारलं.
"कोणतीही दे... तुला आवडते ती दे.... आवडती म्हणू की नावडती??" तो हळूच पुटपुटला..
"काहीही काय बोलताय? आल्या गेल्यातल्या असल्या तरी चांगल्या आहेत साड्या?"
"मला माझी पसंती आहे. दुसऱ्यांच्या पसंतीच्या साड्या मला आवडत नाही. पिको फॉल करा, ब्लाउसची शिलाई तरी किती? परवडतात का या अशा दुसऱ्यांनी घेतल्या साड्यांवर पैसे खर्च करायला? म्हणून असतात माझ्याकडे ठेवणीत साड्या. तुमचा खर्च वाचवते मी ही का विसरता?" प्रेरणा उर्मटपणे बोलली.
"मला माझी पसंती आहे. दुसऱ्यांच्या पसंतीच्या साड्या मला आवडत नाही. पिको फॉल करा, ब्लाउसची शिलाई तरी किती? परवडतात का या अशा दुसऱ्यांनी घेतल्या साड्यांवर पैसे खर्च करायला? म्हणून असतात माझ्याकडे ठेवणीत साड्या. तुमचा खर्च वाचवते मी ही का विसरता?" प्रेरणा उर्मटपणे बोलली.
"बरंय माझा भाऊ, ओवाळणीत मला पाकिटात पैसेच देतो. आवडीप्रमाणे घेता येतं काहीही.. प्रेरणा बोलताना खूश झाली.
"हो, मागच्या वर्षी पाकिटात मिळालेल्या पैशात बाराशे रुपये माझ्याजवळचे टाकून तू बावीसशे रुपयाची साडी घेतली भावाकडून....." पंकज टोमणा मारला.
"तुम्हाला हेच बर लक्षात राहिलं." प्रेरणाने तिरकस उत्तर देत म्हटलं.
"सिंगल पदर हातावर सोडून, छान मिरवली होती ती साडी. शेजारच्या साक्षीच्या लग्नात, सर्वांना सांगत होतीस. भावाने दिवाळीत घेतलीय म्हणून.. म्हणून लक्षात राहिलं. पंकजने सांगितलं.
"अहो सांगा ना? कोणती साडी देऊ तुमच्या ताईला." प्रेरणाने पुन्हा विचारलं.
"दे गं कोणतीही?"
"कोणतीही दे वगैरे काही नाही...... तुम्ही म्हणाल ती देते. सांगा पटकन कोणती देऊ? उगाच उद्या खापर माझ्या डोक्यावर नको." प्रेरणा त्रासिकपणे बोलत होती.
"हो म्हणजे, साडी ह्यांच्या पसंतीची आहे हो ताई. तू सांगायला मोकळी." पंकज हळूच बोलला.
"बाईच्या जातीला मरण? चांगल्याचा जमानाच नाही." प्रेरणा चिडली होती.
"ही गुलाबी साडी कशी आहे. चांगली दिसेल, थोडी नाजूक जर आहे साडीला.... दिवाळीत मग ही मोरपंखी साडी देता येईल. जाड जरीकाठाची...." प्रेरणा पुटपुटली.
"काय करायचं ते कर... कोणती द्यायची ती दे. मला नको सांगू..." पंकजने पसंती द्यायची टाळलं.
शुभांगी मस्के...
शुभांगी मस्के...
फेसबुकवरील सर्व ब्लॉग लिंक ओपन होण्यासाठी, आपल्या आवडत्या लेखकाला पाठिंबा देण्यासाठी आणि वाचन अखंड सुरू ठेवण्यासाठी आजच सबस्क्रिप्शन घ्या
Subscription Plan
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा