भाग ४
"काय म्हणालात? माझ्याशी लग्न झालं, तेव्हापासून तुम्हाला तुमच्या पसंतीवर शंका येतेय? प्रेरणा चिडून बोलली.
"काही नाही गं......" गंमत... पंकजने हळूच कान पकडले.
"ऐक, आपली छुटकी आहे तशी या घरासाठी ताई सुद्धा आहे. मी तर म्हणेन, या घराशी ताईचं नातं छुटकीपेक्षा कणभर अधिक घट्ट आणि जवळचं आहे."
"ताईने आनंदाने या घराचा हक्क सोडला आणि तिचा वाटा हसत हसत आपल्या नावावर केला."
"एवढ्या वर्षात ताईने ना कधीच कुठली अपेक्षा ठेवली ना कधी कशाचा हट्ट केला.
"घेणं देणं.. गिफ्ट्स वगैरे नात्याचा आधार नसावा." असंच ती नेहमी म्हणते.
"ताईची मुलं छोटी होती तेव्हा.... आईने जे करायचं ते सगळं केलं. आपल्या लग्नात ताई किती खूश होती. आपली मुलं झाली तेव्हा, आत्या म्हणून ताईने तिची सगळी कर्तव्ये पार पाडली. ताईला मुलगी नाही, आपल्या घरी येताना, आपल्या छुटकीसाठी... किती किती.. काय काय घेऊन येते ती नेहमी.
"तू दिलेली साडी, मानाने नेसते.... यात तिचा मोठेपणा नाही का?"
"आपल्या छुटकीमध्ये तुझा जीव वसतो. तुझं तुझ्या मुलीवर प्रेम आहे.... उद्या आपला गोल्या छुटकी सोबत बरा नाही वागला. तुला कसं वाटेल?"
"छुटकी आणि ताई दोघी.. या घराच्या मुली आहेत. ताई सासरी गेली उद्या आपली छुटकी तिच्या सासरी जाईल. ताई सारखं मोठ मन आपल्या छुटकीने केलं तर त्या, दोघींचं हे घर जन्मभर ऋणी राहिलं नेहमीसाठी. बावीस पंचवीस वर्ष ह्या मुली ज्या घरात लहानाच्या मोठ्या झाल्या ते घर सोडून जाताना त्यांच्या मनात किती घालमेल होत असेल. मग कधीतरी, त्या ह्या घरात येतील तेव्हा, त्यांच स्वागत हसत मुखाने व्हायला हवं. त्याचं स्वागत करून आपण त्यांच्यावर उपकार करतोय, असं नको वाटायला त्यांना. या घराचे दरवाजे त्यांच्यासाठी नेहमी खुले असायला हवे. पंकज बोलत होता प्रेरणा ऐकत होती.
"फक्त एक सांग, तुझा भाऊ पाकिटात पैसे देतो. तू आवडीने जे पाहिजे ते घेतेस. उद्या तुझ्या वहिनीने, अशीच कपाटातली एखादी साडी तुला दिली तर चालेल का तुला? नाही ना!"
"माझ्या ताईचं मन खूप मोठं आहे. मागच्या वर्षी उशिरा येण्यावरून, तू चिडचिड केली. काहीच बोलली नाही. उशिर झाला होता यायला, तिने मला राखी बांधली आणि लगेच निघून सुद्धा गेली.
"आज, दुपारी तिचा कॉल आला होता. उद्या तुम्ही सगळे इकडे या म्हणाली"
"इकडे या, जेवण करा आणि नंतर आपण तुझ्या माहेरी जावं असं तिला वाटतयं" तिने कॉल केला होता मला.
"बघ..... सकाळी लवकर ये म्हणून फोन करायची गरजच पडली नाही गं." पंकज बोलताना हळवा झाला.
शुभांगी मस्के...
शुभांगी मस्के...
फेसबुकवरील सर्व ब्लॉग लिंक ओपन होण्यासाठी, आपल्या आवडत्या लेखकाला पाठिंबा देण्यासाठी आणि वाचन अखंड सुरू ठेवण्यासाठी आजच सबस्क्रिप्शन घ्या
Subscription Plan
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा