Login

धागे बंधनाचे भाग ३

धागे बंधनाचे भाग ३
घरचा कार्यक्रम असताना हिला बाहेरची काम कशाला करायला हवीत.?

नंतर नसत का करता आलं. दमुन थकून आलेली किर्ती वहिनीच्या घरी मदतीला गेली. बघितलं तर वहिनी सकाळी ऑफिसला जाताना घरातलं काम तसचं ठेवून गेल्या होत्या. तिला आधी ओटा आवरावा लागण्या पासुन कामाला सुरवात करायची होती. घर देखील आवरल नव्हत.

तिने आधी घर आवरलं. ओटा पसरलेला आवरला. छोले कुकर मध्ये शिजवायला ठेवले. एकीकडे पुलाव आणि कोशिंबीरीची तयारी केली. तो पर्यंत आरती बाईनी गुलाबजाम वळुन दिले. भटुरे करण्यासाठीं कणीक मळून ठेवली.

तिन पाक करायला बघितला तर साखर संपली होती. जेमतेम चहा करण्या इतपत साखर होती. आता तिच्या कडे इतका वेळ नव्हता की ती मार्केट मध्ये जावून साखर घेउन येईल तिने तिच्या घरातील साखर आणली. नी वापरली.

छोले मसाला आणि पुलाव मसाला देखील कमी आणला होता. तो देखील तिने तिच्या घरचा आणून वापरला. थोडी सजावट केली. तो पर्यंत कल्पना वाहिनीचा काहीचं पत्ता नव्हता. त्यांचा फोन देखील लागतं नव्हता. स्विच ऑफ झाला होता.

थोड्या वेळाने श्वेता,श्रीकांत,अमोघ पण शाळेतून घरी आले. पण वहिनी अजून ऑफिस मधून घरी आल्या नव्हत्या. किर्ती ने मुलांच आवरलं. त्यांना दुध प्यायला दिले.

आता घड्याळात पाच वाजून गेले होते. साडे सहा सात वाजे पर्यंत लोकांना बोलावलं आहे. लोकं यायची वेळ जवळ आली तसं किर्ती ने छोले बनवले. पुलाव केला. कोशिंबिर केली. आता फक्त गरम गरम भटुरे तळायचे बाकी होते. तेंव्हा केक घेउन वहिनी घरी आल्या.

अचानक एक इम्पोर्टनंट मीटिंग होती. डिस्कशन जरा उशीर पर्यन्त लांबल. त्यात तिचा मोबाइल ऑफिसच्या रूलस् मुळे कॉन्फरन्स रूम मध्ये अलाऊड नव्हता. मीटिंग संपायला पाच वाजले. मग येताना केक घेउन येण्यात तिला उशीर लागला. असं सांगितल्यावर काय बोलणार.?

मुलीचा वाढदिवस त्यामुळे त्या आल्या आल्या मुलांना तयार करण्यात गुंतल्या. मग स्वतः तयार झाल्या. त्यांचं आवरून होई पर्यंत लोक यायला सुरवात झाली. बाहेर केक कटिंग, औक्षण , मुलांचे खेळ कार्य क्रम चालु होते. त्या त्यात बिझी झाल्या. नी किर्ती किचन मधे अडकली. सगळ्यांना गरम गरम भटुरे तळायचे होते. ती ते काम करत होती. बाहेर सगळे जण पार्टी एन्जॉय करत होते.

सासू बाई तर कल्पना वहिनीच कौतुक करून थकत नव्हत्या. नोकरी करून देखील तिने सगळं कस छान साजर केलं. ती किती गुणाची आहे. तिला नोकरी करून घर सांभाळायला कस छान जमत. आज देखील श्वेता ची बर्थ डे पार्टी कशी मस्त अरेंज केली.

त्यावर किर्तीला त्यांचा राग येत होता. पण बोलणं शक्य नव्हत. मोठ्यांचा आदर केला पाहिजे. त्यांना उलट बोलायचं नाही. असे संस्कार आडवे येत होते तिचे. तिला कुटुंब आणि त्यांचं महत्त्व माहिती होत तिला त्याची किंमत होती. ती स्वतः देखील अशाच मोठ्या कुटुंबात वाढलेली होती. तिच्या माहेरी तिची आई काकू आत्या मावश्या मिळुन मिसळून राहत.

त्यांच्या कडे देखील काही जण नोकरी करत. पण कधी कोणी काम करायला काच कूच करत नसे. सगळी काम मिळुन मिसळून वाटून करत. पण इथ तसं नव्हत. किर्ती सगळं काही करायची. पण श्रेय मात्र वहिनी घेउन जात.

किर्ती ने कधी त्या गोष्टी कडे लक्ष दिलं नव्हत. पण त्या दिवशी घडलंच अस की तिला स्वतः चा राग येत होता. का ती अशी बावळट सारखी वागली.? का तिने इतरांना तिचा फायदा घेऊ दिला.?

लहान मुलांची पार्टी झाल्यावर मोठी माणसं जेवायची बाकी होती. आरती बाई आणि कल्पना वहिनीची आई बोलतं बसल्या होत्या. त्यांचं जेवण बाकी होत. तर भटुरे तळून झाल्यावर तिने सगळ्यांची पान वाढली. नी वहिनींना जेवायला बोलवायला ती त्यांच्या रूम कडे निघाली तेव्हा त्यांच बोलणं ऐकून तिचे पाय जागीच थांबले.

वहिनीची बहिण परदेशात सेटल झाली होती. तर तिचा व्हिडिओ कॉल आला होता. म्हणून वहिनी रूम मध्ये जावून बोलतं होत्या.

" काय करु दिदी, अस वाटतं माझं घर म्हणजे अन्न छत्र आहे. सगळ्यांना फुकट जेवायला घालण्यासाठी सुरू केलं आहे. त्यात माझी जाउ आणि

तिचं ते पोरगं ! हे राम ! ते तर जन्माच भुकेल आहे. अस हवरटा सारखं खात असत ना. ज्याचं नाव ते.

अग अगदी अधाशा सारख खातात दोघं. जणु काही यांना इतकं चांगलं जेवण कधी खायला मिळतच नाही."

"बरोबरच आहे म्हणा. अस ऐकलं आहे की ती स्वतः काही नोकरी करत नाही. तिचा नवरा पण तसाच. नसेल परवडत त्यांना असल चांगलं खायला."

क्रमशः

🎭 Series Post

View all