Login

धागे बंधनाचे भाग ५

धागे बंधनाचे भाग ५
" वाढदिवस काय नेहमी होतात. तू नंतर कधी तरी जा किंवा मग अस कर, तु तिला गिफ्ट देउन भेटून लगेचच ये तिकडं." आरती बाई तिला आग्रह करत म्हणल्या.

" आई अस कसं लगेच निघता येईल ?."

" अग पण आज कल्पनाची बहिण आणि तिच कुटूंब जेवायला येणारं आहे. मी तिला सांगितल आहे. किर्ती करेल तिला मदत स्वयंपाक करायला. तु किती छान करते बिर्याणी. अस काय करते ग तू. आपल्या घरी पाहुणे येणार आहेत नी तु अस बाहेर जाणार. शोभत का तरी तुला हे ? "

" आई वहिनींनी हा प्रोग्रॅम बद्दल मला काहीचं नाही सांगितल. नाही तर मी त्यांना तेव्हाच सांगितल असत. मला मदतीला यायला जमणार नाही."

" आज कर ग मदत. नंतर जा. पाहिजे तर एखाद मोठ गिफ्ट घेउन जा नंतर." त्या किर्तीला गळी उतर वण्याचा प्रयत्न करीत होत्या.

" सॉरी आई. मी अस नाही करू शकत."

" किर्ती अग बघ ना. अस एकदम नाही म्हणलं तर किती तोंड घाशी पडल्या सारखं होईल तिला. तुला तरी शोभत का ?अस घरी आलेल्या पाहुण्याशी अस वागणं?" त्या तिला इमोशनल करत म्हणल्या.

" हो आई बरोबर बोलत आहात. नाहीच शोभत." ती काही तरी विचार करत म्हणाली.

" मग येतेस ना मदत करायला. मला तुझ्या हातची बिर्याणी खायला फार आवडते."

किर्तीची स्तुती करत आरती बाई म्हणाल्या. त्यांना माहित होत की आता किर्ती बाहेर जाण्याचा प्रोग्रॅम रद्द करेल. नी मदतीला येइल.

" बर आई आता तयार झाली आहे तर जावून येतच. आल्यावर मदत करते." तिने मार्ग काढला. शक्कल् लढवली.

" आई लवकर घरी येते."

अस आश्वासन देऊन किर्ती अमोघला घेउन बाहेर पडली.

"कार्यक्रम झाला की लगेचच निघ" आरती बाई जाता जाता तिला सांगत होत्या.

तिच्या मैत्रिणीच घर त्यांच्या घराच्या दुसऱ्या टोकाला होत. तिला तिथं जावून यायला उशीर होणार होता. ट्रॅफिक मुळे तर त्यांना नक्कीच उशिर होणार होता. दोन तीन तास बर्थ डे पार्टी आणि जाण्या येण्याचा वेळ बघता तिचा दिवस तिथेच जाणार होता. याची कल्पना तिने आरती बाईना दिली नाही.

इकडे कल्पना वहिनी नेहमी प्रमाणे उशीरा घरी आल्या. तर घरी अजून काहीचं तयारी दिसत नव्हती. सकाळीं पसरलेले घर आता ही तसचं पसरलेले होते. मूल शाळेतून घरी आल्यावर किर्ती कडेच राहत.

तिथ खाली फ्रेश होवून नंतर संध्याकाळी कराटे क्लासला जात. धनंजय येताना मुलांना घेवून येत. किर्ती त्यांना सोडायला जात. तिचा अमोघ पण तिथून जवळच असलेल्या बालभवन मधे जात.

आज कल्पना घरी आली तेव्हा मुले खाली खेळत होती. धनंजय पण नुकतेच घरी आले होते. मुलं आज कराटे क्लासला गेलीच नव्हती. आरती बाईनी तसं धनंजयला फोन करून सांगितल होत. त्यामुळें त्याला वाटल घरी पाहुणे येणार आहेत म्हणून मूल नसतील गेली क्लासला.

तो पण लवकर घरी आला. पाठोपाठ कल्पना देखील आली. तो पर्यंत आरती बाईनी बिर्याणी करायची म्हणून तांदूळ भिजत घालून ठवले होते. भाज्या चिरून ठेवल्या होत्या.त्यांच्या च्यान इतकचं काम झालं होतं.

" आई हे हो काय अजून काही तयारी केली नाही. किर्ती कुठं आहे.? "

" किर्ती तिच्या मैत्रिणीच्या कडे गेली आहे. कस्तुरीचा वाढदिवस आहे. तर ती लवकर येते म्हणाली." त्या म्हणाल्या.

" आई कस्तुरी पण खूप लांब राहते. किर्तीला आजच जायचं होत का? तिला माहित होतं ना आज दीदी जिजाजी येणार आहेत. मग ती का गेली. वाढदिवस काय दरवर्षी येतो ना !

दीदी फक्त दोन महिन्या साठी इंडीया मध्ये आली आहे. मी तिला घरी जेवायला बोलावलं आहे. शी बाबा ! आता कस करु मी सगळं." वैतागून बोलली ती.

" अग अस काय करते. तू कर्. तू पण छान स्वयंपाक करते. मी आहे तूझ्या मदतीला. आपण मिळुन करू पटकन. हे बघ मी तयारी सुरू केली आहे." तिच मन राखण्यासाठी त्या म्हणल्या.

" कल्पना अग झालं का सगळं. हे बघ साली साहेबांचा फोन आला आहे. ते अर्धा तासात पोचतील." अस म्हणत धनंजय किचन मधे आले. समोरचा नजरा बघून त्याच्या हि कपाळाला आठया पडल्या.

" कल्पना हे काय आहे. अजून तयारी नाही केली. तुला माहीत आहे ना हे दोघं किती स्पेशल गेस्ट आहेत ते ! "

क्रमशः

🎭 Series Post

View all