" हो माहीत आहे मला. मी किर्तीला सांगितल होत. की थोडी मदत कर म्हणून. पण ती कुठल्या तरी फडतूस कार्यक्रमाला गेली आहे. कस्तुरी चा वाढ दिवस साजरा करायचा आहे." कल्पना वैतागत म्हणाली. तिला किर्तीचा तिच्या बेजाबदारपणाचा राग आला होता.
" आता कात करायचं. ते सगळे येतच असतील. अर्ध्या वाटे वर पोचले आहेत." धनंजय चिंतेच्या स्वरात म्हणाला. त्या नंतर ते दोघं काहीतरी विचार करत बेडरूम मध्ये गेले.
आरती बाई त्यांचं काम करायला लागल्या. त्या कोथिंबीर निवडत होत्या. थोड्या वेळाने कल्पना आणि धनंजय मध्ये काय बोलणं झालं ते नाही समजल. पण त्यांनी त्या लोकांना जेवायला घरी बोलावण्याचा कार्य क्रम रद्द केला.
कार्य क्रम रद्द झाला म्हणून आरती बाई पण त्यांच्या घरी म्हणजे खाली निघून गेल्या. नंतर अर्ध्या तासाने त्यांनी खिडकीतून बाहेर बघितलं तर धनंजय कल्पना आणि मुलं कॅब मध्ये बसुन कुठे तरी निघून गेले.
आठ वाजे पर्यंत किर्ती आणि अमोघ घरी आले.त्यांच्या पाठोपाठ संजय पण आला. तो चार दिवसंच्या टूर वर गेला होता.
धनंजय आणि कुटुंबाला अस तयार होउन बाहेर जातांना बघून कधी नव्हे ते आरती बाई पण चिडल्या. जर कार्यक्रम करायचा होता तर तो स्वतः च्या जीवावर करायचा होता ना. दुसऱ्याच्या भरोवश्यावर कशाला करायचा .?.
किर्ती घरी आल्यावर घरातलं वातावरण बघून ती पण गोंधळात पडली होती. सकाळीं तर वहिनी सांगून गेल्या होत्या. आज त्याची बहीण जेवायला येणार आहे.
मग अस का. ? वरच्या मजल्यावर लाईट बंद का आहेत.? कुठं गेले सगळे.?.
आज प्रोग्रॅम आहे तर वहिनीच्या माहेरची माणसं असायला हवीत. सगळी कडे असं शांत शांत काय आहे.!
कुठं गेले सगळे ? कार्य झालं ?
पण तिन स्वतः हुन प्रश्न न विचारण्यात स्वतःची भलाई समजली. ती गप्प बसली होती. सासू बाई आणि नवरा पण धुस पुस करत होते. पण तिन तिच सगळं लक्ष अमोघ कडेच ठेवलं.
त्याला बर्थ डे पार्टी मध्ये रिटर्न गिफ्ट मिळालं होत. दुर्बिण आणि त्यातली चित्र. ते बघण्यात तो व्यस्त होता. ती पण त्याच्या सोबत खेळण्यात बिझी होती. निदान तसं दाखवत तरी होती. तो सगळ्यांना त्या दुर्बिणीची गंमत दाखवत होता. त्यातील चकती फिरवली की अतली चित्र रंगी बेरंगी दिसतात.
आई आणि संजय ते अमोघ दाखवत असलेली गंमत बघत आहेत असा देखावा करत होते. हे सगळं किर्तीला समजत नव्हत असं नाही. सगळं कळतं होत.
पण दोघांच्या नाराजीची कारण वेगळी होती. सासू बाईना तिच्या बेजबाबदार वागण्याचा राग आला होता.
तर ती बाहेर गेली होती. तिला माहिती होत. तो आज परत येणार आहे. तर तिने त्याच्यासाठी स्वयंपाक करून ठेवला नव्हता. त्याला भुक लागली होती. गेले आठ दिवस बाहेरच खाऊन तो वैतागला होता. त्याला आज घरचं साधं जेवण जेवायला हव होत.
तर किर्ती उशीरा घरी आली. आल्यावर पण अमोघ सोबत खेळत बसली आहे. शेवटी त्याने तिला त्याच्या साठी जेवण बनवायला सांगितलच.
पण ही शांतता वादळापूर्वीची शांतता होती. संजय ने तिला स्वयंपाक करायला सांगितला होता. ती एकीकडे हात चालवत होती.तर दूसरी कडे डोक्यात विचारांचं वादळ निर्माण झालं होत.
तिला आश्चर्य वाटलं ! आज कल्पना वहिनी कडे प्रोग्रॅम आहे. तर सगळे जेवायला वरती जाणार होते. मग वहिनींनी स्वयंपाक नाही केला ?
नवऱ्याला भुक लागली आहे. अस असताना ती कशी काय गप्प बसेल ? तिन पटकन भाकरी बनवली. पिठलं बनवलं. एकीकडे कुकर लावला.
तिने आल्यावर नवऱ्या साठी आणि सासू बाईंच्या साठी स्वयंपाक केला. त्यांचं जेवण झाल्यावर सासू बाईनी विषय काढला.
" किर्ती अग काय हे वागणं तुझ. तुला सांगितल होत ना जाउ नको म्हणून. पण तरी देखील तू का गेलीस.? "
" काय झालं आई ?. तू अस का विचारत आहेस." संजय ने आईला विचारले.
तेंव्हा आरती बाईनी संजयला सांगितल काय घडल ते. नंतर ते दोघं कसे मुलांना घेवून कॅब मध्ये बसुन निघून गेले. ते पण सांगितल. त्यावरून संजय किर्तीला काही प्रश्न विचारणार त्या आधीच किर्ती ने त्याला विचारलं.
" वहिनींनी मला विचारून हा कार्य क्रम नव्हता ठरवला. मला आधी सांगितल असत तर मी त्यांना तेव्हाच नकार दिला असता. कस्तुरी च्या वाढदिवसाला जायच माझं आठवडा भर आधीच ठरल होत." किर्ती म्हणाली.
" अग पण आधी करून जायचं ना. किंवा मग लवकर घरी यायचं."
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा