भाग ३
"अहो, उद्या तुमच्या ताईला, नेहमीसारखं लवकर ये म्हणून सांगा.... दुपारनंतर मला माहेरी जायचं असतं, भावाला राखी बांधायला."
"आठवतंय मागच्या वर्षी, राखीचा मुहूर्त दुपारनंतर म्हणून ताई उशिरा आलेली.. एवढी चिडचिड झाली होती माझी. रात्रच झाली होती, माहेरी जायला."
"अगं पण.. तू तर राखीला गेलीस की राहतेस एक दोन दिवस, भावाकडे. मग थोडा उशीर झाला जायला तर काय एवढं बिघडतं. " पंकज पुटपुटला.
"काही नाही.... ताई लवकर आल्या की बरोबर ऍडजस्ट होतं सगळं. ते मुहूर्त वगैरे येतं कधीकधी आडवं...... प्रेरणाची बडबड सुरू होती.
"अहो, तुम्ही सांगितलं नाही.. कोणती साडी देऊ ते.... प्रेरणाने पुन्हा विचारलं...
"दे कोणतीही? माझ्या बहिणीने, अख्खी प्रॉपर्टी भावाच्या नावे केली.. प्रॉपर्टीच काय हक्काच्या माहेरावर सुद्धा हक्क सोडला तिने, ती काय तुझ्या या साडीसाठी रुसणार?"
"तिला आपण काय देणार? तिनेच तर एवढं दिलंय आपल्याला. मोठ मन तिचं म्हणुनच तर.... तू मानाने दिलेली साडी... आवर्जून नेसते ती..."
"आई म्हणायची तिला नेहमी, माझ्या एकुलत्या एक पोर, रुसू नको त्याच्यावर. जेवढा मानपानाच करेल त्याला गोड मान." तिने आईचा शब्द पाळला. बोलताना पंकजला गहिवरून आलं.
त्याने लगेच पायात सँडल सरकवली आणि बाहेर पडला. एटीएममध्ये जाऊन त्याने पैसे काढले.
प्रेरणा नेहमी ज्या दुकानातून साडी खरेदी करायची, मध्यंतरी तिच्यासोबत साडी घ्यायला गेला तेव्हा त्या दुकानातल्या साड्या छान असतात... दुकान आणि दुकानातल्या साड्यांचे गोडवे गाताना ती थकत नव्हती.
पंकज त्याच साडीच्या दुकानात गेला... एक सुंदर साडी त्याने ताईसाठी खरेदी केली.
घरी आला.... हातात पिशवी होती त्यावर साडीच्या दुकानाच नाव बघून प्रेरणा बघताच अचंबित झाली.
"काय आणलं? साडी आणली की काय?" प्रेरणाने आश्चर्यचकित होऊन विचारलं.
त्याने पिशवी तिच्या हाती दिली.... बघ म्हणाला.
"कोणासाठी माझ्यासाठी का?" प्रेरणाने झटकन पिशवी हातात घेतली..
"उद्या राखी आहे तर साडी तुझ्यासाठी असणार का? ताईसाठी आणलीय.. कशी आहे सांग?" पंकज प्रेरणाला विचारलं.
"बापरे, एवढी महागाची साडी." साडीवरचा टॅग तिने पहिले बघितला.
"मी दुपारी साडीसाठी एवढा खटाटोप केला.... तेव्हा नाही बोललात ते.. माझी मेहनत गेली ना फुकट." प्रेरणा चिडली होती.
"घरी एवढ्या साड्या असताना, कशाला खर्च केला. पैसे काढून आणायला सागितले होते. आणले की विसरलात?" प्रेरणा तिरकसपणे बोलली.
पंकजने खिशातून पाकिट काढलं आणि तिच्या हातात पैसे दिले.
"मी म्हणते, काय गरज होती....नवीन साडीची." घरी होत्या एवढ्या साड्या... दिली असती त्यातलीच एक." प्रेरणा साडीकडे बघत बोलली.
"कशी आहे साडी? आवडली नाही का?" पंकजने विचारलं.
"ठीक आहे." प्रेरणाने नाक तोंड एक केलं.
"तशीही माझी पसंती, एवढी काही चांगली नाहीये... माहितीय मला.... तुझ्याशी लग्न झालं,तेव्हापासून मला माझ्या पसंतीवर शंकाच येतेय... पण असू दे, तू दिलेल्या साड्या ताई मनापासून घालते. पुढच्या वर्षी कधी जेव्हा ती ही साडी नेसून येईल तेव्हा मला आनंद होईल." पंकज एका दमात बोलून गेला.
शुभांगी मस्के...
शुभांगी मस्के...
फेसबुकवरील सर्व ब्लॉग लिंक ओपन होण्यासाठी, आपल्या आवडत्या लेखकाला पाठिंबा देण्यासाठी आणि वाचन अखंड सुरू ठेवण्यासाठी आजच सबस्क्रिप्शन घ्या
Subscription Plan
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा